निर्दोष इंग्रजी बोलायला व लिहायला येण्यासाठी काही शब्द, वाक्यरचना नि व्याकरण ह्याचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. इंग्रजी लेखन, वाचन व संभाषण ही एक कलाच आहे. ह्या लेखात आपण इंग्रजी भाषा अर्थवाही आणि आशयघन बनवणाऱ्या काही Transitional phrases (संक्रमक वाक्यांश) पाहणार आहोत. इंग्रजी भाषा बोलताना वा लिहिताना त्यातील आशय अधिक सुस्पष्टपणे व ओघवत्या स्वरूपात स्पष्ट व्हावा यासाठी हे काही निवडक संक्रामक वाक्प्रचार ( transitional phrases) वापरले जातात.

   कापडाची जशी वीण असते, तशी भाषेचीपण असते. भाषेची ही वीण गुंफताना त्यात शब्द, वाक्यं, विचार आणि भावना ह्यांची परिणामकारक गुंफण असणे आवश्यक असते, जेणेकरून त्यातून एक सुसंवाद प्रकट व्हावा. प्रत्येक भाषेचे एक असे वैशिष्ट्य असते की त्या भाषेमध्ये आशयाची परिणामकारकता वाढवणारे काही वाक्यांश किंवा वाक्प्रचार असतात; त्यांना संक्रामक वाक्यांश/वाक्प्रचार (transitional phrases) असे म्हणतात. इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा अशा काही transitional phrases आहेत ज्यामुळे ती भाषा ऐकताना वा वाचताना एक सहजसुंदर विचारप्रवाह प्रकट होण्यास मदत होते. इंग्रजी भाषेतील असेच काही हे संक्रामक वाक्प्रचार :-


इंग्रजी भाषेला अर्थपूर्ण बनवणाऱ्या Transitional Phrases


१. In the first place = सर्वात आधी
➤ Let us learn the basics in the first place. आपण सर्वात अगोदर मूलभूत गोष्टी शिकूया.
➤ It was the heartbreak that provided impetus to me in the first place for writing poems and music was the second. कविता करण्यासाठी मला सर्वात आधी प्रेरणा कुणी दिली असेल तर ती माझ्या हृदयभंगाने आणि दुसरी संगीताने.

२. Coupled with/ Together with/ Along with = च्या जोडीने
➤ Good intellect coupled with/ together with / along with good memory will fetch good marks. चांगली बुद्धिमत्ता चांगल्या स्मरणशक्तीच्या जोडीने चांगले मार्क मिळवेल.
➤ True poets are those who have received the gift of good expression coupled with/ together with / along with imagination from God. खरे कवी तेच ज्यांना भगवंताकडून उत्तम तऱ्हेने व्यक्त होण्याच्या जोडीला कल्पनाशक्तीचे वरदान लाभलेले असते.

३. Besides/ Other than = च्या शिवाय
➤ I like to read biographies which give you something to think about besides/ other than just entertainment. केवळ करमणुकीशिवाय विचारांना जी चालना देतील अशी चरित्रे वाचायला मला आवडतात.
➤ Heart pumps love, passion, sorrow, joy and faith besides just blood. हृदय हे केवळ रक्ताशिवाय प्रेम, उत्कटता, दुःख, आनंद आणि श्रद्धा ह्या गोष्टीदेखील प्रवाहित करतं.

४. Beside = च्या बाजूला
➤ A dozen books to teach spoken English are lying beside me at the moment!
इंग्रजी बोलायला शिकवणारी डझनभर पुस्तके माझ्या बाजूला ह्या क्षणी पडलेली आहेत!
➤ Don't walk behind me like a disciple or don't walk in front like a guide, just walk beside me like a friend. माझ्या मागे एखाद्या शिष्याप्रमाणे वा माझ्या पुढे एखाद्या गुरूप्रमाणे चालू नकोस तर माझ्या बाजूला एखाद्या मित्राप्रमाणे चाल.

५. By the same token = च्या अनुषंगाने
➤ There were strong winds and by the same token, high tides too. वारा खूप जोराचा होता आणि त्या अनुषंगाने उंच लाटापण.
➤ Eyes are the the same but visions differ and by the same token, a lot of different interpretations are made . डोळे जरी सारखे दिसत असले तरी दृष्टी मात्र भिन्न असते आणि त्या अनुषंगाने विविध अर्थ काढले जातात.

