"मी शेकडो वर्षे वय असलेले योगी बघितलेले आहेत...मला संन्यास देणारे श्री. शिवानंद सरस्वती महाराज सध्या १६३ वर्षांचे आहेत. तब्येत खणखणीत. गरुडेश्वर, नर्मदेचा घाट या वयातही चार-चारदा उतरतात, चढतात. ", श्री. जगन्नाथ कुंटे यांच्या 'प्रकाशपुत्र' ह्या पुस्तकात वाचलेले वाक्य मला आठवले. आता अडचण म्हणजे, असे योगी कधी प्रकाशात फारसे येत नाहीत आणि आले, तरी कुठे आपल्या नशिबात त्यांची भेट घडणे लिहिलेले असेल
आणि झाली, तरी आपण तरी कुठे age proof document त्यांना मागत बसणार त्यांचे खरे वय पडताळून बघायला? पण असे काही व्यक्ती आज जगाला ठाऊक आहेत की ज्यांनी यशस्वीपणे काळाशी स्पर्धा करून वयाची शंभरी पार केली आणि त्याबाबत विचारले असता आपली काही रहस्येही जगासमोर मांडली. या यादीतील बहुतेक व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत पण त्यांनी सांगितलेली काही रहस्ये नक्कीच विचार करायला लावणारी आहेत. वाचा -

  १. फौजा सिंग 
वय - १०८ वर्षे मु. पो.- इंग्लंड
 * वयाच्या 101 व्या वर्षी फौजा सिंग ने 26 मैलांची लंडन मॅरेथॉन सात तासांत पूर्ण केली! हे अजून जिवंत आहेत. ह्यांचे वजन फक्त ५३ किलो आहे! 
रहस्य : - शाकाहाराचे सेवन 
        - रोज चार तास चालणे 
        - आजारी पडल्यानंतर औषधे न घेता या नैसर्गिक रित्या बरे होणे
  
२. जॅक रेनॉल्ड्स 
वय - १०५ वर्षे मु. पो. - डर्बीशायर
रहस्य : - सकाळी चहा सोबत आणि संध्याकाळी लेमोनेड सोबत व्हिस्कीचे नियमित सेवन

  ३. रिचर्ड ओव्हरटन
वय - ११२ वर्षे मु. पो. - ऑस्टी‌‍न
 * निवृत्त अमेरिकन युद्ध सैनिक, रोज त्याला आईस्क्रीम, चार कप कॉफी व व्हिस्की लागते
रहस्य : - टेन्शन न घेणे

fitness in old age

  ४. फ्रेडरिक हॅरोल्ड हेल
वय - ११२ वर्षे मु. पो. - न्यूयॉर्क
रहस्य : - मधाचे नियमित सेवन

  ५. गोल्डी मिचेलसन
वय - ११३ वर्षे मु. पो. - मॅसेच्युसेट्स
रहस्य : - रोज मैलोन् मैल चालणं

  ६. कोरा हॅनसेन
वय - ११३ वर्षे मु. पो. - कॅनडा
रहस्य : - सिगरेट व दारूपासून दूर राहणे
        - भरपूर चालणे

  ७. ग्रेस जॉन्स
वय - ११३ वर्षे मु. पो. - इंग्लंड
रहस्य : - सकारात्मक विचार करणे
        - ताणतणावापासून दूर राहणे
        - फ्रिजमधले पदार्थ न खाणे
        - रोज रात्री व्हिस्की पिणे

  ८. वॉल्टर ब्राऊनिंग
वय - ११४ वर्षे मु. पो. - माँटॅना, अमेरिका
रहस्य : - मनाला सारखं कशात तरी गुंतवून ठेवणे
        - भरपूर शारीरिक मेहनत करणे

  ९. डेल्फाईन गिबसन
वय - ११४ वर्षे मु. पो. - पेनिसील्वेनीया
रहस्य : - ईश्वरावरील अढळ विश्वास

  १०. डाॅमिंगा वेलास्को
वय - ११४ वर्षे मु. पो. - कॅलिफोर्निया
रहस्य : - 
आनंदी राहणे

  ११. बर्नांडो लॅपॅलो
वय - ११४ वर्षे मु. पो. - ॲरीझोझोना
रहस्य : - शाकाहार, फळे व पालेभाज्यांचे सेवन
       - सकाळी चारला उठून फिरायला जाणे
       - जंक फूड व red meat पासून दूर राहणे
       - लसूण, दालचिनी व मधाचे नियमित सेवन
       - ऑलिव ऑइलचा मसाज

