प्रतिजैविके आणि लसींच्या (anibiotics and vaccines) युगात जन्माला आलेल्या आपल्या पिढीला आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीबाबत फारच कमी ज्ञान असते, किंबहुना आपल्याला ते कधी करूनच दिले जात नाही. 'औषध घेतल्याशिवाय रोग बरा होऊच शकणार नाही', ही आपल्या मनात कायमच्या दृढ झालेल्या गैसमजुतींपैकी एक आत्मघातकी समजूत. अशावेळी कोरोनासारखा एखादा विषाणू येतो आणि आपल्या अज्ञानाचा गैरफायदा उठवत आपलं आयुष्य उलटंपालटं करून टाकतो. आता, ज्यांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे त्यांच्या वाटेला जाण्याचं विशेष धाडस हा विषाणू करत नाही आणि गेलाच तर पांडवांच्या वाटेला गेलेल्या कौरवांप्रमाणे त्याची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही!

   बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं-वाचलं असेल की अनेक कोरोनाबाधित लोकांमध्ये लक्षणांचा मागमूसही नसतो. ह्याचं कारण म्हणजे त्यांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती. काय ही प्रतिकारशक्ती वाढवता येणं शक्य आहे? खाली काही साधे-सोपे सहज करता येण्याजोगे उपाय दिले आहेत. ह्यातले २-३ उपाय काही दिवस करून बघा आणि स्वतःच अनुभव घ्या. दिवसभर ताजंतवानं वाटणं हे आपली प्रतिकारशक्ती वाढत चालल्याची एक मुख्य खूण आहे. आणि खाली दिलेले उपाय हे केवळ कोरोनासाठीच नाही तर क्षणोक्षणी अन्न-हवा-पाणी ह्यासारख्या माध्यमांतून ज्या असंख्य जंतूंचा आपल्या शरीरावर दिवसरात्र जो भडीमार होत असतो, त्या सर्व जंतूंसाठी लागू आहेत.


१. व्हिटॅमिन सी आणि झिंक (Vitamin C with Zinc): जंतूंचा नाश करणाऱ्या पेशींना चालना देणारे हे दोन प्रमुख घटक आहेत पण बऱ्याच लोकांना अन्नातून ते पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यासाठी काय काय खावे? त्यासाठी निसर्गाने आपल्याला भरपूर पर्याय दिले आहेत. ह्या पौष्टिक घटक तक्त्यावर एक नजर टाका आणि व्हिटॅमिन सी आणि झिंक असलेले तुमच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते अधिक प्रमाणात खा. साध्या पालेभाज्यांपासून तर सुकामेवापर्यंत भरपूर पर्याय ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला सापडतील. पण ज्यांना गोळ्या घेऊनच प्रतिकारशक्ती वाढवावी अशी इच्छा आहे त्यांनी ह्या गोळ्या घेतल्या तरी चालतील. सर्व मेडिकल्समधे आणि online सुद्धा ह्या गोळ्या मिळतात. - Vitamin C with Zinc Tablets


२. प्राणवायू (Oxygen): तुम्हाला ठाऊक आहे का, की सकाळी ४ ते ६ ह्या कालावधीत निसर्ग आपल्यासाठी एक खूप मोठा ventillator लावून बसलेला असतो. आपल्यापैकी किती लोक त्याचा उपयोग करून घेतात? आजारी पडून मग दवाखान्यात जाऊन ventillator लावून घेण्यापेक्षा रोज सकाळी थोडावेळ जे ह्या नैसर्गिक ventillator चा उपयोग करून घेतात त्यांच्यासारखे कोणी भाग्यवान नाहीत. शरीराच्या प्रत्येक पेशीत प्राण फुंकणारा हा प्राणवायू जर आपण काही प्राणायामाच्या क्रियांद्वारा घेतला तर त्याची परिणाकारकता अनेक पटींनी वाढते. Art of Living ची प्रशंसक अनुयायी व अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने प्राणायामाचे काही मुख्य प्रकार सुलभ रीतीने करून दाखवले आहेत, आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा.