६. Likewise = जसे - तसे
➤ The leader monkey jumped from the tree and likewise all the monkeys jumped. माकडांच्या नायकाने झाडावरून उडी मारली आणि सर्व माकडांनीपण तशाच उड्या मारल्या.
➤ In Italy the artist is a god. In America, likewise, a scientist is a god. इटलीमध्ये जसा कलाकार देव असतो तसा अमिरिकेत शास्त्रज्ञ देव असतो.

७. Moreover = एवढंच नाही तर आणखी
➤ The forest was vast and moreover, dense. जंगल मोठं होतं आणखी घनदाटपण.
➤ Moreover, if you think wisely, you will find that every day of the year is a new-year's day. एवढंच नाही तर तू जर शहाणपणाने विचार केला तर तुझ्या असं लक्षात येईल की वर्षाचा प्रत्येक दिवस हा नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो.

८. Otherwise = नाहीतर
➤ Set an alarm, otherwise I will miss my train. अलार्म लाव नाहीतर माझी train चुकेल.
➤ Forgetfulness is a blessing to humanity, otherwise life would have been difficult. विसरणे हे मानवजातीला लाभलेले वरदानच आहे नाहीतर जीवन फार अवघड होऊन बसले असते.

९. Otherwise = 
नेमकं उलटं
➤ I told her not to open the refrigerator until I returned, she did exactly otherwise. मी परत येईपर्यंत फ्रिज उघडू नको असे मी तिला सांगितले होते, पण तिने नेमकं उलटंच केलं.
➤ Be the master of your fate and slave of your heart, but not otherwise! आपल्या नशिबाचे स्वामी आणि हृदयाचे गुलाम व्हा, पण उलटं नको!

१०. Nevertheless = तरीही
➤ I was sick, nevertheless, I attended the school. मी आजारी होतो तरीही शाळेत गेलो.
➤ How many people shall I show you, who are poor, nevertheless, happy? असे किती लोक मी तुम्हाला दाखवू जे गरीब आहेत, तरीही आनंदी असतात?

११. Barring = सोडलं तर
➤ Match will start at 10 am, barring rain. पाऊस नाही आला तर सामना सकाळी १० वाजता सुरु होईल.
➤ Growing old is mandatory; growing wise is optional, barring a few. काही मोजक्या लोकांना सोडलं, तर वृद्ध होणं अपरिहार्य आहे पण शहाणं होणं ऐच्छिक आहे.

१२. Specifically = केवळ, विशेषतः
➤ This dress is specifically designed for pilots. हा पोशाख केवळ पायलट लोकांसाठी बनवलेला आहे.
➤ My favorite thing is to read literature on life, specifically about the moments of love. जीवनावरचं वाङ्मय वाचणं मला आवडतं, विशेषतः प्रेमाच्या क्षणांबाबत.

१३. After all = काही झालं तरी शेवटी
➤ Dreams are after all dreams. स्वप्नं काही झालं तरी शेवटी स्वप्नंच.
➤ After all, everybody has secrets which they never wish to share with anyone. शेवटी प्रत्येकाजवळ काही गुपितं असतात जी कुणीही दुसऱ्यांना सांगू इच्छित नाही. 

As names have power, words have power. Words can light fires in the minds of men. Words can bring tears from the hardest hearts.
― Patrick Rothfuss
१४. At any rate = काही असलं तरी
➤ You should apologize at any rate. काही असलं तरी तू क्षमा मागितली पाहिजे.
➤ At any rate, the prayer never changes God but the person who prays. काही असलं तरी प्रार्थना देवामध्ये काही बदल घडवून आणत नाही, तर ती करणाऱ्या व्यक्तीमध्ये बदल घडवते.

१५. Come what may = काही झालं तरी
➤ We will win the war, come what may. काही झालं तरी आम्ही लढाई जिंकणार.
➤ Come what may, do not drink alcohol to drown your sorrows because, sorrows know how to swim! काही झालं तरी दुःखांना बुडवण्यासाठी दारू पिऊ नकोस कारण कसं पोहायचं ते दुःखांना चांगलं ठाऊक असतं !

१६. By and large/ All in all/ On the whole = एकंदरीत
➤ By and large/ All in all/ On the whole, everything is fine. एकंदरीत सगळं ठीक आहे.
➤ Life is full of good and bad times, but by and large/ all in all/ on the whole we are happy. आयुष्य हे चांगल्या आणि वाईट क्षणांनी भरलेले असते, पण एकंदरीत, आम्ही आनंदी आहोत.
➤ Spirituality, By and large/ All in all/ On the whole is the only science which has reached perfection. एकंदरीत अध्यात्मशास्त्र हे एकमेव असे शास्त्र आहे की जे पूर्णत्वाला पोचले आहे.

