'थंड रात्री आणि उष्ण दिवस' म्हणजे श्वसनसंस्थेच्या विषाणूंसाठी अत्यंत अनुकूल हवामान. ह्याला कोरोना व्हायरस COVID-19 देखील अपवाद नाही. जगभरातील विविध ठिकाणांहून रोज नवीन नवीन केसेस समोर येत असल्याने लवकरच कोरोना व्हायरस COVID-19 हा जागतिक महामारीचे रूप घेईल असे WHO ने आताच जाहीर करून टाकले आणि मुंबई स्टॉक मार्केटचा BSE Sensex देखील गेल्या ३ दिवसात २००० ने कोसळला! परंतु घाबरायचे काहीही कारण नाही कारण कोरोना व्हायरसच्या साथीपेक्षा त्याने पसरवलेली भीतीची साथ अधिक जोरात आहे, ही खरी वस्तुस्थिती आहे. पुढील विवरण वाचा म्हणजे वस्तुस्थिती तुमच्याही लक्षात येईलच.
कोरोना व्हायरस COVID-19 हा प्रसार माध्यमे दाखवतात तेवढा घातक मुळीच नाही!
पुढील आकडेवारी बघा -
१. आजच्या घडीला कोरोना व्हायरस COVID-19 मुळे होत असलेला मृत्यू दर हा ३.४% आहे. ह्याचा अर्थ, ह्या व्हायरसने बाधित झालेल्या दार १०० रुग्णांमधून ९६.६ रुग्ण बरे होत आहेत. ही आकडेवारी आशादायक नाही का? प्रसार माध्यमे मात्र असा प्रचार करीत आहेत की कोरोना व्हायरसला करुणा नाहीच मुळी आणि एकदा का तो तुमच्या शरीरात शिरला की समजा आता आटोपलेच सगळे!
२. होणाऱ्या मृत्यूंपैकी ८५% मृत्यू हे सत्तरी ओलांडलेल्या रुग्णांमध्ये होत आहेत. ह्याचा अर्थ, रुग्णाचे वय जर ७० पेक्षा कमी असेल तर कोरोना व्हायरस COVID-19 मुळे होणाऱ्या त्याच्या मृत्यूची शक्यता ही केवळ ०.५% एवढी राहते. गेल्या शतकात फ्लूच्या साथींनी जगभरात जे थैमान घातले होते, त्यांत झालेल्या मृत्यूंपेक्षा हे प्रमाण तर फारच कमी आहे.
३. कोरोना व्हायरस COVID-19 मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे शहरी भागात विशेष करून ज्यांना मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा इतर जुनाट आजारांनी ग्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये अधिक आहे. ह्याचा अर्थ, तुम्ही शहराच्या प्रदूषित वातावरणापासून दूर एखाद्या गावी नैसर्गिक, निरोगी वा आरोग्यदायी वातावरणात राहात असाल तर अशा ठिकाणी मृत्यूची शक्यता खूपच कमी आणि बरे होण्याची शक्यता खूपच जास्त.
४. COVID-19 ह्या कोरोना व्हायरसचा incubation peroid (रोगजंतूंनी शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर प्रत्यक्ष रोगास आरंभ होईपर्यंत काळ) हा २ ते १४ दिवस एवढा आहे, जो रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असतो. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इतर प्रकारच्या कोरोना व्हायरसच्या incubation peroid पेक्षा (जो ५ दिवसांपेक्षा जास्त नसतो, सरासरी २ दिवस) खूपच दीर्घ आहे. ह्याचा अर्थ, तुमचे राहणीमान उत्तम असेल किंवा वेळीच प्रतिबंधात्मक उपाय तुम्ही सुरु केले असतील तर त्या विषाणूला काबूत आणायला तुमच्या शरिरास पुरेसा कालावधी मिळतो.
