हा कॅलरी तक्ता आपल्याला काय खाऊ नये (किंवा काय कमी खावं) हे सांगेल तर पौष्टिक घटक तक्ता आपल्याला काय खावं हे दाखवेल. कॅलरी तक्ता हा वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी आहे तर पौष्टिक घटक तक्ता हा कुटुंबातल्या सर्वांसाठीच आहे.
        दोन्ही तक्ते सारखेच महत्त्वाचे! 😊
   

   कोणतीही वस्तू विकत घेताना आपण तिच्या किमतीबाबत बरेच दक्ष असतो , पण एखादा खाद्यपदार्थ तोंडात टाकताना त्यात किती कॅलरीज आहेत वा तो एकदा शरिरात गेला की काय काय अपाय तो करू शकतो, ह्याबत आपण निष्काळजी असतो. एखाद्या रोगाने शरिरात शिरकाव करून आतमधे उत्तम रीतीने ठाण मांडले की काही वर्षांन्नी मग आपल्याला जाग येते. सध्या विकसनशील देशातील वाढते स्थूलतेचे प्रमाण बघता ह्या गोष्टीची प्रकर्षाने आपल्याला जाणीव होते आणि तेव्हा मग वाटून जाते की ही गोष्ट आधी माहीत असती तर..... तसेच, जे लोक वजन कमी करण्याच्या मोहिमेवर आहेत, त्यांनादेखील आपण खातो त्या पदार्थांमधील कॅलरीजचे ज्ञान असणे आवश्यक आहे . त्यासाठीच हा तक्ता तयार केलेला आहे.


   खालील तक्त्यातून नजर फिरवल्यावर आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, ती म्हणजे कॅलरीच्या अगोदर ~ हे चिन्ह आलेले आहे . ~चा अर्थ आहे ± १५% ह्याचे कारण म्हणजे, प्रत्येक पदार्थातील कॅलरीचे अचूक मोजमाप करून लिहिणे अतिशय अवघड गोष्ट आहे . ही गोष्ट तो पदार्थ ज्या घटकांपासून बनवला आहे त्यांचे प्रमाण, जात इ. विविध बाबींवर अवलंबून असते . तसेच, तो पदार्थ करणारा आचारी, त्याचे स्वैपाकघर  इ. बाबींचादेखील कॅलरी मापनावर परिणाम होतो . जेव्हा आपण म्हणतो की एक वाटी आमरसात  ~१०० कॅलरीज असतात, त्याचा अर्थ एक वाटी आमरसातील कॅलरीचे मूल्यांकन ८५ ते ११५ ह्या रेन्ज्मध्ये होईल .

Compare glass sizes and volumes
Compare cup sizes and volumes

अन्नपदार्थ व त्यातील कॅलरीज मूल्यांकन तक्ता
(FOOD CALORIE CHART)




   (हाच तक्ता पहा इंग्रजीमध्ये: FOOD AND CALORIE CHART)

   वरील तक्त्यावरून काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात येतील.

  १. ज्या पदार्थांतील कॅलरीजचे मूल्य त्या पदार्थाच्या वजन वा आकारमानापेक्षा (ग्रॅम वा मिली ) कमी असते, ते पदार्थ शरीराला अत्यंत पोषक व अहानिकारक असतात. उदा. १ वाटीभर पपईमध्ये (१२० ग्रॅम) फक्त ५० कॅलरीज असतात; पपई आपल्या शरीराला किती पोषक आहे आपण सर्व जाणतोच .

   २. ज्या पदार्थांतील कॅलरीजचे मूल्य त्या पदार्थाच्या वजन वा आकारमानाच्या  (ग्रॅम वा मिली ) दुप्पट वा त्याच्या आत असते, ते पदार्थ शरीराला सर्वसाधारण पोषक असतात . उदा. १ वाटी उसळमध्ये (१६०  ग्रॅम) २५० कॅलरीज असतात . उसळ प्रमाणात खाणे शरीरास चांगले आहे .

     3. ज्या पदार्थांतील कॅलरीजचे मूल्य त्या पदार्थाच्या वजन वा आकारमानाच्या  (ग्रॅम वा मिली ) दुपटीपेक्षा अधिक असते, ते पदार्थ शरीराला हानिकारक असतात, अशा पदार्थांनी जाडी व वजन नियंत्रणाबाहेर जाते. उदा. १ वाटी बटाट्याच्या चिप्समध्ये  (५० ग्रॅम) २१८ कॅलरीज असतात . चिप्स अती खाणे शरीरास चांगले नाही .




आहारशास्त्रावरील उपयुक्त पुस्तके 

१. आरोग्यनिधी by श्री. राजीव दीक्षित
२. हृदय-स्वास्थ्य : आहार व आरोग्य by डॉ. पद्मा विजय
३. स्वयंपाकघरातील दवाखाना by डॉ. बालाजी तांबे
४. सुडौल व्हा, सुंदर दिसा by वृषाली मेहेंदळे
५. मधुमेही लोकांसाठी २०१ टिप्स by डॉ. विमल छाजेड
६. बेस्ट ऑफ फॅमिली डॉक्टर by डॉ. बालाजी तांबे
७. RAMA Gravity Water Filter (24-L) १० वर्षे वॉरंटी