अमेरिकेतील General Motors ह्या कंपनीने १९८५ मध्ये आपल्या आळशी आणि लठ्ठ कर्मचाऱ्यांचे वजन कमी करण्यासाठी एक प्रयोग केला आणि तो कमालीचा यशस्वी झाला! ह्या डाएटने काही भन्नाट आणि आश्चर्यकारक परिणाम दाखवले. पुढे चालून हजारो जण ह्या डाएटचे अनुयायी बनले. General Motor Diet वाल्यांचा एक संप्रदायाच बनला म्हणा ना. हा डाएट GM Diet ह्या नावानेच नंतर प्रसिद्ध झाला. वजन कमी करणारे जे जे डाएट जगात आहेत, त्या सर्वांमध्ये कमीत कमी दिवसांत व कमीत कमी परिश्रम घेऊन वजन कमी करण्याचे श्रेय GM Diet ह्या डाएटला जाते.
आता,भोवळ आली तरी पडणार नाही अशा कुठल्यातरी जागी बसा आणि हे वाचा.
◾ GM Diet ची वैशिष्ट्ये:
१. हा डाएट फक्त ७ दिवसांचा आहे. **
२. ह्या डाएटने ७ दिवसांमध्ये पाच किलो वजन कमी होणे ही एक साधारण गोष्ट आहे! काही लोकांचे वजन ह्या डाएटनंतर साडेसात किलोपर्यंत कमी झालेले आहे!!
३. ह्या डाएटला व्यायामाची आवश्यकता नाही!!!
४. एका दिवसात तुम्ही ६ ते ७ वेळा पोटभर खाऊ शकता !!!! (आणि अधेमधे भूक लागली तर सूप आहेच सोबतीला.)
५. कुठल्याही औषधास न जुमानणारे जुनाट रोग ह्या डाएटमुळे केवळ ७ दिवसात कमी झालेले आहेत. !!!!! 😲
** सात दिवसांचे एक आवर्तन, अशी वर्षांतून ५-६ आवर्तनं तुम्ही सहज करू शकता.
◾ काय आहे हा GM Diet?
पडला नसाल तर पुढे वाचा.
नवरात्रात आपल्याकडे महिलावर्ग प्रत्येक दिवशी एका रंगाची साडी घालतो, त्याप्रमाणे GM Diet मध्ये एका दिवशी एका प्रकारचेच अन्न खायचे असते. पहिल्या दिवशी फळे, दुसऱ्या दिवशी भाज्या, तिसऱ्या दिवशी फळे व भाज्या एकत्र..... ह्याप्रमाणे, ते नंतर सविस्तर पाहूच.
- हा डाएट चालू असताना जोमदार व्यायाम (strenuous exercise) करू नयेत. साधे चालणे किंवा योगासने केलीत तरी पुरे.
- तुमचे वजन - ६५ ÷ ८ एवढी आवर्तनं तुमच्यासाठी पुरेशी आहेत.
- तुमच्या घरी blood pressure monitor आणि blood sugar monitor आहे का? असलेले बरे. रोज सकाळी शुगर आणि संध्याकाळी ब्लड प्रेशर घेऊन त्याची नोंद ठेवलेली चांगली. शुगर किंवा ब्लड प्रेशर ७० च्या खाली गेल्यास डाएट थांबवा अथवा डॉक्टरांना दाखवा.
- डाएट चालू असताना मधेच समजा भूक लागली तर wonder soup घेण्यास सांगितले आहे. हे खरोखरच wonder soup आहे बरं का! हे फक्त डाएटवर असताना नाही तर कोणी कधीही घेऊ शकतो. पत्ताकोबी, सेलरीची celery पाने, गाजर, टमाटे आणि मिरेपूड टाकून हे सूप बनवायचे असते.
- डाएट चालू असताना ८-१० ग्लास पाणी रोज प्यायचे असते.
- सकाळचे पहिले खाणे भरपेट आणि जसा जसा दिवस सरकेल तसा तसा आहार हलका होत जाईल. कॉफी आणि ग्रीन टी चालेल पण साखर टाकून नाही, तर sugar free टाकून.
- का कुणास ठाऊक, ह्या डाएटला कडधान्ये चालत नाहीत (प्रोटिन्स जास्त असतात म्हणून), पण मांसाहार मात्र चालतो! त्यामुळे मोड आलेली कडधान्ये जरा जपूनच.
दिवस पहिला : फक्त फळे
- दिवसातून कितीही वेळा खा पण रसाळ फळे खा.
- केळी, खजूर, सुकामेवा नाही.