विविध संसर्गजन्य आजार व मृत्यूचे शेकडा प्रमाण - तक्ता
आता वरील तक्ता बघून ठरवा कोरोनाला अधिक घाबरायचे की टी.बी.ला!इतर विषाणूंच्या तुलनेत कोरोना व्हायरस COVID-19 चे वैशिष्ट्य
श्वसनसंस्थेचे आजार निर्माण करणारे जवळजवळ सर्वच विषाणू नाका -तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि सरतेशेवटी ते फुफ्फुसांवर आक्रमण करतात. COVID-19 चे आवडीचे ठिकाण म्हणजे फुफ्फुसाच, पण इतर विषाणूंप्रमाणे ह्या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर नाक वाहत नाही, शिंका येत नाहीत व घसा धरत नाही. ह्याची मुख्य लक्षणे म्हणजे, ताप,अंगदुखी, कोरडा खोकला आणि धाप लागणे. ह्याने बाधित झालेल्या २०% लोकांना ऑक्सिजनची व दवाखान्यात दाखल करण्याची गरज भासते.
हा विषाणू वातावरणात किती काळ जिवंत राहतो?
असे आढळून आले आहे की, जसे जसे तापमान कमी होते आणि हवेतील आर्द्रता वाढते, तसा तसा COVIT-19 चा प्रसार झपाट्याने होतो. चीनच्या वुहान प्रांतात, जेथे जानेवारी-फेब्रुवारीत ह्या व्हायरसचा एखाद्या बॉम्बस्फोटाप्रमाणे प्रसार झाला, त्यावेळी तेथे तापमान ८-१०°C आणि आर्द्रता ७५% होती. ह्याबाबत शास्त्रज्ञांचे एकमत नाही असे दिसते कारण येणारे reports वेगवेगळी आकडेवारी दाखवतात. काहींचे म्हणणे आहे की हा विषाणू हवेत १२ तासच जिवंत राहतो तर काही शास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीनुसार, ४-५°C तापमानाला हा विषाणू ४ आठवडे, Air conditioning च्या २५°C तापमानाला साधारण २ आठवडे व ४०°C च्या वरील तापमानात १ आठवडा जिवंत राहू शकतो. त्या कालावधीत त्याने मानवी शरीरात प्रवेश केला तर आणखी २ आठवडे रक्तात त्याचा प्रसार होतो आणि त्यानंतर आजारपणाच्या लक्षणांना सुरुवात होते. आपल्या शरीरात अशाप्रकारे हा विषाणू घेऊन फिरणारा व्यक्ती आपल्या संपर्कात येणाऱ्या शेकडो-हजारो लोकांना शिंका-खोकला-थुंकीवाटे त्याला संक्रमित करू शकतो. अशा व्यक्तीने नाकावर मास्क बांधल्याने एक फायदा असा होतो की ही व्यक्ती शिकल्या-खोकल्यावर निदान वातावरणात तरी हा विषाणू पसरू शकत नाही.
मास्क कोणता वापरावा?
आज कोरोना व्हायरस COVID-19 भारतात दाखल होऊन १ वर्ष झाले. चहूकडून बातम्या येत होत्या की सुरवातीला बाजारात मास्कचा तुटवडा (online सुद्धा) निर्माण झाला होता आणि त्याच्या किमती खूपच वाढल्या होत्या! सव्वाशे कोटींच्या देशात, जिथे बहुतांश सामान्य जनता आरोग्याबाबत विशेष ज्ञानी नाही, तिथे ह्या गोष्टी घडल्या नाहीत तरच नवल!
COVID-19 व्हायरस आणि मास्क याबाबत काही सत्य आणि तथ्य जाणून घेऊया.