  १२. एमिलीयानो मरकॅडो डेल टोरो
वय - ११५ वर्षे मु. पो. - प्यूरटो रिको
रहस्य : - हास्यविनोद करणे
        - रोज funcheचे सेवन करणे (मका, दूध, लोणी व कॉर्फि पासून ही डिश बनवली जाते)

  १३. हेंड्रिकजे हेन्री वॅन अँडेल
वय - ११५ वर्षे मु. पो. - हॉलंड
रहस्य : - स्मोकिंग न करणे
       - रोज हेरिंग मासा आणि संत्र्याचा रस पिणे

  १४. अँटोनिआ जिरेना रिवेरा
वय - ११५ वर्षे मु. पो. - फ्लोरिडा
रहस्य : -अनुवंशिकता
        - ब्रँडीचे नियमित सेवन

  १५. क्रिस्टीयन माॅरटेंसन
वय - ११५ वर्षे मु. पो. - कॅलिफोर्निया
रहस्य : - सकारात्मक विचारसरणी
        - अल्कोहल न घेणे (यांना सिगार मात्र रोज लागत असे!)
        - मनमुराद गायन

  १६. जिरोमॉन किमुरा
वय - ११६ वर्षे मु. पो. - जापान
रहस्य : - उठल्यानंतर फिरायला जाणे
        - 'हारि हाची बु' खाण्याची पद्धत अर्थात थोडी भूक शिल्लक असतानाच ताटावरून उठणे

  १७. जेरट्रूड व्हीवर
वय - ११६ वर्षे मु. पो. - आर्कंन्सान्स
रहस्य : -ईश्वरावरील विश्वास
       - सर्वांवर प्रेम
       - शारीरिक मेहनत

  १८. बेसी बेरी कूपर
वय - ११६ वर्षे मु. पो. - टेनेसी
रहस्य : - जंकफूड न खाणे
        - दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ न करणे

  १९. सुसान एलिझाबेथ गिबसन
वय - ११६ वर्षे मु. पो. - अलाबामा
रहस्य : - लोणची खाणे
        - औषधी न घेणे

  २०. नबी तजीमा
वय - ११७ वर्षे मु. पो. - जापान
रहस्य : - गाढ झोपणे

  २१. एमा मार्टिना लुगिया
वय - ११७ वर्षे मु. पो. - मोरॅनो इटाली
रहस्य : -रोज तीन अंडी व चॉकलेट खाणे
        - सकारात्मक विचार व भविष्याबाबत आशावादी राहणे

  २२. चियो मियाको
वय - ११७ वर्षे मु. पो. - योकोहामा, जपान
रहस्य : - स्मोकिंग न करणे
       - ईल मासा व रेड वाइन चे सेवन

  २३. जेननी लुईस कॅलमेंट
वय - १२२ वर्षे मु. पो. - फ्रान्स
रहस्य : - तणावमुक्त जीवन
        - भरपूर पायी चालणे

  २४. स्लेमन अल-माल
वय - १२५ वर्षे मु. पो. - लॅबेनॉन
 * ह्याला १२ अपत्ये होती. ह्याच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान मुलाच्या वयामध्ये ७० वर्षांचे अंतर होते!! 😲
रहस्य : - रोज दोन मैल चालणे
       - मॅजिक हर्बल टी चे रोज सेवन
       - मधाचे सेवन

  * ह्या यादीवरून काही रंजक गोष्टी आपल्या ध्यानात येतील -
  १. ही रहस्ये म्हणजे काही जगावेगळी रहस्ये नाहीत, त्या बहुतेक सर्वसाधारण गोष्टीच आहेत. पण ती पाळण्यामागचा प्रदीर्घ नियमितपणा हा दीर्घायुषी होण्याच्या मागचा निर्णायक घटक असावा.
  २. दीर्घायुषी होण्याच्या बाबतीत पुरुषांसोबत स्त्रियापण मागे नाहीत.
  ३. आश्चर्य म्हणजे ह्यांमधे भारतीय योगाभ्यास वा प्राणायाम ह्याचा कुठेही उल्लेख नाही!
  ४. ह्यातील बरेच जण व्हिस्की, ब्रँडी वा वाईन घेणारे आहेत! 😳त्यामुळे अल्कोहोल सेवनाने आयुष्य वाढते की कमी होते हा संशोधनाचा विषय ठरावा !!
  ५. नैसर्गिक आहार घेणे व जंक फूड टाळणे, ह्याबाबत कुणाचेही दुमत नाही.


 आणखी वाचा: ११४ वर्षांचा बरनँडो सांगतोय आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य
Always use organic products like honey, fruit juice, spirulina, green tea, dark chocolate under Health and personal care of Amazon

केमिकल विरहित सेंद्रिय उत्पादने


QUALITY ORGANIC PRODUCTS