- मधे भूक लागली तर wonder soup घ्या.
- पाणी भरपूर प्यायला विसरू नका.
दिवस दुसरा : फक्त भाज्या
- सकाळी १ बाउल उकडलेला बटाटा किंवा रताळे (फक्त एकदाच)
- दिवसभरात कोशिंबिरींचे विविध प्रकार खात राहा!
- मधे भूक लागली तर wonder soup घ्या.
- पाणी भरपूर प्यायला विसरू नका.
* कोशिंबिरी करण्याअगोदर १५-२० मिनिटे भाज्या मिठाच्या पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे त्यावरील chemicals निघून जातील.
दिवस तिसरा : भाज्या व फळे एकत्र
- तिसऱ्या दिवशी रसयुक्त फळे व भाज्या विविध प्रकारे एकत्र करून तुमच्या आवडीनुसार खा, पण केळी, खजूर, सुकामेवा व बटाटे वगळून.
- मधे भूक लागली तर wonder soup आहेच.
- पाणी भरपूर प्यायला विसरू नका.
दिवस चौथा : दूध व केळी
- चौथा दिवस हा शिकरणाचा दिवस! पण त्यात साखर व मलई घ्यायची नाही.आणि वर तूप पण घ्यायचे नाही बरं का, नाही तर डाएट करण्याचा काहीच फायदा नाही.
- मधे भूक लागली तर wonder soup घ्या.
- पाणी भरपूर प्यायला विसरू नका.
- आपण आता अर्ध्या टप्प्यावर आहोत. शुगर आणि बी.पी. मोजून घ्या.
दिवस पाचवा : मांसाहार व टमाटे
- पण शाकाहारी असाल तर? मांसाहाराऐवजी चीज/ ब्राऊन राईस/ छाना चालेल.
- मांसाहार (meat /chicken / fish) करणार असाल तर तो २८४ ग्रॅम २ ते ३ जेवणात विभागून खा. चीज किंवा छाना खाणार असाल तरी तसेच, कारण तिन्हींचे protein content सारखेच आहे. ब्राऊन राईस खाणार असेल तर पोटभरून खा, त्याचे protein content कमी आहे. लक्षात ठेवा, मांसाहार fry करून नको.
- दिवसभरात मध्यम आकाराचे सहा टमाटे संपवायचे आहेत.
- एवढं सगळं असताना भूक लागणार नाहीच, लागली तर wonder soup घ्या.
- खाण्याचं प्रमाण संध्याकाळी कमी, सुपाचं जास्त.
- पाणी भरपूर प्यायला विसरू नका.
दिवस सहावा : मांसाहार व कोशिंबिरी
- सहावा दिवस हा अगदी पाचव्या दिवसासारखाच. फरक एवढाच की टमाट्याच्या ऐवजी विविध प्रकारच्या कोशिंबिरी खाऊ शकता.
- आज बटाटे, रताळे खायला परवानगी नाही!
दिवस सातवा : ब्राऊन राईस, कोशिंबिरी आणि फळे
- १ बाउल भरून ब्राऊन राईस दिवसातून तीनदा खायचा, सोबत कोशिंबिरी व फळे खायची.
- केळी, खजूर, सुकामेवा व बटाटे वगळून.
- फ्रुट जूस घेतला तर त्यात साखर घ्यायची नाही.
- मधे भूक लागली तर wonder soup घ्या.
- पाणी भरपूर प्यायला विसरू नका.
दिवस आठवा
- आता वजन काट्यावर उभे राहा!
GM Diet म्हणजे वजन कमी करायचा एक क्रॅश कोर्सच आहे. आता साहजिकच मनात एक प्रश्न उभा राहतो की GM Diet सारखा धाडधाड परिणाम दाखवणारा डाएट असताना अथक संशोधन करून प्रस्थापित केलेले दीक्षित डाएट वा त्रिपाठी डाएट वा परांजपे डाएट इ. कशाला हवेत? त्याचं मुख्य कारण असं की, GM Diet देखील संशोधनाअंतीच निर्माण झालेला आहे पण GM Diet संपल्यानंतर बहुतांश लोक अगदी अधाशाप्रमाणे खात सुटतात, परिणामी, झालेला फायदा दीर्घकाळ टिकत नाही.त्यामुळे, GM Diet चे एक आवर्तन पूर्ण केल्यानंतर दीक्षित, त्रिपाठी वा परांजपे डाएटवर (आपल्या routine ला अनुसरून) जाणं हितावह.
पुढील लेखात वाचा: ११४ वर्षांचा बरनँडो सांगतोय आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य
0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