मास्क जेवढा महाग तेवढा तो उत्तम, हा गैरसमज सर्वप्रथम डोक्यातून काढून टाका. एक ध्यानात घ्या की व्हायरसपासून तुमचे १००% रक्षण करेल असा एकही मास्क जगात उपलब्ध नाही! ह्याची काही करणे आहेत. पहिले कारण, वैद्यकीय क्षेत्रात सर्वोत्तम मानले जाणारे FFP2 व N95 प्रतीचे मास्क ९५% पर्यंत हवा शुद्ध (filter) करू शकतात, १००% नाही. N95 मास्क कमीत कमी 0.3 μm पर्यंतचा आकार असणाऱ्या जंतूंना प्रतिबंध करू शकतो, COVID-19 व्हायरसचा आकार आहे 0.1 μm, तो मास्कमधून सहज आत जाऊ शकतो. दुसरे कारण, मास्क बांधल्यानंतर नाक व गालाभोवती ज्या फटी राहतात त्यातून लाखो जंतू आरामात येजा करू शकतात. तिसरे कारण, व्हायरस हे डोळ्याच्या पापण्यांच्या कडेला असणाऱ्या द्रवामधून शरीरात सहज प्रवेश करू शकतात. काय काय झाकाल? 😰 शिवाय, असले मास्क काही तासानंतर टाकून द्यावे लागतात व नवीन काढावे लागतात. N95 ची आजची किंमत आहे २०० रु. ज्याला परवडेल त्याने तो वापरावा.
ह्यावर सामान्य माणसाला परवडेल असा माफक तोडगा म्हणजे सहज काढून धुता येईल असा जाड कापडाचा मास्क वापरणे. हा कुठेही मिळतो, घरीही बनवता येतो. रुग्णाने तर मास्क वापरणे अनिवार्य आहे कारण जंतूंचा प्रसार तोच वातावरणात करीत असतो. आणि हे जंतू आपल्या नाका-तोंडात जाऊ नये म्हणून निरोगी माणसानेदेखील तो वापरणे आवश्यक आहे. ह्याने देखील बऱ्याच प्रमाणात जंतूंना प्रतिबंध होईल. आमच्या दवाखान्यात आम्ही असलेच मास्क वापरतो. नुसते मास्क वापरून चालणार नाही, त्यासोबत घ्यायची इतर खबरदारीदेखील लेखाच्या शेवटी दिलेली आहे.
अत्यंत प्रभावी विषाणू प्रतिबंधात्मक आणि रोगनिवारक औषधे
आपणाला माहितीच असेल की विषाणू हे अँटिबायोटिक्सना जुमानत नाहीत (रंगीबेरंगी अँटिबायोटिक्सकडे आपण फार लवकर आकर्षित होतो, आपलं दुर्दैवं!); पण अशी काही औषधं आहेत की कुठल्याही प्रकारचा विषाणू असेना का, कित्येक शतकांपासून ज्यांनी आपली उपयुक्तता वारंवार सिद्ध केली आहे, अशी काही औषधे आपण पाहूया.
प्रतिबंधात्मक औषधे
१. लिंबू-मध-पाणी: पहिल्या महायुद्धानंतर पसरलेल्या फ्लूच्या साथी व १९३१ मध्ये लंडनमध्ये पसरलेल्या फ्लूच्या साथीमध्ये ह्या घरघुती औषधाने भल्या भल्या औषधांना मागे टाकत आपले वर्चस्व सिद्ध केले व लाखो जीवांना मृत्यूच्या जबड्यात जाण्यापासून वाचवले. तेव्हापासून 'A lemon a day keeps influenza away' ही म्हण तिकडे प्रचलित झाली. (तेव्हा लोक फक्त लिंबू-पाणी घेत, मध नंतर आला!) मधाचा समावेश केल्याने ह्या औषधाचे विषाणू प्रतिबंधात्मक गुणधर्म अतिशय वाढतात. जेव्हा लिंबू उपलब्ध नसेल तेव्हा आवळा पावडर वापरली तरी चालेल. आवळ्यात Vitamin C भरपूर प्रमाणात असते आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी Vitamin C आणि झिंक आवश्यक आहे हे आपण विसरता कामा नये. कोणकोणत्या खाद्यपदार्थांत Vitamin C आणि zinc अधिक असते ते बघण्यासाठी हा तक्ता उघडा.
