वाक्यातील शब्दार्थ लक्षात घेऊन भाषांतर करण्यापेक्षा शब्दार्थ आणि भावार्थ दोन्ही लक्षात घेऊन केले तर ते अधिक परिणामकारक होते. अशीच काही मराठीतून इंग्रजीमध्ये भाषांतर केलेली काही वाक्ये:

Marathi to English translation

निवडक मराठी वाक्यांचे इंग्रजीत भाषांतर
▪ विश्वास बसणार नाही इतक्या पटकन आलास तू. You came incredibly quickly.

▪ मला वाटतं, वातावरण जरा गरम असायला हवं होतं. I wish the atmosphere had been warmer.

▪ सुका मेवा मिळाला तर छानच होईल, पण तो महाग असतो ना? It would be nice to have dry fruits but it is costly, isn't it?

▪ सारख्या काहीतरी खोड्या काढत असतोस. You are always up to some mischief.

▪ श्रेयाने कुठल्या नोकरीसाठी अर्ज केलाय? Which job Shreya has applied for?

▪ माझ्या मागे लागून काही फायदा होणार नाही. It's no good trying to persuade me.

▪ थकवा वाटत असल्याने आज मी लवकर झोपी गेलो. Feeling tired, I went to bed early.

▪ लोकांनी सावकाश गाड्या चालवल्या तर इतके अपघात होणार नाहीत. If people drove more carefully, there wouldn't be so many accidents.

▪ इथे जवळपास हॉटेल कुठेही नाही. There is nowhere any hotel nearby किंवा The hotel isn't anywhere near here.

▪ त्याला थोडंतरी इंग्रजी बोलता येतं. He can speak a little English.

▪ त्याला थोडंसच इंग्रजी बोलता येतं. He can speak little English.

▪ आज मी फक्त उपमाच खाल्लेला आहे. All I have eaten today is upma.

▪ आम्ही संपूर्ण दिवस समुद्रकिनारी घालवला. We spent all day/ the whole day on the beach.

▪ व्यायाम केलास तर निरोगी होशील. If you take exercise, you would be healthy.

▪ हवामान कसंय तिकडे? What is the climate like there?

▪ पॅराशूट किती उंचावरून उडत आहे? How high is the parachute flying?

▪ मला समुद्राजवळची खोली मिळाली. I got a room overlooking the sea.

▪ मला शास्त्रीय संगीतात विशेष रस नाही. I am particularly not interested in classical music.

▪ तू विषयाला सोडून बोलत आहेस. You are talking off topic.

▪ मी तिच्याशी फोनवर बोललो. I spoke to her over the phone.

▪ ती बऱ्यापैकी हुशार आहे पण जरा आळशी आहे. She is quite talented but rather lazy.

▪ नवीन शाळेची सवय व्हायला थोडा वेळ लागेल. It will take some time to get used to new school.

▪ हे कालच्यापेक्षा वाईट नाही. It is no worse than yesterday.

▪ त्या साधूला सर्वथा कसलीही काळजी नाही. The sadhu doesn't have a worry in the world.

▪ किती उंट असतील असं तुला वाटतं? How many camels do you think there are?

▪ मला कॉलेज सोडून बराच काळ झाला. It has been a long time since I left college.

▪ तो कधी शाळेत गेला नाही तरी पाच भाषा अस्खलितपणे बोलू शकतो. He can speak five languages fluently although he never went to school.

▪ वडील रागावतील या भीतीने राहुलने त्याच्या वडलांना काहीच सांगितले नाही. Rahul didn't tell anything to his father lest his father should scold him.

▪ माझ्या कानात काहीतरी गेलाय. I have got something in my ear.

▪ ज्यानेही हे केलं, बरोबर नाही केलं. Whoever did this, has not done fair.

▪ तू आम्हाला आणखी किती वेळ वाट पाहायला लावणार आहेस? How much longer are you going to keep us waiting?

▪ चव विचारात घेतल्यास किंमत जास्त नाही. Considering taste, price is not high.

