'लज्जत' ह्या शब्दाशी जे जे पदार्थ निगडित आहेत, त्यात कॉफीचा जगात सर्वात वरचा नंबर असावा. कॉफी सकाळी घेतल्यावर आजचा दिवस चांगला जाणार ह्याची नकळत ग्वाही मिळते आणि संध्याकाळी घेतल्यावर आयुष्याची नाही, निदान दिवसाची तरी इतिकर्तव्यता झाल्यासारखी वाटते (काही जणांच्या झोपेचे खोबरे होते ते द्या सोडून). 'श्रीमान योगी' नसलेले वाचनालय, सुंठ नसलेले औषधालय, गुलकंद विरहित पान शॉप आणि कॉफी नसलेले स्वैपाकघर, हे सगळे एकाच श्रेणीतले.

   भारतात कॉफी बाबा बुदान नावाच्या एका सुफी संतामुळे आली (संत-प्रेषितांच्या अवतार घेण्यामागे जी कारणे असतात त्यामागे कॉफी-आस्वादन हे एक कारण शास्त्रकारांनी हेतुपुरस्सर गाळलेले दिसते). बाबा बुदान हे मक्का येथे गेले असताना येमेनमधील मोका प्रांतात ते बराच काळ राहायला होते. कदाचित आत्ताचा जो 'मोक्का' नावाचा ब्रँड प्रचलित झाला आहे, तो यावरून घेतला असावा. बाबा बुदान यांना कॉफीचा तो स्वाद इतका आवडला, की त्यांनी ती भारतात आणली. त्यासाठी त्यांना बरेच कष्ट करावे लागले. चिकमंगळूर येथील एक टेकडी निवडून तेथे कॉफीच्या बियांची लागवड केली. कर्नाटकात भारतातील पहिल्या कॉफी लागवडीची रुजवात तेथेच झाली. अजूनही तेथील टेकड्यांना बाबा बुदान यांच्या नावाने ओळखतात. नंतर ती दक्षिणेतील फिल्टर कॉफी ह्या नावानी प्रचलित झाली. जाऊ द्या, इतिहासाशी आपल्याला काय घेणे देणे.

   जगातील प्रत्येक बाजारपेठ काबीज करणाऱ्या कॉफीचे कोणकोणते प्रकार असतात त्याचे आता आपण नेत्रास्वादन करूया.



एस्प्रेसो कॉफी

१. एस्प्रेसो : यालाच ब्लॅक कॉफी असेही म्हणतात. हा कॉफीचा शुद्ध प्रकार मानला जातो आणि जगात सर्वांत जास्त प्रमाणात विकला जातो. कॉफीचे सगळे प्रकार यापासूनच तयार केले जातात. हा कॉफीचा हार्ड प्रकार म्हणून ओळखला जातो. पाणी गरम करून त्यात एस्प्रेसो पावडर व साखर घालून बनविली जाते, ही एस्प्रेसो कॉफी. पिऊ इच्छिता? घ्या तर मग - Expresso Coffee

अमेरिकानो

२. अमेरिकानो : जगात ही कॉफी जास्तीत जास्त प्रमाणात प्यायली जाते. या कॉफीच्या प्रकारात एस्प्रेसो कॉफीमध्ये अर्धा कप गरम पाणी, थोडे दूध व साखर घालावी लागते. इटालीमध्ये लढण्यासाठी गेलेल्या अमेरिकन सैनिकांनी ही कॉफी शोधून काढली. ह्यात कमीत कमी साखर घालणे उचित. पिऊ इच्छिता? घ्या तर मग - Americano Coffee



