निसर्गात आणि आपल्या घरी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचे औषधी गुणधर्म पोटतिडकीने जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे आणि सेवाभावी वृत्तीने रुग्णांवर उपचार करणारे डॉ. स्वागत तोडकर आज घरोघरी परिचित झाले आहेत. Appointment घेण्यासाठी ज्यांना रोजचे ६००० फोन येतात आणि दोन-दोन महिने ज्यांची अपॉइंटमेंट मिळत नाही असे हे कोल्हापूरचे लोकप्रिय आणि अनेक पुरस्कार विजेते डॉ. स्वागत तोडकर. 'हा उपाय केल्याने तुम्ही बरे होणारच' असे छातीठोकपणे सांगणारे जे काही थोडे डॉक्टर्स आहेत, त्यापैकी डॉ. तोडकर हे एक. हे आजोबा झाले आहेत, नातू आहेत त्यांना. तरीपण ते किती तरुण दिसतात! आपल्या व्यख्यानातून विविध आजारांवर त्यांनी आजपर्यंत जे विविध उपाय व तोडगे सांगितले आहेत, त्यांचं केलेलं हे संकलन.
व्याख्यानात डॉक्टरांची भाषा रांगडी, रोखठोक पण विनोदी असते. काही आजार झाल्यानंतर डॉक्टरांकडे धाव घेण्यापूर्वी खालील घरगुती उपाय करून बघावेत, ही गोष्ट ते कळकळीने सांगतात. अनेकांना ज्या उपचारांचा फायदा झालेला आहे असेच काही उपचार खाली दिलेले आहेत.
*सामान्य आजार आणि डॉ. तोडकर यांचे उपचार
▸सांध्यांचे, मणक्याचे आजार: खारीक, सुकं खोबरं आणि गूळ नियमित खाणे. अश्वगंधा, शतावरी आणि आवळा चूर्ण एकत्र करून घेणे.■ कोंडा: आंघोळीपूर्वी खोबरेल तेल आणि लिंबू एकत्र करून लावणे किंवा, लिंबाची साले पाण्यात चांगली उकळणे आणि ते पाणी थंड झाल्यावर अंघोळीपूर्वी लावणे. तुरटीच्या पाण्याने धुतल्यानेपण कोंडा कमी होतो.
▸त्वचा (मेक-अप न करता) तजेलदार दिसणे: रात्री झोपताना तुळशीच्या पानांचा रस त्वचेवर चोळणे. किंवा, वाळलेल्या संत्र्याच्या सालाची पावडर दह्यात कालवून १५-२० मिनिटे त्वचेवर लावणे, नंतर ओल्या कापसाने काढून टाकणे.
■ तेलकट त्वचा: काकडी आणि बटाटा मिक्सरमधून काढून त्याचा लेप त्वचेवर अर्धा तास लावून ठेवायचा आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाकायचा. त्यानंतर, लिंबाचा रस, पुदिन्याचा रस आणि मध एकत्र कालवून face-pack पंधरा मिनिटे लावून ठेवायचा. हा प्रयोग एक आठवडा करायचा.
▸केस अकाली पांढरे होणे : तुळशीची २१ पाने + आवळ्याची ३-४ चमचे पावडर भिजत ठेवणे. १५ मिनिटे भिजवून केसांच्या मुळांना लावणे व एका तासाने धुणे. असे आठवड्यातून दोनदा करणे. हा उपाय म्हणजे केसांच्या विविध विकारांवर एक षट्कार आहे असे डॉ. तोडकर म्हणतात!
■ स्मरणशक्ती वाढवणे : पाच-सहा बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्यांची साले काढून घेणे. त्यावर एक चमचाभर मध ओतून ते चावून चावून खाणे. हा प्रयोग तीन महिने केल्यानंतर स्मरणशक्ती वाढू लागते. मोठी माणसेदेखील विस्मरण कमी होण्यासाठी हा प्रयोग करू शकतात.
▸नाकातील हाड वाढणे: चार-पाच रिठे आणि एक चमचाभर सुंठ तीन कप पाण्यात आटवून ते पाणी अर्धा कप होईपर्यंत आटवून घेणे आणि थंड झाल्यानंतर गाळून एका बाटलीत भरून ठेवणे. रोज ह्याचे दोन-दोन थेंब नाकात टाकायचे. डॉक्टर म्हणतात, चॅलेंज देऊन हा उपाय करा, तुमचे operation टळलेच पाहिजे!