▪ समुद्र खवळलेला होता ही वस्तुस्थिती असूनसुद्धा ते जलप्रवासाला निघाले. They embarked on the voyage notwithstanding the fact that the sea was rough.

▪ सभा शांततेत पार पडली. The rally went off peacefully.

▪ तुझं झाल्यावर मला दुर्बीण दे ताई. After you with the binoculars, dear sister.

▪ काय करायचं ते कर जा. Do your worst.

▪ नाही रे बाबा. For heaven's sake, no or Hell, no.

▪ कोणीतरी अलार्म चालू ठेऊन दिला. Somebody left the alarm ringing.

▪ आम्ही लाईट बंद करणारच होतो की तू आलास. We were just about to switch the lights off when you arrived.

▪ परमेश्वर करो आणि असे कधी न घडो. Heavens forbid that this should ever happen.

▪ मला हे सोमवारपर्यंत करून पाहिजे. I want it done by Monday.

▪ मी तिच्याकडून नक्षी काढून घेतली. I got her do the embroidery.

▪ त्याचं जेलमध्ये जाणं निश्चित आहे. He is bound to go to jail.

▪ गवतावर चालणे हे गालिच्यावर चालण्याइतकेच आरामदायी आहे. Walking on the grass is just as comfortable as walking on the carpet.

▪ माझं आताच जेवण झालं आणि मला भूक लागलीसुद्धा. I have just had my lunch and I am already hungry.

▪ ते मला असं वागवतात की जसा मी त्यांचा मुलगाच आहे. They treat me as if I were their own son.

▪ अशातऱ्हेने वागणं म्हणजे किती नीचपणा त्याचा? How mean of him to behave like this?

▪ कधीही वेळेवर न येणं म्हणजे किती बेजाबदारपणा तुझा? How irresponsible of you to never come on time?

▪ तुला मोहिमेवर पाठवलं जाऊ शकतं. You may be deployed for the mission.

▪ आपण एक दुसऱ्याचं काही देणं-घेणं लागत नाही. We don't owe each other anything.

▪ मी त्याला बागेत काम करण्यासाठी योग्य समजत नाही. I don't consider him suitable for working in the garden.

▪ वणवा रात्रीतून शमणार नाही. Wildfire won't wane overnight.

▪ तुझे सर जवळपास माझ्या वयाचे आहेत. Your teacher is about my age.

▪ दूरदर्शन हे ज्ञानप्रसाराचं प्रभावी माध्यम आहे. Doordarshan is a powerful medium of spreading knowledge.

▪ ट्रेन सुटतच होती की आम्ही स्टेशनवर पोहोचलो. We reached the station just as the train was leaving.

▪ मी तुला फक्त एवढ्याच वेळेस मदत करू शकतो. I can help you just this once.

▪ आम्ही एक दुसऱ्याला कधीतरी मेसेज करतो. We message each other once in a while.

▪ ह्यानंतरची रेल किती वाजता आहे? What time is the next train?

▪ शास्त्रज्ञ बनायची त्याची तीव्र इच्छा होती. He had a strong desire to become a scientist.

▪ येणार आहेस की नाही मला शुक्रवारपर्यंत सांग. Tell me by Friday where you will be coming or not.

▪ आज बऱ्यापैकी गरम आहे. पण जरा वादळी आहे. It's quite warm today. It's a bit windy though.

▪ जर तू भारतात येणार असशील तर मी तुला माझा पत्ता देईन. I will give you my address if you come to India.

▪ तिचं छान चाललंय. She is doing fine.

▪ केस व्यवस्थित विंचर. Do your hair properly.

▪ बोलायला काय लागतं? It is easier said than done.

▪ चंद्र इथून किती दूर आहे? How far is the moon from here?

▪ तू मला शाळेत सोडू शकतोस का? Can you drop me off at school?

▪ कसले कापड हे? What sort of cloth is this?

▪ पुष्कळ वेळेला दुःख हे दुर्गुणांचे फळ असते. Often misery is the fruit of vice.

▪ तू तुझ्या वर्गातील बहुतेक विद्यार्थ्यांपेक्षा अधिक स्वच्छ राहतोस. You live cleaner than most other students in your class.