१७. As yet = अजूनतरी/ अजूनपर्यंत
➤ I haven't eaten a mango as yet. मी अजूनपर्यंत आंबा खाल्लेला नाही.
➤ I haven't come across anyone as yet who doesn't like the voice of Lata Mangeshkar. लता मंगेशकरांचा आवाज आवडत नाही असे म्हणणारा एकपण व्यक्ती आतापर्यंत माझ्या संपर्कात आलेला नाही.

१८. Thus far = आतापर्यंत
➤ All the attempts to find the lost plane in the sea have been unsuccessful thus far. समुद्रात हरवलेले विमान शोधायचे आतापर्यंतचे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले ठरले आहेत.
➤ Out of the many discoveries I have made thus far, I can say that facts are many but the truth is one. आतापर्यंत जेवढे शोध मी लावले, त्यावरून मी असे म्हणू शकतो की तथ्य अनेक आहेत पण सत्य हे एकाच आहे.

१९. Over and above = खूपच जास्त, सर्वाधिक
➤ The fatality rate of Corona is over and above all predictions. कोरोनाचा मृत्युदर हा सर्व भाकितांपेक्षा अधिक आहे.
➤ The music created by the roar of the waterfall in the silent valley was above and all the best music I have heard so far. शांत दरीमध्ये रोरावत पडणाऱ्या धबधब्यामुळे निर्माण होणारे संगीत हे मी आतापर्यंत ऐकलेल्या सर्व संगीतामध्ये सर्वाधिक सुंदर संगीत होते.

२०. All the more (better) = अधिक (चांगले)
➤ If you can get up before sunrise, all the better. सूर्योदयापूर्वी उठू शकलास तर अधिक चांगले.
➤ Our friendship has become all the more beautiful since our hearts were joined by the rainbow of love.प्रेमाच्या इंद्रधनुष्याने हृदयं जोडली गेल्यापासून आमची मैत्री अधिकच सुंदर झाली आहे.

२१. All over again = सुरवातीपासून पुन्हा सगळं
➤ The farmers had to sow seeds all over again. शेतकऱ्यांना सुरवातीपासून पुन्हा पेरणी करावी लागली.
➤ The secret of success is putting your heart, mind, intellect and soul together and trying all over again after you fail. अयशस्वी झाल्यानंतर आपले हृदय, मन, बुद्धी आणि आत्मा एकत्र करून सुरवातीपासून पुन्हा प्रयत्न करण्यातच यशाचे खरे गमक आहे.

२२. Although / Even though = जरी
➤ Although it is dark, I will walk home alone. जरी अंधार आहे तरी मी घरी एकटा जाईन .
➤ Logic is one thing and common sense another, even though both sound the same. जरी दोन्ही सारखे वाटत असॆ तरी, तर्क एक गोष्ट आहे आणि बुद्धी दुसरी.

२३. To top it off = ह्या सर्वावर वरकडी म्हणून, कळस चढवणे
➤ He scored a double hundred and topped it off with a six on the last ball. त्याने द्विशतक ठोकले आणि शेवटच्या चेंडूवर षटकार मारून कळस चढवला.
➤ Spring has come! There is beautiful sunshine, birds are singing, squirrels running around and to top it off we have a new baby in our house! वसंत ऋतूचं आगमन झालंय! सुंदर उन पडलं आहे, पक्षी गात आहेत, खारी बागडत आहेत आणि ह्या सर्वांवर वरकडी म्हणून आमच्या घरी एका बाळाचं आगमन झालं आहे!

२४. Ironically/ Paradoxically = विपर्यास म्हणून, अनपेक्षितपणे
➤ Ironically/ Paradoxically my cold got better after eating ice-cream. माझी सर्दी आइसक्रिम खाल्ल्यावर अनपेक्षितपणे बरी झाली.
➤ Science has progressed astonishingly. Ironically/ Paradoxically, peace of mind is getting increasingly rare. विज्ञानाने आश्चर्यकारक प्रगती केली आहे. पण विपर्यास असा की मनःशांती अधिकाधिक दुर्मिळ होत चालली आहे.