⬪ त्वचेवरचे काळे चट्टे: बटाट्याच्या चकतीचा त्या डागांवर मसाज करणे.
■ केस गळती: गायीचे दूध घेऊन त्यात खसखस घोटून महिन्यातून एकदा केसांना रात्रभर लावून झोपणे. स्वतः डॉक्टर हा उपाय करतात!
▸मधुमेह: चार सीताफळाची पाने मिठाच्या पाण्याने धुवून घेणे आणि त्यांची देठं काढून चघळून चघळून खाणे. दोन आठवड्यातच शुगर कमी होऊ लागेल, काही दिवसांनी गोळी पूर्ण बंद होईल.
■ मूळव्याध: लिंबू अर्धे कापून घ्या. त्यावर सैंधव मीठ पसरवा आणि ते चोखून खा. असे ३-४ वेळा करा. पाच मिनिटात आग थांबते. ३-४ दिवसांनी मुळव्याधीत कमालीचा फरक पडेल.
*टीप: एका बाईंची २५ वर्षे जुनी मूळव्याध ह्या उपायाने पूर्ण बरी झाली.
▸केसांची उत्तम वाढ: वडाच्या पारंब्यांची पांढरी टोके तोडून खोबरेल तेलात उकळून, गाळून मातीच्या भांड्यात आठ दिवस झाकून ठेवावे. केस धुण्याच्या आदल्या दिवशी ते लावून झोपावे. ह्याच खूप छान उपयोग होतो.
हलणारे दात: मुळ्याचा रस मीठ टाकून किंवा पेरूच्या पानांचा रस ३ आठवडे प्यायचा. दात मजबूत होतात.
प्रोस्टेटचा त्रास: तुरीच्या डाळीचे पाणी पिणे.
■ मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढविणे: कोथिंबिरीची पाने पाण्यात उकळून ते पाणी १/३ आटवून घ्यावे. आणि रोज एकदा असे आठवडाभर घावे.
*टीप: Allopathy च्या औषधांचा अती मारा होऊन निकामी होऊ लागलेले मूत्रपिंड ह्या काढ्याने पुन्हा कार्यक्षम होते.
▸अंगदुखी: रोज रात्री दुधात हळद आणि सुंठ टाकून उकळणे आणि मग पिणे.
■ अंगावरची सूज: बेलाच्यापानांचा काढा दिवसातून ३ वेळा घ्या. एका दिवसात सूज उतरते.
▸चेहेऱ्यावरच्या सुरकुत्या: तुळशीच्या पानांचा रस काढून त्याचा चेहेऱ्यावर मसाज करणे.
■ पित्ताचा त्रास: कडिपत्त्याचा रस १ चमचा उपाशी पिऊन त्यावर कोमट पाणी पिणे.
▸पित्ताशयातील खडे: कारल्याचा रस ५-६ चमचे पिऊन वरून गरम पाणी पिणे. खडे विरघळतात, कधी कधी उलटीद्वारे बाहेर पडतात. वर्षातून ३ दिवस हा प्रयोग करावा.
*टीप: 'पित्ताशय काढून टाका' असा सल्ला ज्यांना मिळालेला आहे त्यांनी हा उपाय जरूर करून पाहावा.
■ शरीरातील उष्णता: बेलाच्या पानांचा रस २-२ चमचे सकाळ-संध्याकाळ घ्यायचा. शरीरातील उष्णता कमी होते. किंवा कापूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचा आणि ते पाणी सकाळी प्यायचे.
▸सर्दी-शिंका-ऍलर्जी: आंघोळ करताना ज्या पाण्याने आपण अंघोळ करतो ते पाणी तोंडात धरावे. शिंका कायमच्या कमी होतात. ज्यांना पहाटे पहाटे शिंका येतात त्यांनी तुळशीच्या पानांचा रस नाकात टाकणेही खूप फायदेकारक. साधा पण अविश्वसनीय तोडगा! गार हवेचा झोत लागून ज्यांना सटासट शिंका सुरु होतात, त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे.
■ हिमोग्लोबिन वाढवणे: गाजराचा रस १५ दिवस पिणे.
