सुमारे २०-२५ वर्षापूर्वी ह्या विषयावर लेख लिहिण्याची गरजही भासली नसती; आता तर ती काळाची गरजच होऊन राहिली आहे .
सुमारे २० वर्षांपूर्वीचे आपले स्वैपाकघर आणि आत्ताचे स्वैपाकघर ह्यांची तुलना करून पाहा . फार मोठा फरक झालेला दिसेल .पूर्वी आपण ज्या भाज्या, फळे व अन्नधान्ये विकत घेत असू त्या सर्व कसदार जमिनितून काढलेल्या असत, त्यांच्यावर कृत्रिम खाते व किटकनाशके ह्यांचा प्रयोग कमीत कमी झालेला असे, त्या देशी बियाणांपासून उत्पन्न केलेल्या असल्याने कसदार व चविष्ट लागत . आता फक्त दिखाऊपणा राहिला आहे, त्यात कस व पोषक द्रव्ये केवळ नावालाच उरली आहेत .
पूर्वी जे दूध मिळायचे ते पण किती चविष्ट (पाणी टाकल्यानंतरही) लागायचे व ते पिण्याची इच्छा पण होत असे . आजकाल मिळणारे प्रक्रिया केलेले दूध जन्तुराहीत भलेही असेल पण प्रयोगशाळेत नमुने तपासल्यानंतर हे दूध फायद्यापेक्षा अपयाच जास्त करते हे आता सिद्ध झालेले आहे .
तिसरी गोष्ट, आजकाल पॅकबंद, बाटलीबंद पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे . तुम्ही त्यावरील बारीक प्रिंटकडे निरखून पाहिलं तर त्यावर mixed with preservatives, stabilizers, acid regulators असे हमखास लिहिलेले दिसून येईल . म्हणजे शरीराची अर्धी ताकद ही असली घातक व शक्तिशाली रसायने पचवण्यातच खर्च होऊन जाते . आपल्याला मिळते ती फक्त चव आणि शरीराला जे पाहिजे नेमके ते न मिळाल्याने सारखी काही ना काही खाण्याची इच्छा होत राहते . पूर्वी फक्त सरबते व ice cream ह्यांमधेच ही रसायने असायची, आता तर सर्रास जवळपास सर्वच पदार्थांमध्ये shelf-life वाढवण्यासाठी ही रसायने टाकली जातात . चॉकल॓ट्स, बिस्कीट्स, गुलकंद, विड्याचे पान, लोणची, फरसाण, लोणी, चीज, लस्सी, फ्रुट ज्यूस, आवळा रस , कोरफड ...... यादी संपणार नाही . जी गोष्ट आम्ही तपासली त्या सर्वांमध्ये आम्हाला ही रसायने आढळली . अगदी औषधांमध्येसुद्धा ! हे खाणाऱ्याचे यकृत काय म्हणत असेल ? पशू, पक्षी, किटक ह्या बाबतीत माणसापेक्षा जास्त भाग्यवान आहेत .
पूर्वीची जी जेवणं व्हायची तो माहोल पण वेगळा होता . गप्पा मारत-मारत, हसत-खिदळत, फार तर रेडिओ ऐकत ऐकत मजेत कार्यक्रम चालायचा . नंतर हळूच घरात टी. व्ही. शिरला . मुले टी. व्ही. समोर ताट घेऊन बसू लागली . काही दिवसांनी कॉम्पुटर आला, त्याने तरुणांना वेड लावले . नंतर मोबाईल आला तो थेट शिरला आपल्या खिशातच . त्याच्या नादातून तान्ही मुले व म्हातारेही सुटले नाहीत ! (माझापण अनुभव फार काही वेगळा नाही 😇आणि हा लेखपण मोबाईल- कॉम्पुटरवर वाचण्यासाठीच लिहीत आहे ! 😂)
थोडक्यात, आपलं अन्न, हवा, पाणी (आणि विचारसुद्धा) सगळंच बदललंय . वातावरणातील प्रदूषणामध्ये मोबाईल टॉवर व वाय-फाय राऊटरमधून निघणारी कंपने शरीराला सर्वात घातक . ह्या लहरी माणसाचा मेंदू, थायरॉइड व प्रजनन क्षमतेवर थेट आघात करतात .विज्ञानयुगातील वाढत्या स्पर्धेबरोबर हे होणं अपरिहार्यच आहे; पण ह्या सर्व गोष्टींनी आपल्या आहाराचा पोषकपणा नष्ट केला आहे . अशा परिस्थितीत, आहाराला पूरक औषधांची जोड देणं अपरिहार्य आहे . कालांतराने शरिरात एखाद्या रोगाने शिरून ठाण मांडण्यापेक्षा भविष्यातला मनस्ताप टाळण्यासाठी अशा पूरक गोष्टींना आपल्या दिनाचर्येचा व आहाराचा एक नियमित भाग बनवणं अत्यंत हिताचं आणि गरजेचं आहे . तुमच्या दारी जर देशी गाय असेल, आवारात ताज्या भाज्या पिकत असतील आणि सेंद्रिय (organic) फळे व अन्नधान्ये तुम्ही खात असाल, तर ह्या गोष्टींची तुम्हाला विशेष गरज नाही .