▪ आता मी त्याला पूर्वीपेक्षा अनेकदा भेटतो. Now I meet him more frequently than before.

▪ तो स्वखुशीने आला. He came willingly.


▪ सर्वांपेक्षा लवकर कोण येईल? Who will come earliest of all?

▪ स्वदेशभक्ती हा अनेक श्रेष्ठ सद्गुणांपैकी एक श्रेष्ठ सद्गुण आहे. Patriotism is one of the noblest of virtues.

▪ असे थोर संत मी पुन्हा कधी पाहीन काय? Shall I ever see such a holy man again?

Sweet words are like honey, a little may refresh, but too much gluts the stomach.
― Anne Bradstreet
▪ मला इतका जास्त गृहपाठ नको आहे. I don't want so much homework.

▪ एकतर पावसाळा सुरु आहे आणि त्यात कोरोनाची साथ. For one thing, this monsoon and for another this corona epidemic.

▪ आज ना उद्या ते झाड पडणारच होतं. The tree was bound to fall sooner or later.

▪ कोरोनाची लस या महिन्यात येण्याची शक्यता आहे. The Corona vaccine is likely to be available this month.

▪ झाडावर चढत असताना माझ्या पायाला लागलं. I hit my leg while climbing the tree.

▪ जर तू भारतात आलास तर मी तुला पत्ता देऊन ठेवलाय. I have given you my address in case you came to India.

▪ सुगंध कुठून आला ते बघण्यासाठी मी मागे वळलो. I turned around to see where the fragrance came from.

▪ त्याच्या गायनादरम्यान विद्यार्थी पूर्ण वेळ जांभया देत होते. The pupils yawned throughout his singing.

▪ त्याबद्दल त्याची प्रतिक्रिया तिरस्करणीय होती. His reaction to it was repulsive.

▪ तुला हॉटेलमध्ये राहायची गरज नव्हती. You needn't have stayed at the hotel.

▪ ते नैसर्गिकच होतं. It was but natural.

▪ पावसाची शक्यता असल्याने छत्री सोबत घे. Take umbrella with you just in case it rains.

▪ हा विजय प्रयत्नांपेक्षा प्रारब्धाच्या कृपेनेच जास्त मिळालेला आहे. This victory is more as a result of destiny than efforts.

▪ मला उशीर होऊ नये म्हणून मी घाई केली. I hurried so that I would't be late.

▪ उत्सुकतेने मला पुरतं ग्रासून टाकलं आणि मला वेळेचं भान उरले नाही. The curiosity took the best of me and I lost track of time.

▪ हे निश्चित आहे की हा खेळाडू विक्रमाच्या बाबतीत इतर सर्व खेळाडूंना मागे टाकेल. It is certain that this player will beat all other players in records.

▪ मी त्याच्याबद्दल एवढं म्हणेल की तो मेहनती माणूस आहे. I will say this much about him that he is a hardworking person.

▪ काय खायचं हे त्याने स्वतःच ठरवायला हवं. He alone must decide what to eat.

▪ कोणाला आणखी थोडं ice-cream हवंय का? Would anyone like to have a little more ice-cream?

▪ मला टीव्ही पाहण्यापेक्षा रेडिओ ऐकायला जास्त आवडेल. I would rather listen to the radio than watch TV.

▪ तो बऱ्यापैकी चांगला बॉलर आहे पण मुंबईत त्याच्यापेक्षाही चांगले बॉलर्स आहेत. He is quite a good bowler but there are even better bowlers than him in Mumbai.

▪ तो काय बोलला मला बरोबर समजलं नाही. I didn't quite understand what he said.

▪ निर्णय घेण्याअगोदर आपण तिला विचारलेलं बरं. We had better ask her before making a decision.

▪ तू मला सल्ला देण्याची गरज नाही. You need not give me any advice.

▪ तुला अलार्ममुळे कधी जाग अली आहे का? Have you ever been woken up by an alarm?

▪ चोर मागच्या दरवाज्यातून आले असण्याची शक्यता आहे. The thieves are believed to have entered through the back door.