▸चाळिशीनंतर चष्म्याचा नंबर घालवणे: विड्याचे पान मिठाच्या पाण्याने धुवून घेणे व हातात कुचकारून त्याच्या रसाचा एक-एक थेम्ब डोळ्यात सोडावा. आठवड्यातून एकदा (नंबर जास्त असल्यास दोनदा) हा उपाय करावा. काहीकाहींचा पहिल्याच आठवड्यात ह्या उपायाने कमी होतो.
*टीप: हा उपाय खरोखरच त्वरित परिणाम दाखवणारा आहे. Computer वर काम करून डोळ्यांना आलेला थकवा ह्याने त्वरित कमी होतो. आठवड्यातून एकदाच करावा.
⬩ जुलाब: अर्धा चमचा मेथीचे दाणे जिभेवर ठेऊन कोमट पाण्यासोबत न चावता घेणे. पोटात गेल्या गेल्या जुलाब थांबतात.
*टीप: जुलाबांवर अनेक प्रकारचे उपाय करून निराशेने ग्रस्त होऊन अंथरूण धरलेली एक रुग्ण ह्या उपायाने पहिल्याच दिवशी आश्यर्यकारकरीत्या बरी झाली!
■ डोकेदुखी,अर्धशिशी: चिमूटभर सैंधव मीठ जिभेवर ठेऊन पाणी प्यायचे. हे मिश्रण पोटात जाण्याआधी डोकेदुखी थांबलेली असेल!
▸कँन्सर न होण्यासाठी: गाजराचा रस काढून वर्षातून १० दिवस पिणे. ह्याने प्रतिकारशक्तीपण वाढते.
■ अपचन व करपट ढेकर: आलं , लिंबू आणि मीठ एकत्र करून खा.
▸कोठा साफ होणे: काळी मिरी टाकून काढा करायचा. रात्री अर्धा चमचा काढा पिऊन त्यावर कोमट पाणी घ्यायचे. दुसऱ्या दिवशी पोट साफ होते.
■ किडनीचे आजार: दगडी पाल्याचा रस १५ दिवस घेणे. मोठे मोठे स्टोन तुकडे होऊन बाहेर पडतात.
▸अपचन, पोटाचे आजार: दुर्वांचा रस प्यायचा. मक्याचे कोवळे कणीस कच्चे खाल्ल्याने पचनशक्ती वाढते.
■ मधुमेह: जेवल्यानंतर सेंद्रिय गुळाचा खडा खायचा. ६० ते ७० हजार लोकांची शुगर ह्या उपायाने कमी झालेली आहे!
▸गुडघेदुखी: अर्धा चमचा जायफळ पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर कोमट तिळाच्या तेलात एकत्र करून गुडघ्यावर रात्री झोपताना चोळावे. सलग तीन दिवसतरी हा उपाय करावा.
■ डोळ्यांचा चष्मा घालवण्यासाठी: तुळशीच्या रसाचे २-२ थेंब डोळ्यात घालावेत.
▸फिटचा आजार: एका दिवसात फरक पडतो! पेरू खायचा. लसूण पाकळी खायची. जेवणात कच्चा कांदा खायचा.
■ दाढदुखी: दुखणाऱ्या दाढेखाली लसूण पाकळी धरायची. दाढदुखी कमी होते.
▸किडनी साफ करण्यासाठी: धणे किंवा कोथिंबिरीचा काढा.
■ पित्त किंवा उष्णतेचे विकार: दुर्वांचा रस किंवा उंबराच्या पानांचा रस प्यायचा.
▸मूळव्याध: सकाळी उपाशीपोटी पेरू सैंधव मीठासोबत खायचा.
■ केस काळे होण्यासाठी: आवळा चूर्ण पातळ होईपर्यंत लिंबू पाळायचे. रात्री झोपताना केसांच्या मुळांना लावायचे. आठवड्यातून दोनदा तरी करावे.
▸खोकला: दालचिनी पावडर टाकून दूध उकळायचे आणि प्यायचे.
■ खोकला: रोज एक वेलदोडा खायचा. घाणेरीच्या पानांमध्ये कपारी कात घालून दिवसातून तीनदा खायचे, असे पाच दिवस करायचे.
▸बसलेला घसा : पाव चमचा कपारी कात उगाळायचा आणि वरून कोमट पाणी प्यायचे. १० मिनिटात घास ठीक होतो.