वयाच्या २५-३० वर्षांपर्यंत ह्या पोषक तत्त्वांची एवढी गरज भासत नाही . त्या वयापर्यंत हाडे छान भरलेली असतात, मेंदू-डोळे-हृदय-सांधे उत्तम कार्यक्षम असतात, यकृत व रक्तात पोषक तत्त्वांची पातळी पुरेपूर असते . वयाच्या तिशीनंतर (हल्ली तर त्याआधीपण) एकेक गोष्ट ऱ्हास पाऊ लागते आणि काहीना काही तक्रारी सुरू होतात . पन्नाशी-साठीनंतर तर काही काही तक्रारी विचित्र स्वरूप धारण करू लागतात आणि आयुष्याचा एक भाग बनून बसतात, जीवन नकोसे करून टाकतात .
अनेक प्रकारची आहार-पूरके (food supplements) बाजारात उपलब्ध आहेत . त्यांना 'औषधे' म्हणून संबोधणे योग्य होणार नाही . ही जीवनावश्यक पोषकद्रव्ये गोळ्यांच्या स्वरूपात घेणे सोपे जाते . दुकानातून १०-२० गोळ्या विकत घेण्यापेक्षा १००-१५० गोळ्यांचा मोठा पॅक घेतला तर स्वस्तपण पडेल आणि जास्त दिवस जाईल . फक्त पत्ता आणि फोन नंबर टाकून ह्या गोष्टी घरबसल्या आपल्याल्या सहज online मागवता येतात . ह्यातली प्रत्येक गोळी रोजच घेतली पाहिजे असेही नाही . पण ह्या पोषक द्रव्यांच्या नियमित सेवनाने आपण शेकडो आजारांना दूर ठेऊ शकतो ही गोष्ट वादातीत आहे . अनेक डॉक्टर्स स्वतः ह्या आहार पूरक गोष्टींचे सेवन करतात व आजकाल पेपर-मासिकांमध्ये वाचून बरेच पेशंटपण त्याबद्दल नेहेमी काहीना काही प्रश्न विचारतात . त्यासाठीच हा लेख लिहीत आहे . वेळेअभावी रुग्णांना सर्व गोष्टी सांगता येत नाहीत, त्या ह्यात लिहिल्या आहेत .
दूध, फळे व भाज्या हयांमधून जे व्हिटॅमिन्स मिळतात ते सर्व एकत्र करून ही गोळी बनवली जाते . बऱ्याच डॉक्टरांचे हे आवडते prescription असते कारण ही गोळी सोबत दिली की औषधांचा त्वरीत चांगला परिणाम दिसून येतो . आजकाल कॅल्शिअम, B12 आणि D3 ची कमतरता एक नित्याचीच बाब होऊन बसली आहे . त्या तपासण्यापण फार महाग आहेत . त्या तपासण्यांना जेवढे पैसे लागतात त्यात सहा महिन्यांच्या गोळ्या येतात . ही गोळी एक दिवसाआड तरी घ्यावी, आजारपणात रोज घ्यावी . आपल्याकडे उपलब्ध असलेले काही चांगले ब्रॅंड्स :
♚ Healthkart Multivit Gold♛ Puritans Pride ABC Plus
♥ Amway Nutrilite Daily
♦ Modicare Well Multivitamin
♠ Natures Velvet Lifecare
♣ Zenith Nutrition Daily Active
हे नाव तुम्ही बऱ्याचदा वाचले असेल . त्याचे शरीरातील महत्त्वदेखील असाधारण आहे . तुम्ही शाकाहारी असाल आणि refined तेल खात असाल तर ही capsules तुमच्यासाठी आवश्यक, नव्हे, परमावश्यक आहे . शरीरातील तीन सर्वात महत्त्वाचे अवयव, म्हणजे हृदय, मेंदू व डोळे ह्यांच्या दीर्घकाळ व उत्तम कार्यक्षमतेसाठी ओमेगा-३-फॅटी अॅसिड आवश्यक आहे . Preventive म्हणून जे जे घटक शरीराला देणे आवश्यक आहेत, त्यांपैकी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे . परदेशातील मुले आपल्याकडील मुलांपेक्षा अधिक भाग्यवान, त्यांना अगदी बालपणापासून आहारात हे मिळते . मासे व सुकामेवा ह्यात हे मुबलक प्रमाणात असते .
▲ Simply Nutra Vegan Omega (vegetarian)
◆ HealthAid Flaxseed Oil 1000mg (vegetarian)
▘ Now Foods Omega-3 CVS Support
● MuscleBlaze Omega 3 Fish Oil
Superfood म्हणून ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख होतो त्यामध्ये स्पिरूलीनाचा फार वरचा नंबर लागतो . स्पिरूलीना ही एक समुद्रात आढळणारी वनस्पती आहे . ती मानवी शरीरातील प्रत्येक संस्थेची (मेंदू व मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था, स्नायू व सांधे, श्वसन संस्था, त्वचा, अंतःस्रावी संस्था) कार्यक्षमता वाढवते . ह्या वनस्पतीमध्ये आयोडीन प्रचूर प्रमाणात असते त्यामुळे थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते . शरीरातील इतर सर्व ग्रंथी थायरॉईडच्या नियंत्रणाखाली असतात हे आपण सर्व जाणतोच . मरगळ जातच नाही, उत्साह वाटत नाही ...... स्पिरूलीना घ्या !