▪ नदी नव्हे, तर समुद्रच मला जास्त भुरळ घालतो. It is not the river that entices me so much as the sea.

▪ मला आणखी काही जास्त म्हणायचं नाहीये. I have nothing more to say.

▪ खात्री बाळग/ निश्चित राहा. Rest assured.

▪ शर्टाची बाही उलटी कर. Turn out the sleeve of your shirt.

▪ ते पक्षी त्यांची घरटी अगदी सोडणार. Those birds will leave their nests altogether.

▪ असा शेतकरी कोणी कधी पहिला आहे काय? Has anyone ever seen such a farmer?

▪ पूर्वी फार भयानक शिक्षा असत. Formerly there used to be dreadful punishments.

▪ गेल्या वर्षी ह्या प्रांतात खूप पाऊस पडला. It rained heavily in this province last year.

▪ तो त्या पदावर आयुष्यभरासाठी आहे. He holds that post for life.

▪ त्याने हल्लीच ते शहर वसवले आहे. He founded that city recently.

▪ ह्या मुलांवर लक्ष ठेवा. Watch over these children.

▪ त्या झाडापर्यंत जा आणि मग डावीकडे वळ. Go as far as that tree and then turn left.

▪ तुझे चिखलाचे बूट गालिच्याला पुसू नकोस. पायपुसणी कशासाठी आहे? Don't brush your muddy shoes on the carpet. What is the doormat for?

▪ जर मित्रांनी मला वेळेवर मदत केली नसती तर आज मी कुठे असतो याची मला कल्पनाही करवत नाही. I can't even imagine where I would be today, were it not for those friends who helped me in time.

▪ वादळी हवा नसती तर किती बरं झालं असतं! Oh, how I wish it wasn't so windy!

▪ जर मी दही खाल्लेच नसते तर मी आजारी पडलोच नसतो. If only I had not eaten the curds, I wouldn't have fallen ill.

▪ मला ह्या ठिकाणाबद्दल जराही कल्पना नाही. I do not have the least idea about this place.

▪ लक्षणीय गोष्ट म्हणजे, एकही रेल्वे लेट नव्हती. Remarkably, no train was late.

▪ अगदी समोरच तुम्हाला पोस्ट ऑफिस दिसेल. You will see the post office straight ahead.

▪ दोन्ही ससे अगदी एक दुसऱ्यासारखे दिसतात. Both rabbits look just like each other.

▪ पायलटकडे जास्त जागरुकपणा असावा लागतो पण सैनिकाकडे त्याहीपेक्षा जास्त जागरुकपणा असावा लागतो. A pilot has to have a lot of alertness but a soldier has to have even more alertness.

▪ आम्ही इथपर्यंत कसेबसे येऊन पोचलो. Somehow, we reached thus far.

▪ चुकवायला नको इतका सुंदर सिनेमा आहे हा. It is too good a movie to miss.

▪ मी सर्व विषयांमध्ये विज्ञानाला सर्वात जास्त महत्त्व देतो. I value science above all subjects.

▪ त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. They had to face a lot of trouble.

▪ अद्याप बरंच काही पाठांतर करायचं बाकी आहे. There still remains a lot of recitation to be done.

▪ आई नेहेमी फोनवर बोलत बसते. Mom is always talking on phone.

▪ तो कधी बेकरी उघडणार तुला माहित आहे का? Do you know when he will open the bakery?

▪ अशी आशा आहे की महागाई कमी होईल. It is hoped that inflation will come down soon.

▪ अवाजवी सहनशीलता नसावी. One should not be unreasonably tolerant.

▪ मी तुला जे काही सांगू शकतो ते एवढंच. It is all I can tell you.

▪ सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते कधीही भांडत नाहीत. Surprisingly enough, they never quarrel.

▪ स्वतःबद्दल सांगायचं तर, मी आजपर्यंत सिगरेट घेतलेली नाही. Personally, I haven't smoked till today.

▪ तो कधी बेकरी उघडेल असं तुला वाटतं? When do you think he will open the bakery?

