खायचा विषय निघाला म्हणजे आपण चविष्ट पदार्थांनाच प्राधान्य देतो, पण जेव्हा शब्दांची निवड करायचा प्रसंग येतो तेव्हा चविष्ट आणि बेचव अशा दोन्ही प्रकारच्या शब्दांची माहिती असणे आवश्यक असते.केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द

ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 13 .
Words from Marathi to English


▪ गरज नसताना वापरलेले = gratuitous
This sentence is garnished with gratuitous metaphors. हे वाक्य अनावश्यक अलंकारांनी सजलेले आहे.

▪ तोटी, फवाऱ्यासारखे बाहेर पडणे = spout
Have you seen whales breach and spout in the Atlantic Ocean? अटलांटिक समुद्रात व्हेल माशांना पृष्ठभागावर येऊन पाण्याचे फवारे उडवताना बघितलंस का?

▪ ढिगारा = mound
The tomb proper was covered with a mound of earth. मातीच्या ढिगाऱ्याने ते थडगे झाकले गेले होते.
- Syn: heap, pile

▪ एकाच साच्यातून बनवलेले = cast from the same mold (एकाच माळेचे मणी)
The boys won't take their food until they have said their prayers. They are cast from the same mold. प्रार्थना म्हटल्याशिवाय ही मुले अन्न ग्रहण करणार नाहीत.सगळे ते एकाच साच्यातून घडले आहेत.

▪ विखुरलेले = few and far between
The colorful houses are scattered few and far between among the hills. ही रंगीत घरे टेकड्यांमध्ये इतस्ततः विखुरलेली आहेत.

▪ थवा, कंपू = bevy
A bevy of young artists was busy painting Ajanta sculptures. तरुण कलाकारांचा एक गट अजिंठा लेण्याची चित्रे काढण्यात मग्न होता.

" Life gives you many many chances. At least grab one! "

▪ पुस्तकांची आवड असणारा = bibliophile
He calls himself a bibliophile but he hasn't yet read Gita! तो स्वतःला पुस्तकांचा चाहता म्हणवतो पण त्याने अजून गीता वाचलेली नाही!

▪ अनुकूल दिसणे = bid fair to
His thinks his plan bids fair to succeed in favor of his expectations. आपल्या अपेक्षेप्रमाणे आपली योजना यशस्वी होईल असे त्याला वाटते.

▪ उच्चभ्रू = highborn
Princess Diana, a member of the highborn British family, was the first wife of Prince Charles. उच्चभ्रू कुटुंबातील राजकन्या डायना ही राजपुत्र चार्ल्सची प्रथम पत्नी होती.
- Syn: noble, coroneted

▪ घरंदाज, सुसंस्कृत = highbrow
Highborns are not necessarily highbrows, always. प्रत्येकवेळी उच्चभ्रू व्यक्ती सुसंस्कृत असेलच असे नाही.
- Syn: cultured

▪ खुमारी, लज्जत (भाषा, लेखन, हावभाव इ.) = flourish
Everest masala has imparted a flourish to your recipe. एवरेस्ट मसाल्याने तुझ्या पाककृतीला एक लज्जत बहाल केली आहे.

▪ शिक्षक-विद्यार्थी = mentor-mentee
This hierarchy will encourage healthy mentor-mentee interaction. ही वर्गवारी शिक्षक-विद्यार्थ्यांमधील निकोप संवादाला चालना देण्यास मदत करेल.

▪ उत्सुकतेने छाननी करणे = to snoop into
Shashi has a habit of snooping into my cupboard after I go to office. मी ऑफिसला गेल्यानंतर माझ्या कपाटाची उचकाउचक करत बसायची शशीची सवय आहे.

<<< मागील भागपुढील भाग >>>