२५. As such/ With that said = असे असताना
➤ The rainy season is coming. With that said/ And as such we have to plough the field. पावसाळा तोंडावर आलाय. असे असताना आपल्याला शेताची नांगरणी करायला पाहिजे.
➤ Body and mind are like a man and wife. As such/ With that said, they do not always agree with each other. शरीर आणि मन हे एखाद्या नवरा-बायकोप्रमाणे असतात. असे असल्याने, त्यांचे एकमेकांशी पटेलच असे नाही.

२६. Contrary to / As opposed to = ह्याला विपरीत
➤ Contrary to/ As opposed to everybody's expectations, Julia won the gold medal. सगळ्यांच्या अपेक्षांच्या विपरीत, जुलियाने सुवर्णपदक पटकावले.
➤ Too many medicines kill a person contrary to/ as opposed to the belief that they cure the patient. खूप औषधे घेतली म्हणजे माणूस बारा होतो ह्या सर्वसामान्य कल्पनेच्या विपरीत खरं तर, अति औषधांनी माणूस मरतो.
Silence is the language of god,
all else is poor translation.

― Rumi
२७. In the event of = च्या वेळी
➤ Use this phone number in the event of an emergency. आणीबाणीच्या वेळी हा फोन नंबर वापर.
➤ Foxes are showing sincere interest in prolonging the lives of poultry in the event of an election. निवडणुकीच्या काळात कोल्हे कोंबड्यांचे आयुष्य वाढावे म्हणून मनापासून स्वारस्य दाखवीत आहेत.

२८. Sure enough = अपेक्षेप्रमाणे
➤ The weather was stormy, and sure enough, the plane was three hours late. वादळी हवा होती आणि अपेक्षेप्रमाणे विमान तीन तास लेट होते.
➤ Another cycle of 360 days will be complete, and sure enough, your glorious birthday will come, but mind you my dear friend, each time you will be inching closer to your death. ३६० दिवसांचे आणिक एक आवर्तन संपेल आणि तुझा गौरवशाली वाढदिवस परत येईल, पण माझ्या मित्रा, हे विसरू नकोस की प्रत्येक वेळी तू मृत्यूच्या अधिक जवळ गेलेला असशील.

२९. Agreeably = एक चांगली गोष्ट अशी की, मनाला अनुकूल असे
➤ There were no mosquito nets in the hostel, but agreeably, there were no mosquitoes. हॉस्टेलमध्ये मच्छरदाण्या नव्हत्या, पण एक चांगली गोष्ट अशी की तिथे डास नव्हते.
➤ Life gives you many chances to cash in on each failure and those who oblige, agreeably reach the goal. आपल्या चुकांपासुन शिकण्याच्या अनेक संधी जीवन तुम्हाला देतं, आणि जे त्याचा फायदा उठवतात आनंदाने स्वीकृत लक्ष्य गाठतात.

३०. As destiny/ fate/ luck would have it = कर्मधर्मसंयोगाने, नशिबाने
➤ As destiny/ fate/ luck would have it, you have opened the right web-page! कर्मधर्मसंयोगाने तुम्ही एका योग्य वेब-पेज वर आला आहात!
➤ As destiny/ fate/ luck would have it, Napoleon, who once ruled a big empire, died alone on a remote island. नेपोलियन, जो एके काळी मोठ्या साम्राज्याचा अधिपती होता, पण त्याच्या दैवाची गती अशी की, एका दूरच्या बेटावर तो एकटा मरण पावला.

३१. On the same note = त्याच संदर्भाने, त्याच अनुषंगाने
➤ On the same note, I will elaborate further on the subject. मी हा विषय त्याच संदर्भाने पुढे प्रतिपादन करतो.
➤ You do good and bad karma, and on the same note, reap the fruits of those actions. तुम्ही चांगली आणि वाईट कर्मे करता आणि त्याच अनुषंगाने आपल्या कर्मांची फळे भोगता.

३२. This time around = ह्यावेळी, यंदा
➤ We have decided to visit Hemalkasa, this time around. यंदा आम्ही हेमलकशाला भेट देण्याचे ठरवले आहे.
➤ None of you is going to answer, this time around it will be Bobo, the robot. तुमच्यापैकी कोणीही उत्तर देऊ नका, ह्यावेळी बोबो हा रोबोट बोलेल.

३३. Right away = तात्काळ
➤ One can find all the answers on Google right away. गुगलवर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे तात्काळ मिळतात.
➤ A sincere prayer lightens the heavy heart right away and blooms the flowers of gratitude. मनापासून केलेली प्रार्थना हृदय तात्काळ हलके करते आणि कृतज्ञतेची फुले उमलवते.