▪ पूल बांधायला त्यांना एक पूर्ण महिना लागला. It took them a whole month to build the bridge.

▪ कुठल्याही प्राण्याला हाकलून लावणं त्याच्या स्वभावात नाही. It is very unlikely of him to turn away any animal.

Love is like dew that falls on both nettles and lilies.
― Swedish proverb
▪ मारणं वा तारणं परमेश्वराच्या हातात आहे. It is up to God to annihilate or preserve.

▪ लंडनच्या या भागात दुकान विकत घेण्यासाठी खूप पैसे लागतात. It costs a lot to buy a shop in this part of London.

▪ प्रत्येक गोष्टीसाठी रियाला जबाबदार धरणं योग्य नाही. It is not fair to hold Riya responsible for everything.

▪ कुत्री रात्रभर भुंकतात. Dogs bark the whole night.

▪ मांजर कितीतरी तासांपासून गादीवर लोळत आहे. Cat is wallowing in bed for hours.

▪ कॉफीची चव कशी आहे? What is the taste of the coffee like?

▪ असं बोलणं हा मुख्यमंत्र्यांचा मूर्खपणा होता. It was foolish of the Chief minister to talk like this.

▪ आता आपली दूध पिण्याची वेळ झाली आहे. It is time for us to drink milk now.

▪ मला इतक्या सकाळी काही खावंसं वाटत नाही. I don't feel like eating anything so early in the morning.

▪ मला छानपैकी एक ग्लासभर मँगो मिल्कशेक घ्यायची इच्छा झाली. I felt like having a glassful of nice mango milk-shake.

▪ ज्या दिवशी तिचा फोन येत नाही असा दिवस क्वचितच जातो. Hardly a day passes when she doesn't call.

▪ तो जे काही म्हणतो त्यात काही तथ्य नाही. There is no reality in whatever he says.

▪ जेव्हा आम्ही हे ऐकलं तेव्हा आम्हाला खूप बरं वाटलं. We felt very well when we heard this.

▪ नुसता सिगरेट फुंकत बसण्यापेक्षा कामधंदा कर काहीतरी. Do some work instead of just smoking idly.

▪ या कामात खूप समर्पण असावं लागतं. It requires a lot of dedication in this work.

▪ अचानक जोराचा गडगडाट झाला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. There was a sudden clap of thunder and it started to rain in torrents.

▪ त्याने अभ्यास केला नाही याचं मला आश्चर्य वाटत नाही. It doesn't surprise me that he didn't study.

▪ दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यावर माझा विश्वास आहे. I believe in improving myself rather than blaming others.

▪ आपण इडली-सांबर खाऊया किंवा त्याहीपेक्षा चांगलं, मेदुवडा खाऊया. Let's eat idli-sambar or better still let's eat meduvada.

▪ आणि अशाप्रकारे शोधमोहीम संपली. And the search operation thus came to an end.

▪ परीक्षेला फक्त एक आठवडा आहे. It's only a week until the examination.

▪ त्याचं कार्ड खोटं होतं हे नंतर समजलं. It was later found that his card was fake.

▪ बघ बघ, मांजर स्वैपाकघरात शिरलंय. Watch out, a cat has entered the kitchen.

▪ तुला Android जास्त आवडते की iPhone? Do you prefer Android or iPhone?

▪ आता मला जवळपास एवढ्याच घड्याळांची गरज आहे. Now I need almost as many watches again.

▪ तो कितीतरी वेळा पराभूत झाला पण त्यामुळेत्याचा निश्चय अधिकच दृढ झाला. He was defeated several times but that just made his determination all the stronger.

▪ त्याचा महाल कमीतकमी एवढा मोठा आहे. His palace is at least this big.

▪ मी त्याची इंजिनियर होण्याची वाट पाहत आहे. I am waiting for him to become an engineer.

▪ लवकरच लग्न करून घर विकत घेण्याची त्याची इच्छा आहे. He hopes to marry and buy a house soon.

▪ तो भूकंपात वाचला पण पुरात वाहून गेला. He survived the earthquake only to be carried away in flood.