■ तोंड येणे: पेरूच्या पानांचा रस काढून तोंडात धरून ठेवायचा आणि हळू हळू प्यायचा.
▸ब्लड प्रेशर: नाकाने खोल श्वास घ्यायचा आणि काही वेळ रोखून उसासा टाकल्यासारखा 'हा' असे करत तोंडाने बाहेर टाकायचा. हे सकाळ-सायंकाळ ५-५ मिनिटे करावे. काही दिवसातच BP ची गोळी बंद होते.
*टीप: तुमच्या डॉक्टरांना विचारल्याशिवाय तुमची BP ची गोळी बंद करू नका.
BEAUTY, WATCHES, JEWELLERY, CLOTHES,
ELECTRONICS, ORGANIC HEALTH PRODUCTS
■ हृदयातील ब्लॉकेज: लसणाची एक पाकळी सकाळ-संध्याकाळ १५ दिवस खायची. हृदयातील ब्लॉकेज जसे जसे कमी होत जातील तसा तसा दम लागणे कमी होईल.
▸कोलेस्टेरॉल: पिंपळाच्या पानांचा काढा करून २ आठवडे घेणे.
■ वजन कमी करणे: दर अर्ध्या तासाने १-२ घोट पाणी प्यायचे. वजन हळू हळू कमी होऊ लागेल. तुळशीच्या पानांचा काढा करून प्याल्यानेसुद्धा वजन कमी होते. एका गुरुजींचे ह्या उपायाने एका महिन्यात १२ किलो वजन कमी झाले.
*वाचा: घरच्या घरी वजन कमी करा
▸संधिवात, गुडघेदुखी: पांढरे तीळ रोज चमचाभर चावून खाणे. सकाळी लवकर उठून फिरायला जाणे. अति उशिरा जेवण न करणे. सेंद्रिय व ताजे शिजवलेले अन्न खाणे.
■ मणक्यातील गॅप, सरकलेली चकती: दोन चमचे काळ्या खारकेची पावडर एक वाटी दुधात शिजवून घावी. त्यात एक चमचा तूप घालून नाश्त्याला केवळ हेच खावे. दोन आठवड्यात ४०-५०% गॅप भरून येते.
▸दातदुखी व दातातील कीड: मुळ्याचा रस काढून त्यात २ चिमूट मीठ कालवा. हा रस तोंडातल्या तोंडात दातांमधून फिरवावा. दुखणे लगेच थांबते व कीड तीन दिवसांमध्ये कमी व्हायला सुरु होते.
■ लहान बाळाला वारंवार सर्दी-खोकला होऊन छाती कफाने भरणे: वेखंड उगाळून छातीवर लावणे. बाळाला दूध नेहेमी चांदीच्या वाटी-चमच्यातून पाजणे.
▸वाढलेले पोट कमी करण्यासाठी: चमचाभर तिळाच्या तेलात दोन चिमूट सैंधव मीठ मिसळून पिणे व वरून गरम पाणी पिणे. असे झोपण्यापूर्वी ३ महिने करायचे. रात्रीचे जेवण लवकरात लवकर घ्यायचे.
■ बाळंतपणानंतरचे त्रास: बाभळीचा डिंक टाकून केलेले लाडू खाणे.
▸थायरॉईड: नारळाचे मूळ वाटीभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवायचे. सकाळी ते उकळायचे व ते पाणी थंड करून असे एक महिनाभर प्यायचे. थायरॉईडचा आजार कमी होतो.
■ डेंगू: पपईच्या पानांचा वाटीभर रस रोज आठवडाभर पिणे.
▸कॅन्सर: गाजराचा रस + द्राक्षाचा रस + गव्हांकुर रस प्रत्येकी एक वाटी. तिन्ही रस एकत्र करून महिनाभर पिणे . किंवा, पिंपळ + तुळस + दगडी पाला + उंबर + आघाडा + दुर्वा ह्यांची पाने मिठाच्या पाण्यात धुवून घेऊन त्याचा रस काढणे व दिवसातून दोनदा पिणे. महिनाभरात कॅन्सर कमी होऊ लागतो.