३४. In ordinary sense = सामान्यतः, ढोबळमानाने
➤ In an ordinary sense, students have performed satisfactorily. विद्यार्थ्यांनी एकंदरीत चांगली प्रगती केली आहे.
➤ Superstitions, in an ordinary sense, are based on such beliefs which have no scientific base. सामान्यतः अंधश्रद्धा ह्या अशा विश्वासांवर आधारित असतात ज्यांना विज्ञानाचा काहीही आधार नसतो.

३५. Die-if-you-must = अगदीच जर
➤ If you absolutely, die-if-you-must, need the best possible technology, you should contact Dr. Kokachino. तुला अगदीच जर सर्वोत्तम प्रकारचे तंत्रज्ञान हवे असेल तर तू डॉ. कोकाचिनो ह्यांच्याशी संपर्क कर.

३६. If you will = म्हणशील तर, सांगायचं झालं तर
➤ If you will, we can start a business in partnership. तू म्हणत असशील तर आपण भागीदारीत एक व्यवसाय चालू करू.
➤ Television to wash our minds and internet to wash our brains, if you will. सांगायचंच झालं तर, मनाची वाट लावायला टी. व्ही . आणि मेंदूची वाट लावायला इंटरनेट.

३७. Over time = काळाच्या ओघात, कालांतराने
➤ Will you remember me over time? काळाच्या ओघात मी तुझ्या लक्षात राहील का?
➤ Children start understanding those things over time which their parents once failed to explain to them. मुले कालांतराने अशा गोष्टी समजू लागतात ज्या कधीकाळी त्यांचे पालक त्यांना समजाऊ शकले नाहीत.

३८. Surprisingly enough = आश्चर्याची गोष्ट म्हणजे
➤ Surprisingly enough, I didn't get a single phone call today. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज मला एकही फोन कॉल आला नाही.
➤ A few square inches on a man's face, surprisingly enough, reveals all the traits of his ancestors, his disappointments and achievements, his talent and ambitions,... everything. माणसाच्या चेहेऱ्यावरचा काहीच चौरस इंच भाग हा त्याच्या पूर्वजांची छाप, त्याची निराशा आणि उपलब्धी, त्याची बुद्धिमत्ता आणि महत्त्वाकांक्षा ... सर्वकाही आश्चर्यकारकरित्या व्यक्त करतो.

३९. In fact/ As a matter of fact/ Admittedly = खरं सांगायचं तर
➤ In fact/ as a matter of fact/ admittedly, the basic necessities of a man today are - food, clothing, shelter and internet. खरं सांगायचं तर, आज माणसाच्या मूलभूत गरज म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट.
➤ In fact/ as a matter of fact/ admittedly, God has given us one face and we make ourselves another. खरं तर, ईश्वराने आपल्याला एक चेहेरा दिलेला असतो आणि आपण त्यावर दुसरा चढवतो.
Words are a pretext. It is the inner bond that draws one person to another, not words.
― Rumi
४०. Remarkably (enough) = विशेष म्हणजे
➤ Remarkably (enough), he could overcome his disability. विशेष म्हणजे, तो आपल्या अपंगत्वावर मात करू शकला.
➤ Remarkably (enough), you can bring your dreams into reality but you have to wake up for it. विशेष म्हणजे, तुम्ही तुमची स्वप्ने अस्तित्वात उतरवू शकता पण त्यासाठी तुम्हाला जागं व्हावं लागतं.

४१. To add to = भरीस भर, च्या सोबतीला
➤ To add to his fears, the lights went off. त्याच्या भीतीत भरीस भर म्हणून लाईटपण गेले.
➤ A man remains unsatisfied throughout his life, to add to it, he can't take away any small fortune he has gathered with him after death. आयुष्यभर माणूस असमाधानीच असतो, आणि त्यातही पुन्हा मृत्यूच्या वेळी जे काही थोडंफार कमावलेलं असतं ते पण घेऊन जाऊ शकत नाही.

४२. Eventually = शेवटी एकदाचा
➤ Eventually, he found the lost donkey. शेवटी हरवलेलं गाढव त्याला एकदाचं सापडलं.
➤ Love begins with a smile and eventually ends in tears. स्मितहास्यामध्ये प्रेमाची सुरवात होते आणि सरतेशेवटी अश्रुंमधे त्याचा अंत होतो.