▪ ह्या दुकानात पूर्वी आल्याची मला पुसटशी आठवण आहे. I have a dim memory of having visited this shop before.

▪ त्याच्यावर जिलेब्या चोरण्याचा आरोप ठेवण्यात आला. He was accused of having stolen the jilebis.

▪ सैनिक होण्यासाठी त्याची अतिशय योग्य उंची आहे. He is just the right height to be a soldier.

▪ हा दिवस बघण्यापेक्षा मी जन्मायलाच नको होतं. I had rather never been born than have seen this day.

▪ अगदी शाळेत असल्यापासून आम्ही मित्र आहोत. We have been friends while we were still at school.

▪ ह्या विषयावर वाचलेल्या सर्व पुस्तकांपैकी एकानेही मला काही विशेष चांगलं शिकवलेलं नाही. Of all the books I have read on this subject, none has taught me anything worthwhile.

▪ बहुतेक माणसांना त्यांच्या स्वतःच्या दोषापेक्षा इतरांचे दोष लवकर लक्षात येतात. Most people notice the faults of others sooner than their own.

▪ आपला दर्जा आणि शील ह्याला विशोभित तो काही करणार नाही. He will do nothing beneath his rank and character.

▪ सैनिकांच्या तुकड्या दाट झाडीतून कूच करता झाल्या. The troops marched through the thicket.

▪ मला तुझ्याशिवाय दुसरा मित्र नाही. I have no other friend besides you. or I have no friend other than you.

▪ उठा, जागे व्हा, अन्यथा कायमचेच पडून राहाल! Arise awake or befallen forever!

▪ श्रीमंती आणि सन्मान ह्यापेक्षा समाधान जास्त चांगले. Contentment is better than riches and honor.

▪ त्या माणसाने जुगारापायी आपली सगळी संपत्ती गमावली. That person lost all his wealth through gambling.

▪ तू अशा अटी लादतोस ज्या मला मान्य होणे शक्य नाही. You propose such terms I can not comply with.

▪ हा सर्वात वाईट गुन्हा आहे की ज्या योगे माणूस दोषी असू शकतो. This is the worst crime a man can be guilty of.

▪ प्रवचन देण्यासाठी म्हणून नव्हे तर आराम करण्यासाठी मी इथे आलो आहे. I have come here not to give lectures but to take rest.

▪ हे मात्र मी प्रतिपादन करायला चुकलो. I, however, failed to proclaim this.

▪ कितीही धोके पत्करून मी ते करीनच. I will do it at all risks.

▪ त्याला पुन्हा निरोगी झालेला पाहणे किती सुखद होते! How pleasant it was to see him again in good health!

▪ दुसऱ्यांच्या चुकांना हसणे हा त्याचा एकमेव धंदा आहे. His sole occupation is to laugh at the mistake of others.

▪ अशा लांच्छनास्पद रीतीने वागणे तुझ्यासारख्या मुलाला शोभत नाही. It doesn't befit a person like you to behave in such a disgraceful manner.

▪ काहीही लपवू नकोस, सगळं काबुल कर. Don't conceal anything, confess everything.

▪ आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यास खूप प्रयत्न पडतात. It requires a great deal of effort to get what we want.
Be the reason someone smiles. Be the reason someone feels loved and believes in the goodness in people.
― Roy T. Bennett
▪ माझ्यामते, त्याबाबतीत तू ढवळाढवळ करू नयेस हे अधिक चांगले. In my opinion, you had better not meddle with the affair.

▪ त्याला पुष्कळ गोष्टी करायच्या होत्या. He had a lot of things to do.

▪ त्याला पुष्कळ गोष्टी कराव्या लागल्या. He had to do a lot of things.

▪ माझी पोट भरण्याची विनंती उडवून लावू नकोस. Please do not turn down my request to earn my livelihood.

▪ आपला हेतू सिद्धीस नेण्यासाठी तुला ह्या अडचणींवर मात करावी लागेल. You will have to get over this difficulty in order to accomplish this object.