*हे माहिती तुम्हाला?: अमेरिकेतील एक अधिकारी ज्यांना केवळ दोन महिने आयुष्य शिल्लक आहे असे सांगण्यात आले होते त्यांचा कॅन्सर डॉ. तोडकरांनी जडीबुटी औषधोपचार वापरून पूर्ण बरा केला. त्या गर्भश्रीमंत माणसाने डॉक्टरांना त्याबद्दल काही कोटी रुपये देऊ केले, पण निस्वार्थी डॉक्टरांनी ते घेतले नाहीत. बऱ्या झालेल्या रुग्णाच्या मुखावरील हास्य आणि त्याचे आशीर्वाद हीच खरी संपत्ती असे ते मानतात! ह्या निस्वार्थ वृत्तीला त्रिवार वंदन! 🙏🙏🙏
■ उंची वाढवण्यासाठी: पांढरा कांदा किसून घेऊन त्यात थोडा गूळ व वेलदोडा पावडर मिसळायची. रोज सकाळी खायचे. ३ महिन्यात उंचीत फरक जाणवू लागतो.
▸शरीरशुद्धी: तीन दिवस फक्त रवीने घुसळलेले ताक प्यायचे. तीन दिवसानंतर हलका आहार (वरणभात, मुगाची खिचडी, ताकभात) घेणे. ह्या उपायाने शरीरातील अशुद्ध द्रव्ये सगळी निघून जायला मदत होते.
■ स्तनातील किंवा गर्भाशयातील गाठी: पिंपळाच्या पानांचा रस किंवा काढा पिणे.
▸संधिवात, Frozen shoulder : तिळाचे तेल चमचाभर पिऊन वरून कोमट पाणी प्यायचे.
■ गुडघेदुखी, कंबरदुखी, स्पॉण्डिलायसिस: खारीक, सुकं खोबरं आणि गुळ एकत्र करून खायचे.
▸पोटातील उष्णता कमी करणे: जेवणात दही-कांदा खायचा.
■ पोटदुखी: जिरा-ओव्याचा काढा प्या. ५ मिनिटात पोटदुखी कमी होते.
▸सुरमा, खरूज, नायटा: नारळाची करवंटी जाळली तर त्याचे तेल बाहेर येते. हे तेल सुरमा किंवा नायट्यावर लावले तर एका दिवसात गायब होईल.
■ गाठ : बाहेरून उंबराच्या सालीतून निघणारा चिक लावणे.
▸तरुण दिसणे: आघाड्याचे पाच तुरे तीन ग्लास पाण्यात उकळून १/३ काढा करून प्या. किमान ५ वर्षांनी तरुण दिसाल. डॉक्टर स्वतः हा उपाय करतात. बघा पन्नाशीनंतरही किती तरुण दिसतात ते!गणपतीच्या दिवसांमध्ये आघाडा खूप दिसतो, विकायलापण असतो.
*वाचा: शतायुषी लोकांनी सांगितलेली आपल्या दीर्घायुष्याची रहस्ये
■ पचनशक्ती वाढवणे: आंब्याच्या पानांचा काढा प्यायचा. आंब्याची पाने चावून चावून खाल्ल्याने मुखदुर्गंधीपण कमी होते.
▸दारू, तंबाखू सोडणे: पेरूच्या पानांचा काढा करून पिल्याने दारू व तंबाखू खायची इच्छाच कमी होते.
■ पाल, मच्छर, किडे मुंग्या पळवून लावणे: निर्गुण्डीची पाने जाळून धूर करणे.
▸सायनसची डोकेदुखी: तुळशीच्या पानांचा रस काढून नाकात टाकणे.
⬥अर्धांगवायू: लसूण पाकळी रोज खायची.
▸रांजणवाडी: लवंग/चिंचोके उगाळून रांजणवाडीवर लावायची. दुसऱ्या दिवसापासून कमी होते.
■ दाढदुखी: वावडिंग भिजवून, ठेचून पांढऱ्या कापडात ठेऊन दाढेखाली पकडायची. किंवा, निर्गुंडीच्या पानात खडे मिठाचा खडा ठेऊन दाताखाली पकडायचा. पुन्हा कधी दाढ दुखणार नाही!
▸रक्तातील साखर: रोज जेवणानंतर टमाटे न चिरता खा. रक्तातील साखर पूर्ण नियंत्रणात राहील. दोन आठवड्यानंतर तुमची शुगरची गोळी तुमच्या डॉक्टरांना हळूहळू कमी करावी लागेल.