४३. Every so often = वारंवार, प्रत्येक वेळी
➤ You won't find a pearl in an oyster every so often. प्रत्येक वेळी शिंपल्यामध्ये तुम्हाला मोती मिळणार नाही.
➤ The cuckoo and I feel like whistling every so often. It seems, the spring has arrived! मला आणि कोकिळेला सारखी सारखी शिट्टी वाजवावीशी वाटत आहे. वसंताचं आगमन झालं वाटतं!

४४. As of (this) = च्या पर्यंत, च्या पावेतो
➤ As of today, I have never missed Ramayana on TV. आजपर्यंत मी TV वर रामायण चुकवलेले नाही.
➤ As of this event, everybody thought that life was just a bed of roses. ही घटना घटेपर्यंत प्रत्येकाला असे वाटत होते की जीवन म्हणजे एक गुलाबाची शय्या आहे.

४५. All the way from = पार इथपासून (तिथपर्यंत)
➤ Chant the stotra again all the way from beginning to the end. हे स्तोत्र पुन्हा सुरवातीपासून शेवटपर्यंत म्हण.
➤ All the way from beginning of the creation to this day, the sun has never forgotten to rise and birds to sing. सृष्टीच्या अगदी प्रारंभापासून तर आजपर्यंत सूर्य उगवायचा विसरला नाही आणि पक्षी गायला.

४६. As it turns out = पण असं दिसतंय खरं
➤ Today is the final paper of my exams, but as it turns out, it may need to be postponed due to lockdown. आज माझ्या परीक्षेचा शेवटचा पेपर आहे, पण पण असं दिसतंय खरं की लॉकडाऊनमुळे तो पुढे ढकलावा लागेल.
➤ Everyone wants to be immortal, but as it turns out, everybody is living under the threat of death rather than with the bliss of life. प्रत्येकाला अमर व्हायचं असतं पण असं दिसतं की प्रत्येकजण जीवनातील आनंदाचा आस्वाद घ्यायचा सोडून मृत्यूच्या भीतीखालीच जास्त जगत असतो.

४७. In preference to = च्या ऐवजी, च्या पेक्षा
➤ New Zealand was chosen in preference to Canada due to better geographic location. भौगोलिक स्थानाची अनुकूलता बघून कॅनडाच्या ऐवजी न्यूझीलंडची निवड करण्यात आली.
➤ I would love to stand in front of God with a hundred failures to my credit in preference to a conscience of not doing any effort at all after my death. काहीही प्रयत्न न करण्याची बोच अंतःकरणात घेऊन मृत्यूनंतर ईश्वरापुढे उभे राहण्यापेक्षा शंभर अपयशांचा धनी होऊन उभे राहणे मला जास्त आवडेल.

४८. In all probability/ Most probably = कदाचित नक्कीच 
➤ In all probability, we will touch the shore today. आज कदाचित नक्कीच आपण किनाऱ्याला स्पर्श करू.
➤ Any medicine which fails to give you a refreshing sleep is, in all probability/ most probably not a medicine at all. जे औषध तुम्हाला ताजेतवाने करणारी झोप देऊ शकत नाही ते कदाचित नक्कीच औषध म्हणून गणले जाऊ नये.

४९. What's more = एवढंच नाही तर
➤ He is careless and what's more, he is growing defiant day by day. तो निष्काळजी आहे आणि एवढंच नाही तर दिवसेंदिवस उद्धट होत चाललाय.
➤ We all laugh, what's more, dogs also laugh with their tails! आपण सगळे हसतोच, एवढंच नाही तर कुत्रेसुद्धा आपल्या शेपट्या हलवून हसतात.

५०. Every so often = अगदी नेहेमीच
➤ Our neighbor's cat sneaks into our kitchen and drinks the milk every so often. आमच्या शेजाऱ्यांचे मांजर अगदी नेहेमीच चोरून चोरून आमच्या स्वैपाकघरात शिरते आणि दूध पिऊन जाते.
➤ My intuition is my soul talking to me. It has outsmarted my brain every so often. माझ्या अंतःकरणाचा आवाज म्हणजे माझ्या आत्म्याचे माझ्याशी झालेले संभाषण. त्याने अगदी नेहेमीच माझ्या बुद्धीवर मात केलेली आहे.

५१. Most likely/ In all likelihood = निश्चितच, जवळपास
➤ Most likely/ In all likelihood, his letter will come today. आज निशचितच त्याचं पत्र येईल.
➤ Short tempers most likely/ in all likelihood go hand in hand with long tongues. तापट डोकी आणि लांबलचक संभाषणे जवळपास एकमेकांचे हात धरूनच चालतात.