इंडियन फिल्टर कॉफी

३. इंडियन फिल्टर कॉफी : हा प्रकार दक्षिण भारतात तयार केला जातो. कॉफीच्या सुक्या बिया बारीक करून, त्या गरम पाण्याबरोबर फिल्टर करून, त्यात दूध व साखर घालून तयार करतात. कॉफीच्या इतर प्रकारांपेक्षा हा प्रकार थोडा गोड असतो. Classical स्वरूपात तुम्ही ही भारतीय कॉफी घेतली आहे की नाही मला ठाऊक नाही' पण त्यामध्ये सावलीत वाढवलेल्या कॉफी beans चे brewing करून decoction बनवून ठेवतात आणि गरजेप्रमाणे त्यात दूध-पाणी-साखर टाकून दिवसभर घरी येणाऱ्या पाहुण्यांचं चांगभलं करतात! अनेक पाश्चिमात्य लोकांनी ह्या आपल्या कॉफीची तोंडभरून स्तुती केलेली आहे. पिऊ इच्छिता? घ्या तर मग - Indian Filter Coffee  आणि हा South Indian Filter Coffee Maker

 एस्प्रेसो मॅक्कीऑटो

४. इटालियन एस्प्रेसो मॅक्कीऑटो : या कॉफीच्या प्रकारात स्टीम केलेले दूध घातले जाते. हा एस्प्रेसोचाच एक प्रकार आहे; ह्यावरील फेसाळलेले दूध आणि त्यावर विखुरलेल्या चोको-चिप्स ह्यामुळे ती बघणाऱ्याचे डोळे लगेच आकर्षून घेते. आणि ओठाला लावल्यावरतर विचारायला नकोच. पिऊ इच्छिता? थांबा, आपल्याकडे यायची आहे ती अजून.




कॅफे लाते

५. कॅफे लाते : या प्रकारात एस्प्रेसो कॉफीमध्ये तिप्पट दूध घातले जाते. यात दुधाचे प्रमाण अधिक असल्यामुळे पांढरा रंग येतो. यात साखरही घालतात. इटालियन लोक नाश्त्याच्या वेळी मुख्यतः ही कॉफी पितात. पिऊ इच्छिता? घ्या तर मग - Latte Coffee

Black&Decker ही कंपनी कॉफीचे मशीन बनवणारी जगप्रसिद्ध कंपनी आहे. Espresso & Cappuccino Coffee Maker ह्या मशीनमध्ये सर्व प्रक्रिया आपोआप होतात व हवी तशी Expresso, Americano, Latte, Cappuccino, Mochachino ई. प्रकारच्या कॉफ्या त्यात बनवता येतात!

कॅपुचिनो

६. कॅपुचिनो : हा एक्सप्रेसो कॉफीचा सर्वात स्ट्रॉंग आणि लोकप्रिय प्रकार. जगभरात प्रत्येक कॉफी चेनमध्ये हा प्रकार नक्की उपलब्ध असतो. कॉफीच्या या प्रकारात एस्प्रेसो कॉफीमध्ये सम प्रमाणात किंवा दीडपट दूध घातले जाते. नंतर क्रीम, फोम टाकून गार्निश केली जाते. कॉफीवर फेसाळलेल्या दुधाचा जो घुमट तयार होतो ना, त्यावरून त्याला 'कॅपुचिनो' हे नाव पडले आहे. पिऊ इच्छिता? घ्या तर मग - Cappuccino


मोचाचिनो

७. मोचाचिनो : Cold coffee चे शौकीन असाल तर मोचाचिनो घ्याच! हा कॅपुचिनोचाच एक प्रकार आहे. फक्त ह्यात चॉकलेट पावडर किंवा चॉकलेट सीरप घालून हा प्रकार तयार करतात. यात व्हिप्ड क्रीमचा वापर करून कॉफीवर गार्निशिंग करतात. स्ट्रॉची नळी टाकून ही कॉफी प्यायला अशी काही मजा येते म्हणता... ! पिऊ इच्छिता? घ्या तर मग - Mochachino Choco Powder  किंवा Mochachino Chocolate Syrup  आणि टाका थंड कॅपुचिनोवर.