दिवसाची सुरुवात चहासारख्या पेयाने करण्याच्या ऐवजी लिंबू-पाणी-मधाने करणे कधीही आरोग्यकारक कारण त्याचे इतरही अनेकानेक फायदे आहेत.
Organic honey, Amla powder
२. लसूण आणि हळद: अनेक प्रकारचे जीवाणू आणि विषाणू ह्यांचा नाश करणारी अनेक उच्च दर्जाची प्रतिजैविके लसूण आणि हळदीत ठासून भरलेली असतात. लसूण + हळद + मोड आलेले मूग हा उत्कृष्ट प्रकारचा औषधी आहार (नाश्ता) होऊ शकतो ज्याने अनेक प्रकारचे आजार विनासायास आटोक्यात येतात अथवा डोके वर काढत नाहीत. फोडणीच्या गरम तेलात टाकल्याने लसूण व हळदीचे बहुतेक औषधी गुणधर्म नष्ट होऊन जातात, त्यामुळे त्याचे फायदे विशेष असे आपल्याला जाणवत नाहीत. त्यामुळे ते कच्चेच खावे. एखाद्या भागाला जंतुसंसर्ग झाला असेल तर ह्याची पेस्ट वरून लावली तरी चालते आणि नियमित खाल्ले तर उत्तमच.
३. चाटण: तुळशीची पाने-आलं-पारिजातकाचे पान ह्यांचा रस काढून त्यात तेवढ्याच प्रमाणात मध मिसळून चाटण बनवून ठेवावे आणि दिवसभर येता-जाता चाटत राहावे. त्यात थोडी ज्येष्ठमध पावडर टाकायला पण हरकत नाही. श्वसनसंस्थेच्या अनेक आजारांवर हे उत्कृष्ट औषध आहे, त्याने रोगाच्या लक्षणांची तीव्रता तर कमी होतेच, पण रोगाचा कालावधीपण कमी होऊन रोग लवकर आटोक्यात यायला मदत होते.
४. कापूर-धूप जाळणे: धूप आणि कपूर जाळल्याने वातावरणाची शुद्धी होते. अनेक प्रकारचे जंतू मारण्याची क्षमता धूप-कापराच्या धुरामध्ये आहे. यज्ञाने होणाऱ्या ज्या अनेक प्रकारच्या शुद्धी आहेत त्यात वातावरणाची शुद्धीदेखील आहेच. शाळा, दवाखाने इत्यादी गर्दीची ठिकाणे जंतुविरहित करायला हा खूपच सोपा आणि प्रभावी उपाय आहे. आणखी एक सोपा उपाय म्हणजे सध्या पाण्यात निलगिरी तेलाचे काही थेम्ब टाकून त्याचा खोलीत चहूकडे (पडदे, चादरी, फर्निचर इ. वर) स्प्रे करणे.
कोरोना रोगनिवारक औषधे
२. Aspidosperma Q : ब्राझीलमधील एका वनस्पतीपासून ह्याचे tincture बनवतात. Aspidosperma हे फुफ्फुसाचे फार प्रभावी टॉनिक आहे. ह्या फोटोमध्ये दाखवलेल्या ह्या वनस्पतीच्या फळांकडे बघा. श्वासनलिका अन् त्याला जोडलेली दोन फुफ्फुसे ह्याची आठवण आपल्याला होईल. ह्या औषधाचे पाण्यात ८-१० थेंब घेतल्यावर शरीरात नवचैतन्याचा संचार झाल्यासारखे वाटते, ह्याचे कारण म्हणजे ही वनस्पती फुफ्फुसातून रक्तात जाणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते. ह्यात निलगिरी तेलाचा १ थेंब टाकून घेतल्यास अति उत्तम. Aspidosperma Q चे डोस Echinacia प्रमाणेच आहेत. Eucalyptus oil Aspidosperma Q
होमिओपॅथी दुकानांमध्ये ही दोन्ही औषधे वाजवी किमतीत मिळतात.