५२. In a way = एका अर्थाने
➤ In a way, this translation is quite right. एका अर्थाने हे भाषांतर अगदी योग्यच आहे.
➤ In a way, middle age is when your age starts to show around your middle. मध्यम वय म्हणजे एका अर्थाने ते वय, जे तुमच्या शरीराच्या मध्यभागी दिसू लागते.
When I cannot see words curling like rings of smoke round me I am in darkness—I am nothing.
― Virginia Woolf
५३. In every way/ On all accounts/ By all means = सर्वार्थाने, पूर्णपणे
➤ The mission to apprehend the robbers was a failure in every way/ on all accounts/ by all means. दरोडेखोरांना पकडण्याची मोहीम पूर्णपणे अपयशी ठरली.
➤ Promises are in every way/ on all accounts/ by all means like babies - easy to make and hard to deliver! आश्वासने ही सर्वार्थाने तान्ह्या बाळांसारखी असतात - करायला सोपी आणि प्रत्यक्षात आणायला अवघड!

५४. To all intents and purposes = जवळजवळ सगळ्याच बाबतीत
➤ Preparations to launch the spaceship are complete to all intents and purposes. अंतराळयान प्रक्षेपित करायची सर्व तयारी जवळपास सगळ्याच बाबतीत पूर्ण झालेली आहे.
➤ To all intents and purposes, it is not in stars to hold our destiny, but in ourselves. आपले भाग्य जवळजवळ सगळ्याच बाबतीत आपल्या हातात असते, ग्रहताऱ्यांच्या हातात नाही.

५५. For that matter = तसं पाहिलं तर
➤ Who was born perfect for that matter? तसं पाहिलं तर परिपूर्ण होऊन कोण जन्माला आलाय?
➤ For that matter, walking the right path is as good as reaching the destination itself. योग्य रस्त्यानी चालणं म्हणजे तसं पाहिलं तर, गंतव्य स्थानी पोहोचण्यासारखच आहे.

५६. Despite/ In spite of/ Not withstanding = जरी (तरी)
➤ Despite/ In spite of/ Not withstanding heavy rains, the flights continued to operate. मुसळधार पाऊस होता तरीही विमानांची उड्डाणे चालू राहिली.
➤ A good book on your shelf is a friend who remains your friend despite/ in spite of/ not withstanding turning its back on you. तुमच्या शेल्फातले पुस्तक म्हणजे तुमचा एक मित्रच असतो, जो तुमच्याकडे पाठ करून बसलेला असतानाही तुमचा कायम मित्रच राहतो.

५७. Once in a while = कधीतरी, एखाद्या वेळी
➤ I like to have coffee once in a while. मला कधीतरी कॉफी घ्यायला आवडते.
➤ Once in a while, I go to my hometown and feel intensely how I miss my childhood. मी कधीतरी माझ्या गावी जातो आणि आपल्या बालपणाला आपण किती मुकतोय ह्याची तीव्र जाणीव मला होते.

५८. Over the days/ years = काही दिवसानंतर/ वर्षानंतर
➤ All colors fade over the years, except those of nature. निसर्गाचे सोडून सगळे रंग काही वर्षांनी फिके पडतात,
➤ He said,"My art grew over the days because my art was in my heart and my heart in every piece of my art." तो म्हणाला,"काही दिवसांमधे माझ्या कलेत वृद्धी झाली कारण माझी कला माझ्या हृदयात आहे आणि माझे हृदय माझ्या प्रत्येक कलाकृतीत आहे."

५९. If anything/ If nothing else = उलट तरीही
➤ The best doctor in this town treated him, if anything/ if nothing else, his health worsened. ह्या गावातल्या सर्वोत्कृष्ट डॉक्टरने त्याच्यावर उपचार केले, पण त्याची तब्येत उलट खालावली.
➤ You won't get peace of mind by gold, money and fame, if anything/ if nothing else, you get it only through renunciation. तुम्हाला सोनं, पैसा आणि प्रसिद्धी ह्यामुळे मनःशांती मिळू शकत नाही, तर उलट त्यागातूनच तुम्हाला ती मिळते.

६०. None the less = तरीही 
➤ That soldier was injured, none the less, he killed four soldiers of the enemy before he embraced death. तो सैनिक जखमी झाला होता, तरीही मृत्यूला कवटाळण्यापूर्वी त्याने शत्रूच्या चार सैनिकांना ठार केले.
➤ Life is difficult, none the less, it sometimes opens the window to pour sunshine and hope for you through it. जीवन अवघड आहे, तरीही ते अधूनमधून अशी खिडकी उघडतं की ज्यातून तुमच्यापर्यंत सूर्यप्रकाश आणि आशेचे किरण पोहचवले जातात.