तुर्की कॉफी

८. तुर्की कॉफी : तुर्की कॉफीच्या वाळलेल्या बिया बारीक करून त्याची पावडर करतात. ह्या कॉफीचे वैशिष्ट्य म्हणजे ही एक्सप्रेसोपेक्षा कडक असते पण कमी कडू. तुर्की कॉफीच्या वाळलेल्या बियांची पावडर गरम पाण्यात घालून उकळवतात; यामुळे याला वेगळा इलायचीसारखा स्वाद येतो. नंतर ते पाणी आटवतात. उरलेल्या पावडरमध्ये फ्लेवर मिसळवला जातो. पिऊ इच्छिता? घ्या तर मग - Turkish Roasted Coffee

ग्रीक कॉफी

९. ग्रीक कॉफी : Elliniko हा कलाप्रिय ग्रीसमधील सर्वात लोकप्रिय कॉफीचा प्रकार. त्यांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग.हा खरं म्हणजे तुर्की कॉफीचाच एक प्रकार. ह्यातपण जायफळ, इलायची, दालचिनीसारखे स्वाद मिळतात. ही कॉफी स्ट्रॉंग असते खरी पण आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वोत्कृष्ट मानली जाते. पिऊ इच्छिता? घ्या तर मग - Greek Coffee



आयरिश कॉफी

१०. आयरिश कॉफी : हा प्रकार जगातील प्रसिद्ध अशा कॉफीच्या प्रकारात मोडला जातो. ही कॉफी आपल्या संस्कृतीत मोडणारी नक्कीच नाही. हा प्रकार जगातील कॉफीच्या विशिष्ट प्रकारच्या दुकानात मिळतो. ही कॉफी बनविताना आधी कॉफी , नंतर व्हिस्की आणि वरून क्रीमचा गोळा टाकतात! पिऊ इच्छिता? घ्या तर मग - Irish Coffee



व्हाइट कॉफी

११. व्हाइट कॉफी : मलेशियात व्यापारासाठी गेलेल्या चायनीज लोकांनी हा कॉफीचा एक अफलातून प्रकार शोधून काढला आणि मलेशियात तो भलताच लोकप्रिय झाला. कॉफीचा कडूपणा घालवण्यासाठी ह्या चायनीज लोकांनी कॉफी बीन्स भाजण्याची एक विशिष्ट पद्धत शोधून काढली. पाम तेलात कॉफीच्या बिया भाजून, नंतर त्यात दूध व साखर घालून ही कॉफी बनवितात. ईपोह ह्या शहरात जन्मून लोकप्रिय झालेली हीच ती व्हाइट कॉफी. पिऊ इच्छिता? घ्या तर मग - White Malayshian Coffee 


   कॉफी जेवणाच्या अगोदर घेतली तर ती निद्रिस्त रक्ताला जागृत करून कामाचा हुरूप वाढवते, जेवताना घेतली तर पदार्थांचा आस्वाद वाढवते आणि जेवणानंतर घेतली तर अत्युच्च समाधानाचा पूर्णविराम देते, म्हणजे कॉफी कधीही घ्या नुकसान आणि पश्चात्ताप कधीही पदरी पडणार नाही.
कॉफीचा शोध आपणा भारतीयांना तसा बराच उशीरा लागला म्हणायचा. थोडा आधी जर लागला असता ना, तर आमच्या मावळ्यांनी जरा अधिक गड जिंकले असते, संतांनी आणखी जास्त ग्रंथरचना केल्या असत्या, एवढंच काय, स्वातंत्र्यही लवकर मिळाले असते! आता बघा, आपल्याकडे जेव्हापासून कॉफी प्रचलित झाली आहे तेव्हापासून संपूर्ण जगभरात भारतीय लोकांची कशी घोडदौड सुरु झाली आहे, ती थांबायलाच तयार नाही!


   बाहेर पाऊस भुरभूरतोय, हवेत गारवा आहे आणि तुम्ही नुसतेच रिकामे बसून आहात? अरेरे! चला उठा, दिवस संपायच्या आत एक तरी .......! ८४ लाखात फिरून आल्यानंतर मग हे कधीतरी सगळं जुळून येत असतं!

   कुठली coffee taste केली ते कळवायला मात्र विसरू नका बरं! 😊