आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, ....। खरोखर, प्रत्येक भाषेसाठी शब्द हे रत्नच असतात. ह्या शब्दमालेपासून आपण मराठी आणि इंग्रजी शब्दांचा विचार करणार आहोत. शब्द माहिती असणं ही झाली एक गोष्ट, तो शब्द 'समजणं' ही आणखी एक गोष्ट आणि
गरज पडेल तेव्हा तो शब्द वाक्यात वापरता येणं ही तर झाली अंतिम सिद्धी! केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द येथे दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - १.
▪ आवेशपूर्ण तळमळ = fervour
Savarkar's speeches used to be full of nationalistic fervour. सावरकरांची भाषणे राष्ट्रीयत्वाच्या आवेशाने भारलेली असत.
▪ एखाद्या व्यक्तीचा/ पदार्थाचा विशिष्ट अंगभूत गुण = idiosyncrasy
Despite the unknown idiosyncrasies of the corona virus, scientists are working to produce covid-19 vaccine. कोरोना व्हायरसच्या अज्ञात स्वभाववैचित्र्यांना न जुमानता वैज्ञानिक लोक covid-19ची लस बनवण्यात गुंतलेले आहेत.
▪ सुस्त आणि मरगळलेला = lethargic
Cloudy weather and oily food made the whole covey lethargic. ढगाळ वातावरण आणि तळलेलं जेवण यामुळे सर्व समुदाय सुस्त होऊन गेला.
▪ अत्यंत सोपे काम = a piece of cake
Riding any horse is a piece of cake for Lucinda Green. कुठल्याही घोड्यावर स्वार होणे म्हणजे ल्युसिंडा ग्रीनच्या डाव्या हाताचा मळ.
▪ एखाद्या गोष्टीतला बारकावा/ वे = nuance(s)
Your ear must be adept at knowing the nuances in classical music. शास्त्रीय संगीतातले बारकावे समजण्यासाठी तुमचा कान तयार असावा लागतो.
▪ भव्य, दिव्य, असामान्य = larger-than-life
Everybody is drawn to Vivekananda after reading his larger-than-life biography. विवेकानंदांचे असामान्य चरित्र वाचून प्रत्येकजण त्यांच्याकडे आकर्षिला जातो.
▪ इतिहासपूर्व = primeval
In the primeval era, Indians knew that the earth moves round the sun. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे इतिहासपूर्व काळात भारतीयांना ठाऊक होते.
▪ समान आवडीनिवडी आणि स्वभाव असलेला = congenial
In your congenial company I feel that I am in my own home. तुमच्या प्रेमळ सहवासात मला आपल्याच घरी असल्यासारखं वाटतं.
▪ रुळलेली वाट = beaten path
Those who were successful in life, tried something other than the beaten path. जे जीवनात यशस्वी झाले त्यांनी रुळलेली वाट सोडून दुसरी (वाट) चोखाळली.
▪ विध्वंसक उलथापालथ घडवून आणणारा = subversive
After the death of Prabhakaran in 2009, all subversive activities of LTTE ceased forever. इ.स. २००९ साली, प्रभाकरनच्या मृत्यूनंतर लिट्टेच्या सर्व विध्वंसक हालचाली थंडावल्या.
<<< ★ पुढील भाग >>>

"One hand extended for help is superior to two joined for a prayer."
- Swami Vivekananda
▪ इतिहासपूर्व = primeval
In the primeval era, Indians knew that the earth moves round the sun. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे इतिहासपूर्व काळात भारतीयांना ठाऊक होते.
▪ समान आवडीनिवडी आणि स्वभाव असलेला = congenial
In your congenial company I feel that I am in my own home. तुमच्या प्रेमळ सहवासात मला आपल्याच घरी असल्यासारखं वाटतं.
▪ रुळलेली वाट = beaten path
Those who were successful in life, tried something other than the beaten path. जे जीवनात यशस्वी झाले त्यांनी रुळलेली वाट सोडून दुसरी (वाट) चोखाळली.
▪ विध्वंसक उलथापालथ घडवून आणणारा = subversive
After the death of Prabhakaran in 2009, all subversive activities of LTTE ceased forever. इ.स. २००९ साली, प्रभाकरनच्या मृत्यूनंतर लिट्टेच्या सर्व विध्वंसक हालचाली थंडावल्या.
<<< ★ पुढील भाग >>>
0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