■ अनेक प्रकारचे त्वचाविकार: डाळीचे पीठ लावून अंघोळ करायची. आंघोळीपूर्वी खोबरेल तेलात लिंबाचा रस पिळून त्याने त्वचेवर मसाज करायचा. किंवा, सर्व फळांच्या साली एकत्र करून कुचकारायच्या आणि त्यांत लिंबू पिळून ते मिश्रण अर्धा तास झाकून ठेवायचे. त्यानंतर, ते सर्वांगाला चोळायचे आणि १० मिनिटानंतर आंघोळ करायची.
▸आव पडणे: दह्यात केळ कुचकारून खाणे. दहा मिनिटात आराम पडतो.
■ सांध्यांतून आवाज येणे: रोज चमचाभर तीळ खाणे. किंवा, चमचाभर तिळाचे तेल पिऊन त्यावर कोमट पाणी पिणे.
▸निद्रानाश: रात्री झोपण्यापूर्वी दुधात मध टाकून पिणे.
■ तोंडातील छाले: नारळाचे दूध दिवसातून तीनदा लावणे व पिणे. किंवा, कोरफडीचा गर दिवसातून तीनदा लावणे व खाणे.
▸अकारण भीती/ काळजी: कांद्याचा रस आणि मध प्रत्येकी एक-एक चमचा दिवसातून तीळ वेळा असा महिनाभर घेणे. ह्याचा सर्वाधिक फायदा स्त्रियांना होतो.
■ त्वचेवरील खाज: खाज येणारा भाग तुरटीच्या पाण्याने धुवायचा, खाज कमी होते. ह्या उपायाने सुरकुत्यादेखील कमी होतात.
▸ऊन न लागण्यासाठी: दोन चमचे कांद्याचा रस कानाच्या मागे चोळणे. कोथिंबीर, पुदिन्याचा रस गूळ टाकून पिणे.
■ भाजणे, पोळणे: भाजल्यानंतर त्यावर पाणी न लावता त्यावर मध लावायचा. लगेच धग थांबतें आणि डाग राहत नाही.
▸गॅसमुळे होणारी पोटदुखी: चिरलेल्या लिंबावर अर्ध्या बाजूला काळे मिठ लावा आणि अर्ध्या बाजूला हिंग लावा. हळूहळू चोखून खा. ढेकर सुटतील आणि पोटदुखी कमी होईल.
■ काळे डाग: कडुलिंबाचा रस व तुळशीचा रस दुधात मिक्स करून त्याचा लेप होईपर्यंत आटवायचे. त्यात खोबरेल तेल टाकून काळ्या डागांवर १५ मिनिटे लावून ठेवावा. दोन आठवड्यात काळे डाग कमी होतात.
▸सोरायसिस: कडुलिंबाचा रस व तुळशीचा रस खोबरेल तेलात मिक्स करून उन्हात जाऊन बसायचे. एका तासात फरक पडतो. वर्षानुवर्षे जे लोक सोरायसिससाठी विविध उपचार करीत आहेत, त्यांनी हा उपाय जरूर करून पहावा.
■ भूक लागणे: वावडिंगचा काढा करून पिणे. अर्ध्या तासात भूक लागते.
▸आळस घालवणे: सकाळी उठल्या उठल्या जलदगतीने डोळ्यांची उघडझाप करायची. तोंडात हवा भरून चंबू करायचा. मेंदू आणि डोळे तरतरीत होतात. नंबरही कमी होतो.
■ जखम बरी करणे: पूर्ण पिकलेला पेरू घेऊन त्यात तूप घालून कुचकायचा आणि रोज खायचा. १५ दिवसात कसलीही जखम भरते. दगडी पाल्याचा रस वरून सोडला तरी जखम भरून येते.
▸स्त्रियांचे मानसिक चढउतार: तुळशीच्या पानांचा रस मधातून घ्यायचा.
■ केस मऊ करणे: संत्र्याची साल पाण्यात आटवून ते पाणी आंघोळीपूर्वी केसांना लावणे.
▸संपूर्ण आरोग्य: अंघोळीच्या पाण्यात तुळशीची मंजिरी व कापूर टाकून त्या पाण्याने आंघोळ करणे. तेच पाणी अंघोळ करताना तोन्डातपण धरावे.