३. काढे: आजीबाईच्या बटव्यापासून रामदेव बाबांपर्यंत अनेक जण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध काढ्यांचा तुमच्यावर भडीमार करतील, गोंधळून जाऊ नका! हे काढे अनेक पिढ्या घेत आलेल्या आहेत व ते आयुर्वेदिक असल्याने त्यात नुकसान काहीच नाही, पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवलेली बरी. ती म्हणजे, ह्यातले बहुसंख्य काढे हे अंगातली उष्णता वाढवत असल्याने काही विशिष्ट कालावधीनंतर तोंड येणे, उन्हाळ्या लागणे, हात-पाय-डोळ्यांची जळजळ, झोप ना येणे इ. त्रास होऊ शकतात, त्यासाठी ते कमी प्रमाणात घेणे चांगले. (किंवा आठवड्यातून काही विशिष्ट दिवस). अनेक पौष्टिक घटकांनी युक्त असे च्यवनप्राश हे आयुर्वेदातील एक उत्कृष्ट टॉनिक आहे जे अगदी तान्ह्या बाळापासून तर वृद्धांपर्यंत सर्वांना चालू शकते.


४. होमिओपॅथिक औषधे: होमिओपॅथीचे हे वैशिष्ट्य आहे की ह्यात सरसकट एकच औषध प्रत्येकाला देण्याऐवजी प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीचा थोडा अभ्यास करून त्याच्याशी मिळतेजुळते औषध जर दिले तर ते अधिक अचूक रीतीने काम करते. कधी कधी तर चमत्कार वाटावा असे निकाल आपल्याला बघायला मिळतात! होमिओपॅथीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, काहीही लक्षणे नसताना एखादे औषध जर दीर्घकाळ घेतले तर त्या रोगाची लक्षणे शरीरात निर्माण होतात व ती लक्षणे घालवण्यासाठी आणखी तिसरे औषध द्यावे लागते, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते घेऊ नये. हल्ली कोरोनाची लाट चालू असताना, Arsenic alb 30 ह्या औषधाचा whats app वर बराच प्रचार होताना दिसत आहे. Arsenic alb ची लक्षणे कोरोनाच्या लक्षणांशी बऱ्यापैकी जुळतात, त्यामुळे त्या औषधाचे आठवड्यातून १-२ डोस घ्यायला मुळीच हरकत नाही. काहीकाहींना 30 ऐवजी 200 ची potency (पॉवर) जास्त चांगली लागू पडते. Arsenic alb 200  डोस: ३-४ थेंब घोटभर पाण्यात

    होमिओपॅथिक औषधे potency मधे न घेता Mother tincture form मधे घेतलीत तर ती दररोज व दीर्घकाळपर्यंत कुठलाही side effect न होता घेता येतात. त्या दृष्टीने प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी Echinaecia Q, Azadirecta Q, Tinospora Q हि औषधे घेता येतील. Aspidosperma Q हे तर फार मोठे फुफ्फुस शक्तिवर्धक (Lung tonic) आहे. ही सगळीच औषधे घेण्याची गरज नाही. ह्यातली १-२ घेतलीत तरी पुरे. डोस: ५-१० थेम्ब अर्धा कप पाण्यात दररोज


५. Vaccine (लस): सगळे जग कोरोनाची लस कधी एकदाची येते ह्याकडे लक्ष लावून बसलेले आहे! एकतर, लस घेतली की आपल्याला कोरोना होणार नाही अशी लोकांची श्रद्धा आहे आणि जगभरात शंभराहून कंपन्या लस शोधण्यात अहोरात्र गुंतलेल्या आहेत कारण त्यात प्रचंड पैसाच पैसा आहे! आता, थोडी वस्तुस्थिती समजून घेऊ या. कोरोनाच्या लसीकडून फार अपेक्षा ठेऊ नका हे WHO ने आधीच जाहीर करून टाकले आहे कारण कोरोनाचा विषाणू आपली रचना बदलून नवीन नवीन रूपं धारण करून येतोय, अशावेळी एकच लस प्रभावी ठरू शकत नाही. दुसरी गोष्ट, उद्या कोरोनासारखा आणखी कुठला घातक विषाणू आपल्या सर्वांच्या नशिबात येणार असला (येऊ नये!) तर पुन्हा त्यावर लस शोधून काढण्यात आपण आणखी किती वेळ आणि पैसे खर्च करणार? एक परिपूर्ण आणि सुरक्षित लस तयार होण्यासाठी किमान ३ ते ५ वर्षे लागतात. तेव्हा, ह्यावरचा शहाणपणाचा उपाय म्हणजे अशी लस शोधणे की जी अनेक प्रकारच्या जीवाणू-विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी आपली immune system तयार करेल. Recombinant BCG (rBCG) ह्या लसीने तशी आशा पल्लवित केलेली आहे, त्याचे चांगले निकाल हाती येत आहेत आणि त्या लसीच्या चाचण्या Serum Institute, Pune तर्फे काही देशांमध्ये चालू आहेत. आशा करूया की लवकरच ही बहु-जंतु-प्रतिबंधात्मक लस बाजारात येईल.