ह्या आजारावर लस कधी मिळेल?
साथ आली की तुम्हाला-आम्हाला पडणारा हा पहिला प्रश्न! साहजिक आहे ते. चीन व इस्राएलमध्ये कोरोना व्हायरस COVID-19 वर लस (vaccine) शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत; तथापि प्राणघातक रोगावर लस शोधण्यात काही महत्वाच्या अडचणी असतात, त्या समजून घेणे आवश्यक आहे. एकतर, कुठलीही लस पहिल्यांदा तयार करण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी सहज निघून जातो. दुसरे म्हणजे, एकदा का लस तयार झाली आणि त्याला FDA ची मान्यता मिळाली की त्या लसीची मानवी स्वयंसेवकांवर चाचण्यांची अनेक आवर्तने करावी लागतात, ज्यात काही महिने सहज निघून जातात. अशा आजाराला एकतर मानवी स्वयंसेवक मिळणे फार कठीण. सगळं काही मनासारखं होऊन एकदाची ही लस बाजारात उपलब्ध झाली की त्याची सामान्य जनतेत परिणामकारकता दिसून यायला पुन्हा काही महिने जातात, तोपर्यंत इन्फ्लुएंझाचा विषाणू आपले रूप बदलून नवीन स्वरूपात वातावरणात दाखल झालेला असतो!! 😩 स्वाईन फ्लू आणि HIV च्या लसीसाठी जग कित्येक वर्षे आतुरतेने वाट बघत आहे, पण व्यर्थ!तेव्हा, हाती असलेले उपाय सोडून पळत्याच्या मागे लागणं ह्या आजाराच्या बाबतीत तरी तितकंसं शहाणपणाचं नाही.
साथीच्या काळात प्रत्येक नागरिकाने घ्यावयाची खबरदारी:
- इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू
साथीचा काळ म्हणजे एक युद्धजन्य परिस्थिती. अशा परिस्थितीत प्रत्येकाने सर्वतोपरी शक्य तेवढी काळजी घेणे आवश्यक आहे.
१. रस्त्यावर थुंकणाऱ्यांना कडक शब्दात समज द्या.
२. वारंवार काढून धुता येतील असे कापडी मास्क वापरा.
३. धूप वा कापूर जाळून, निलगिरी तेल पाण्यात मिसळून व त्याचा स्प्रे फवारून खोलीतले वातावरण जंतुनाशक ठेवण्याचा प्रयत्न करा.
४. अधूनमधून हात पुसण्यासाठी alcohol based hand sanitizerचा वापर करावा.
५. शिंकणाऱ्या व खोकणाऱ्या व्यक्तीपासून ५-६ फुटाचे अंतर ठेवा.
६. प्रवास, लग्न समारंभ, चित्रपट इ. गर्दीच्या ठिकाणी जाण्याअगोदर दहादा विचार करा.
७. वर दिलेल्या उपायांचा वापर करून आपली प्रतिकारशक्ती शाबूत ठेवा.
८. घरामध्ये मुबलक सूर्यप्रकाश येऊ द्या.
९. सूर्योदयापूर्वी जे उठतात त्यांची प्रतिकारशक्ती जे उशीरा उठतात त्यांच्या तुलनेत २५-३०% जास्त असते. तेव्हा सुज्ञास दोनदा सांगणे .... न लगे!
काहिही असो, कोरोना व्हायरस जगाच्या इतिहासाला एक वेगळं वळण देणार हे निश्चित!
वाचा :⮞ दीक्षित डाएट, त्रिपाठी डाएट, परांजपे डाएट - माझ्यासाठी कोणता चांगला?
➤COVID-19 च्या सद्य स्थितीबद्दलची आकडेवारी बघण्यासाठी इथे जा.
BEAUTY, WATCHES, JEWELLERY, CLOTHES,
ELECTRONICS, ORGANIC HEALTH PRODUCTS
0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