■ मेंदूतील ताप: तुळशीच्या मंजिऱ्यांची वस्त्रगाळ केलेली बारीक पावडर नाकाद्वारे हुंगावी. ह्याने मेंदूचा ताप, तापटपणा निघून जातो. नाकातून होणार रक्तस्रावपण कमी होतो.
▸कोड: खूप गरम पाण्याने आंघोळ करू नये. रात्री दूध पिऊ नये.
■ जंत: हरभरे रात्रभर पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी खावेत. १५ दिवसात जंत पडू लागतील.
▸दिवसभर एनर्जी टिकवून ठेवणे: आवळ्याचे तुकडे व दालचिनी पाण्यात टाकून उकळून घेणे व थंड करून त्यात गुल कालवून पिणे. बघा कसा दिवसभर उत्साह राहतो ते.
■ जेवणाला पूर्णत्व यावे म्हणून: यज्ञाच्या शेवटी ज्याप्रमाणे केळ टाकतात त्याप्रमाणे जेवणाच्या शेवटी केले खावे. पचन चांगले होते आणि कोठा चांगला साफ होतो.
टीप: एखाद्या उपायाचा फायदा दिसू लागल्यास तो उपाय अती प्रमाणात करू नये.
कामाचा प्रचंड लोड असल्याने व प्रत्येकाला वैयक्तिक भेटणे शक्य नसल्याने डॉ. तोडकरांनी काही सहाय्यक डॉक्टर्स तयार करून ठेवलेले आहेत. त्यांचे व त्यांच्या कार्यालयाचे फोन नं: ७०३०४११०१०, ७०३०३५१०१०, ७०६६१३२२९९, ७०६६०२१३१२, ८८८८८७३७३७
➤ काही गोष्टी एकत्र खाणे अमृताप्रमाणे असते, जसे --
■ चिंचेबरोबर गूळ
■ मेथीची भाजी आणि गाजर
■ चाकवत आणि दही
■ मक्याचे कणीस आणि मठ्ठा
■ पेरू आणि बडीशोप
■ टरबूज आणि गूळ
■ आमरस आणि तूप
■ कांदा - टमाटा - दही
■ भाताबरोबर दही
■ खरबूज आणि साखर
■ खजूर आणि दूध
■ केळं आणि इलायची
➤ काही पदार्थ खाल्ल्यानंतर जर त्रास व्हायला लागला, तर ते कसे पचवायचे -- ---
◆ वांग्याने त्रास झाल्यास मोहरीचे तेल
◆ मुळा खाऊन त्रास झाल्यास काळे तीळ
◆ हरभरा पीठाने (बेसन) त्रास झाल्यास मुळ्याची पाने,बडीशेप
◆ तिखटाच्या त्रासावर दही/ साजूक तूप
◆ मटार न पचल्यास आले
◆ चिंच/ उडीद डाळ/ सुरण ह्यावर गूळ
◆ लिंबाने त्रास झाल्यास मीठ
◆ आंबा पचवण्यासाठी सुंठ आणि गूळ, मिरेपूड
◆ जांभळं खाऊन त्रास झाल्यास मीठ
◆ सफरचंदाने त्रास झाल्यास दालचिनी पावडर
◆ टरबुजाने त्रास झाल्यास लवंग
◆ पेरूने त्रास झाल्यास बडीशोप
◆ केळं बाधत असेल तर इलायची
◆ बोरं खाऊन त्रास झाल्यास व्हिनेगर
◆ उसाने त्रास झाल्यास बोरं
◆ भात जास्त झाल्यास ओवा पाण्यासोबत
◆ मका खाऊन त्रास झाल्यास ताक प्या
◆ खीर, मिष्टान्न इ. जास्त झाल्यास काळी मिरीपूड
◆ तळलेले पदार्थ पचवायला गरम पाणी वा कॉफी
सौजन्य: कुणीतरी पाठवलेला Whats App मेसेज! 😊
➤ तुम्हालापण कॉफी आवडते का? मग हे वाचा: कॉफीप्रिय रसिकांसाठी खास.. !
Sir metastatic cancer sathi kay upay aahet ???
ReplyDeletePlease read this article: कर्करोगावर किमो- रेडिएशन पेक्षाही अधिक प्रभावी पर्याय आहेत का ?
Delete