६. हलका आहार: आहाराचे दोन मुख्य प्रकार आहेत: Acidic diet आणि Alkaline diet. सोप्या शब्दांत सांगायचं तर, Acidic diet म्हणजे जड अन्न आणि Alkaline diet म्हणजे हलके अन्न. जड अन्न खाऊन प्रतिकारशक्ती कमी होते आणि हलकं अन्न खाऊन प्रतिकारशक्ती वाढते. तळलेले पदार्थ, preservatives टाकून टिकवलेले पदार्थ, पेप्सी, कोकाकोलादी drinks, आंबट पदार्थ हे सगळे Acidic diet मध्ये मोडतात आणि पालेभाज्या, फळे इ. नैसर्गिक स्वरूपातील पदार्थ, दूध, ताक, मोड आलेली कडधान्ये, शिजवलेले पदार्थ हे Alkaline diet मध्ये मोडतात. आपला महाराष्ट्रीयन diet (वरण, भात, भाजी, पोळी) हा मध्यम प्रकारचा आहार आहे. जड अन्नात कॅलरीज जास्त असतात तर हलक्या अन्नात कॅलरीज कमीत कमी असतात. हा कॅलरी तक्ता बघून तुम्हाला आणखी चांगली कल्पना येईल. 


७. आत चला! आत म्हणजे कुठल्याही खोलीत किंवा तळघरात नाही तर स्वतःच्याच आत! तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रातील विविध दिग्गजांची व्याख्याने किंवा प्रश्नोत्तरे ऐकलीत तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की ह्या सर्व लोकांनी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ध्यानधारणेवर खूप भर दिलेला आहे. तर, दररोज ठराविक वेळी नियमित ध्यान करायची सवय लावून घेऊ या आणि जशी बाहेरून प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय आपण वर बघितले तशी थोडी शक्ती आत्म्याकडूनही घेऊ या! 


. Health Score: तुमचा Health Score तुम्ही काढला आहे का? तुमचा Health Score ६०च्या पुढे असेल तर कोरोना काय, कुठलाही जंतू तुमच्यावर आक्रमण करण्याआधी ६० वेळा विचार करेल! चांगला Health Score म्हणजे चांगल्या प्रकृतीचे द्योतक आहे. बघा तुमचा Health Score. 

  हे फळ हुबेहूब कोरोनाच्या विषाणू सारखे दिसते, नाही का? तेव्हा कोरोनासाठी ह्याचा कदाचित उपयोगपण होऊ शकेल! 

Arbutus berry, the corona fruit

  एक गोष्ट नक्की, कोरोना आज ना उद्या आपल्या प्रत्येकाची भेट घ्यायला येणार! एकदा भेटल्यानंतर मग तो आपल्यावर मात करतो की आपण त्याच्यावर मात करतो ह्यावर आपल्या आयुष्याचा पुढचा प्रवास अवलंबून असेल. भेटल्यावर शिवाजी कोण आणि अफजलखान कोण हे तुमची प्रतिकारशक्ती ठरवेल! 😊

   तर ठीकंय, कोरोना आला, आपण त्याचं आक्रमण यशस्वीपणे परतवूनही लावलं, आता पुढे काय? अख्ख्या जगात उलथापालथ घडवून आणणाऱ्या कोरोनाला आपल्यापर्यंत आणण्यामागे निसर्गाचा काही उद्देश होता काय, असे आपल्याला राहून राहून वाटते का? ह्यापासून माणसांनी 'काहीतरी' शिकावं अशी काही संधी निसर्ग माणसाला देऊ इच्छित होता का? एवढं सगळं महाभारत अनुभवूनही आपलं आयुष्य पूर्वीच्याच घडणीनुसार चालू राहणार असेल तर आपण काहीतरी मौल्यवान धडा गमावतोय का? हे सगळं जाणून घेण्यासाठी डॉ. सुनील काळेंचा हा विडिओ नक्की पहा: https://youtu.be/4FQ2JA-vb-0


     ।। भूयेम शरदः शतम् ।।


DEALS OF THE DAY: AMAZON INDIA


BEAUTY, WATCHES, JEWELLERY, CLOTHES,
ELECTRONICS, ORGANIC HEALTH PRODUCTS
● वाचा: विविध देशांतील शतायुषी व्यक्ती व त्यांच्या दीर्घायुष्याची रंजक रहस्ये
● आणखी वाचा: कोरोना व्हायरस : खरोखर किती घातक, कुणासाठी घातक आणि त्यातून कसे बरे व्हाल?