▪ उपजीविकेसाठी मी तीच उपाययोजना स्विकारण्याच्या बेतात आहे. I am about to adopt the same measures for my subsistence.

▪ त्याच तऱ्हेची खबरदारी तू घ्यावीस हे बरे. You had better take the same precautions.

▪ त्याच्या विनंतीनुसार वागणे मला भाग पडले. I was obliged to comply with his request.

▪ अशा प्रसंगी सद्सद्विवेकबुद्धी वापरून निराशेवर मात करावी. One should get over the frustration by using his conscience on such occasion.

▪ प्रजेच्या कल्याणार्थ त्याने ही योजना कृतीत आणली. He executed this scheme for the welfare of his subjects.

▪ असल्या गुन्ह्याबद्दल त्याला मृत्यूपेक्षाही अधिक कठोर शिक्षा दिली पाहिजे. He should get a punishment more severe than death for this crime.

▪ तुम्हाला आवडत असेल तर तसे वाटू देत, पण सत्य फार वेगळेच आहे. You may think so if you like but the truth is very different.

▪ उदारता आणि मोठेपणा ह्यांचा प्रत्येक गुण त्याच्यात आहे. He has every great and generous quality.

▪ कबुतरांच्या ओरडण्याने प्रत्येक क्षणाला प्रार्थनेमध्ये व्यत्यय येत होता. Every moment, the prayer was being interrupted by the cooing of the doves.

▪ पत्र पोहोचव आणि आजोबांनापण कळव. Deliver the letter and inform grandpa, too.

▪ त्याच्या घरात क्वचितच एखादी भाकर असायची, असलीच तर एक दिवसाआड. There was scarcely any bread in his house and that too, every other day, whenever it was available.

▪ कुठल्याही मनुष्याला अशी ही गोष्ट, जी की त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लावते, कशी आवडेल? How can any person like such a thing which injures his reputation?

▪ वैभवाच्या काळात संयम दाखवणे हे सर्वात मोठे शहाणपण होय. The highest degree of wisdom is to show oneself moderate during prosperity.

▪ बहुतेक करून मला त्यांच्या रितीरिवाजांशी जुळवून घ्यावे लागेल. Most probably, I will have to accustom myself with their traditions.

▪ आपल्या मुलांकडून आपण त्यागले जाणे हे पाहणे म्हणजे किती भयानक गोष्ट आहे! How dreadful it is to see oneself being forsaken by one's own children!

▪ किती वेळ मी तुझी येथे वाट पाहावी अशी तुझी अपेक्षा आहे? How long do you expect me to wait for you here?

▪ काल तो तुझ्याबद्दल चौकशी करत होता पण आज त्याला जरा बरं वाटतंय. He was inquiring after you yesterday but he is feeling somewhat better today.

▪ तुला आवडेल त्या कोणालाही तू हे सांगू शकतोस. You can tell it to whomsoever you like.

▪ मी वर्षाला एक लाख रुपये कमावतो. I earn one lakh rupees a year.

▪ ते एवढ्या किमतीचे निश्तितच आहे. It is certainly worth the price.

▪ पुढील सहा महिने धान्याच्या किमती खाली येतील असे वाटत नाही. It doesn't seem that prices of the grain will come down for the next six months.

▪ अनेक औषधांचा परिणाम दिसला खरा पण कोरफडीइतका उत्कृष्ट नाही. The effect was produced by a number of medicines but none in such a perfect manner as aloe vera.

▪ सगळेजण एकदम माझ्याजवळ येऊ नका, दोघे दोघे-तिघे तिघे या. Don't come near me all at once. Come is twos or threes.

▪ जेवढे दिवस संपलेत तेवढे वाया गेले असं समज. Please note that all those days which are gone are wasted.

▪ मी दूरवर समुद्रात मासे पकडण्यासाठी जातो आणि माझ्या कुटुंबाचे पोट भरतो. I sail deep into the sea to catch fish and feed my family.

▪ त्याने आपली संपत्ती भिकाऱ्यांना आणि विधवांना वाटली. He distributed his wealth partly to beggars and partly to widows.