⬔ Grenera Spirulina Capsules⬕ Parry Wellness Organic Spirulina
पॅसिफीक महासागरातील बेटांवर आढळणारे हे एक चमत्कारिक फळ आहे . ह्या फळाचा शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी इतका जबरदस्त उपयोग होतो की HIV (एड्स) ची लागण झाल्याने खंगलेला एक पेशंट नोनीच्या सेवनानंतर केवळ वर्षभरातच ठणठणीत व पूर्ण कार्यक्षम झाल्याचे मी स्वतः बघितले आहे . हे preventive आणि curative दोन्ही आहे . नोनीला व्हिटॅमिन 'सी' ची जोड देणे फार उपयुक्त . वारंवार प्रतिजैविके (antibiotics) घेऊन कंटाळला असाल व वारंवार जंतूसंसर्ग (infections) होत असतील तर नोनी व व्हिटॅमिन 'सी' अवश्य घ्या .
◾ Simply Nutra Noni◾ Healthvit C-Vitan-Z Vitamin C & Zinc
◾ Himalaya Wellness Amla-C
वैज्ञानिक जगतात nanotechnology चा उदय झाला तो विसाव्या शतकात, परंतु आयुर्वेद ग्रंथामध्ये वर्णिलेली विविध भस्मे म्हणजे हजारो वर्षांपूर्वी nanotechnology वापरून बनवलेली रसायने होत . वाढत्या वयासोबत शरीराची जी झीज होते ती रोखण्याचे काम ही भस्म करतात . विविध भस्म एकत्र करून बनवलेली गोळी आठवड्यातून २-3 वेळा घेणे चांगले .
Himalaya Geriforteप्रतिकूल परिस्थितीत पाणी धरून ठेवण्याची अद्भूत क्षमता व कुठलीही सूज कमी करण्याचा हुकमी गुण ह्यामुळे कोरफड हे नोनीप्रमाणे preventive आणि curative म्हणून दोन्हीसाठी वापरतात . सौंदर्य प्रसाधानंपासून ते कॅंसरपर्यंत सर्वत्र कोरफडीचा उपयोग होतो . कोरफडीचा ताजा गर मिळाला तर छानच, नाहीतर ह्याच्या capsules पण मिळतात . अती उष्णतेमुळे होणाऱ्या कुठल्याही त्रासापासून वैतागला असाल तर कोरफडीसारखे वरदान नाही .
☀ Nutriherbs Organic Aleo vera
☀ Morpheme Remedies Aloe Vera
हा घरी तयार करायचा आहे आणि केल्या केल्या प्यायचा आहे . ह्यापैकी तुम्हाला जेवढी शक्य आहेत तेवढी ताजी पाने जमवा : पारीजातक १ पान, तुळस २-३ पाने, बेल १ पान, आवळा २-३ पाने (हि कितीही चालतील), दुर्वा ८-१०, कडूनिंब ४-५ पाने, झेंडूची पाने ३-४, पुदिन्याची पाने ३-४, जाम्भूळ १ पान, पेरू १ पान, मोगरा १ पान . स्वच्छ धुवा, चावून चावून खा, रस पिऊन चोथा थुंकून टाका आणि बघा तुमची बॅटरी कशी चार्ज होते ते . ही सर्व पाने ओल्या सुती कपड्यामध्ये बांधून आणि तो कपडा पिळून्सुद्धा रस काढता येईल .ह्याची चव विचित्र लागते पण गुणधर्म अद्भूत आहेत, त्याला तोड नाही . कडू अमृत आहे ते ! एखाद्या आजारपणातून उठला असाल किंवा शरीरात वर्षानुवर्षे साचलेली विषद्रव्ये बाहेर काढून टाकायची असतील तर संजीवनी रस घ्याच .
➤ काही तक्रारी नसल्या तरी खालील तपासण्या एकदा तरी करून घ्याच :
Haemogram, TFT (Thyroid Function Tests), RFT (Renal), HbA1c, Lipid Profile १०-१२ तास उपास करून मग रक्त द्या .
➤ कुठलाही पदार्थ तोंडात टाकण्याआगोदर त्यात किती कॅलरीज आहेत हे बघण्याची एक चांगली सवय लावून घ्या .
₻ विविध अन्नपदार्थ व त्यातील कॅलरीज मूल्यांकन तक्ता
काय Diet वर आहात ? मग हे वाचाच - दीक्षित डाएट, त्रिपाठी डाएट, परांजपे डाएट - माझ्यासाठी कोणता चांगला?
Nice information, must for everyone, keep it on.
ReplyDelete