६१. As it turned out = पण नंतर असं कळलं/ झालं की
➤ All the boys gathered for the picnic, but as it turned out, only a few could go. सर्व मुले सहलीकरता जमली, पण नंतर असं समजलं की त्यातली थोडीच जाऊ शकतील.
➤ Everyone wants to abandon alcohol, but as it turns out, alcohol doesn't want to abandon everybody! प्रत्येकाला दारूचा त्याग करायचा असतो, पण कालांतराने असं लक्षात येतं की दारूला थोडाच प्रत्येकाचा त्याग करायचा आहे!

६२. By way of = च्या माध्यमातून
➤ You learn lessons in your life by way of difficulties. आयुष्यात येणाऱ्या संकटांच्या माध्यमातूनच तुम्ही धडे शिकता.
➤ The teacher taught us how the clouds are formed by way of this experiment. ढग कसे तयार होतात हे शिक्षकांनी प्रयोगाच्या माध्यमातून आम्हाला शिकवले.

६३. No matter how, Howsoever = कितीही
➤ We will march ahead howsoever it rains. कितीही पाऊस आला तरी आम्ही पुढे कूच करू.
➤ I will keep loving you no matter how you hate me. तू माझा कितीही द्वेष केला तरी मी तुझ्यावर प्रेम करीत राहीन.

६४. Ended up being (verb)
हा शब्दप्रयोग एखादी अनपेक्षितपणे घडलेली गोष्ट सांगताना केला जातो.
➤ Peter approached his boss for hike in his salary but poor guy, he ended up being fired from his job. पीटर आपल्या साहेबांकडे पगार वाढवून मागण्यासाठी गेला पण बिचारा आपली नोकरीच गमावून बसला.

६५. Just for the heck = उगीचंच आपलं, सहजच
➤ "Hi, sorry to disturb your sleep. Called simply.... just for the heck of it!" "तुझी झोप मोडल्याबद्दल सॉरी बरं का. काही नाही... सहजच फोन केला आपला!"
➤ Some people drink alcohol to forget their sorrows, some drink to celebrate the joys and others drink just for the heck of it. काही लोक दुःख विसरण्यासाठी मद्य पितात, काही लोक आनंद साजरा करण्यासाठी पितात, तर काही लोक काही कारण नसताना उगीचच पितात.

६५. in line/ accordance with = च्यानुसार
➤ Lockdown will be released in line with government guidelines. सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार लॉकडाऊन शिथिल केले जाईल.
➤ In matters of love, set your mind in line with your heart; in matters of duty, set it in line with your brain . प्रेमाच्या प्रकरणांमध्ये तुमचे मन हे तुमच्या हृदयाशी निगडित राहू द्या, आणि कर्तव्याच्या बाबतीत तुमच्या मेंदूशी.

६७. On/under the pretext of = च्या बहाण्याने
➤ Under the pretext of Ganesh festival, the boys collect money. गणपती उत्सवाचा बहाणा पुढे करून मुले वर्गणी गोळा करतात.
➤ Don't try to sell brass under the pretext of gold! सोन्याचा बहाणा पुढे करून पितळ विकायचा प्रयत्न करू नकोस!

    निर्दोष इंग्रजी संभाषण, लेखन, व्याकरण ह्या मालिकेमध्ये आपण खालील विषय बघणार आहोत:
१. Transitional phrases in English - संक्रामक इंग्रजी क्रियापदे व वाक्यांश
२. Silly mistakes commonly made while writing English - इंग्रजी संभाषण व लेखन करताना होणाऱ्या सामान्य चुका - भाग १ आणि भाग २
३. Translation from Marathi to English - काही निवडक मराठी वाक्यांचे इंग्रजीत भाषांतर
४. Some important rules in English grammar - इंग्रजी व्याकरणातील काही महत्त्वाचे नियम
५. Selected English words and their meanings - निवडक इंग्रजी शब्द व त्यांचे अर्थ
६. Selected Words from Marathi to English - मराठी TO ENGLISH शब्दमाला – भाग...


DEALS OF THE DAY: AMAZON INDIA


BEAUTY, WATCHES, JEWELLERY, CLOTHES,
ELECTRONICS, ORGANIC HEALTH PRODUCTS