▪ तो फारसा सुशिक्षित नाही पण त्याला आपल्या कामाची पूर्णपणे जाण आहे. He is not literate enough but he thoroughly knows his duty.

▪ बघण्यासारखे काही नसल्याने आम्ही आपल्या वाटेने गेलो. We went our way because there was nothing worth seeing.

▪ तारुण्य आणि आरोग्य ह्याप्रमाणे, सुखदेखील किंमत कळण्याआधीच निघून गेलेले असते. Like youth and health, happiness is rarely appreciated till it is gone.

▪ त्याला मात्र खूप परिश्रम पडले. He, however, had to take a lot of effort.

▪ सर्व सुसंस्कृत राष्ट्रांकडून पाळली जाणारी हे एक पद्धत आहे. This is a convention observed by all the civilized nations.

▪ एकवेळ प्रेम केलेला मित्रही कधीकधी शत्रू बनतो. A once beloved friend sometimes becomes an enemy.

▪ फुटबॉल इतका सन्मान इतर कुठल्याही खेळाचा केला गेला नसेल. No other sport must have been so much applauded as football.

▪ ह्या मैदानाइतके मोठे मैदान मी ह्यापूर्वी बघितलेले नाही. I have never seen such a large ground / so large a ground as this one before.

▪ मी जेवढे चॉकलेट मागितले त्याच्या दुप्पट त्याने मला दिले. He gave me double / twice as many chocolates I asked for.

▪ त्याची उंची एवरेस्टएवढी आहे. ते एवरेस्टएवढ्या उंचीचं आहे. Its height is the same as that of Everest. It is the same height as Everest.

▪ आम्ही त्या पक्ष्याचे त्याच्या लक्षात येणार नाही अशा रीतीने बराच वेळ निरीक्षण करत बसलो. We sat observing that bird without being observed by it.
After silence, that which comes nearest to expressing the inexpressible is music.
― Aldous Huxley
▪ वक्तशीर असणे तुमचे कर्तव्य आहे; मग इतर तसे असोत व नसोत. It is your duty to be punctual, whether others be so or not.

▪ आमच्या वाडवडिलांमध्ये कृतघ्नता कधी दिसली नाही. Ingratitude was never seen among our forefathers.

▪ सरतेशेवटी, वाट चुकलेल्याला इथे येणं भाग आहे. In the end, someone who has lost his way must come here.

▪ हा एक प्रामाणिक मनुष्य आहे असा तुला त्याच्याबद्दल विश्वास वाटतो काय? Do you believe this fellow to be honest?

▪ विषयांतर करू नकोस. तुझी घोडचूक झाली हे कबुल कर. Do not turn to another matter. Admit that you are grossly mistaken.

▪ अशा प्रसंगी मी कोणाची मदत मागावी हे मला काळात नाही. I do not understand whom I shall ask for help under such circumstances.

▪ मला बघून तुला इतके आश्चर्य का वाटले? Why did you astonish so much to see me?

▪ मी डॉक्टरला बोलावून घेईन. I will have the doctor sent for.

   निर्दोष इंग्रजी संभाषण, लेखन, व्याकरण ह्या मालिकेमध्ये आपण खालील विषय बघ आहोत:
१. Transitional phrases in English - इंग्रजी भाषेला अर्थपूर्ण बनवणारी संक्रामक इंग्रजी क्रियापदे व वाक्यांश 
२. Silly mistakes commonly made while writing English - इंग्रजी संभाषण व लेखन करताना होणाऱ्या सामान्य चुका - भाग १ आणि भाग २
३. Translation from Marathi to English - काही 
निवडक मराठी वाक्यांचे इंग्रजीत भाषांतर 
४. Some important rules in English grammar - इंग्रजी व्याकरणातील काही महत्त्वाचे नियम
५. Selected English words and their meanings - निवडक इंग्रजी शब्द व त्यांचे अर्थ


DEALS OF THE DAY: AMAZON INDIA


BEAUTY, WATCHES, JEWELLERY, CLOTHES,
ELECTRONICS, ORGANIC HEALTH PRODUCTS