म्हातारपण कोणाला हवंय, हात वर करा...... एकही हात वर नाही! तारुण्य कोणाला हवंय.... सर्वांचे हात वर! इतकी तिरस्करणीय गोष्ट आहे वृद्धत्व ?आपल्या आयुष्याचे निर्माल्य व्हावं असं कुणालाच वाटत नाही. मग निर्माल्य या शब्दाभोवती असणारे वलय कितीका आकर्षक वा पवित्र
असेना. अनपेक्षितपणे चालत येणारी अपेक्षित गोष्ट म्हणजे वृद्धत्व. आयुष्यातल्या ज्या अवस्थेला मृत्यूशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसतो अशा अपरिहार्यतेचं नाव म्हणजे वृद्धत्व. आयुष्यातल्या सर्व मानसिक आणि शारीरिक आजारांना एकच नाव द्यायचं झालं तर 'म्हातारपण' हे नाव पुरेसं आहे. कोणीतरी गमतीने म्हटलं आहे की म्हातारपणाची सुरुवात, ही एखाद्याचं सध्याचं वय असतं त्याच्या पंधरा वर्षानंतर होत असते म्हणून. ह्या १५ वर्षांपैकी सुखाची १४ वर्षे आणि ३६४ दिवस आजपर्यंत कोणाच्याही खात्यात जमा झालेले नाहीत. आजचा दिवस माझा कसा गेला यावरूनच आपल्या आयुष्याचं तरुणपण आणि म्हातारपण ठरत असतं. बारकाईने विचार केला तर म्हातारपण ही शरीरापेक्षा मनाच्या एका अवस्थेचे नाव आहे असं लक्षात येईल.

   लहानपणी सुविचारांच्या वहीत एक सुविचार लिहिला होता (ती वहीपण आता म्हातारी झाली आहे, सुविचार कितीही तरुण असले तरी!)- धृतराष्ट्रासारखं शंभर वर्ष जगण्यापेक्षा अभिमन्यूसारखं वीस वर्ष जगणं चांगलं. आयुष्य जगताना 'कसं' आणि 'किती' या मूल्यांपैकी आपण बहुतेक जण 'किती'ला जास्त महत्त्व देत असतो. Quality पेक्षा quantity लाच जास्त महत्त्व देत असतो, तथापि आयुष्याचा 'कस' हा ते 'कसं' जगलात यावरच अधिक ठरत असतो. आता पुन्हा जर कुणी तुम्हाला विचारलं 'परावलंबी तारुण्य' आणि 'स्वावलंबी वार्धक्य' यापैकी तुम्ही काय निवडाल? तर अर्थातच स्वावलंबी वार्धक्याला झुकते माप द्यावे लागेल. असे खूपच कमी लोक या भूतलावर सापडतील जे अखेरपर्यंत स्वावलंबी होते आणि प्रदीर्घता आणि गुणवत्ता ही दोन्ही वरदानं त्यांना आपल्या आयुष्यात लाभली होती. अशाच एका व्यक्तीची गोष्ट आपण वाचणार आहोत आणि त्याला बोलतानाही पाहणार आहोत!

   आपल्या अगोदरच्या तीन पिढ्या आणि आपल्या नंतरच्या सहा पिढ्या अशा एकंदरीत दहा पिढ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या ह्या माणसाने वयाच्या ११४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. इसवी सन १९०१ मध्ये ब्राझीलमध्ये जन्मलेला बरनँडो लॅपॅलो आणि हा माणूस इसवी सन २०१५ मध्ये ऍरिझोना येथे मरण पावला. अगदी अखेरपर्यंत तो फिरायला जात होता, दुकानात जात होता, स्वतःची दाढी करीत होता, एवढेच काय अधून मधून स्वयंपाक काही बनवित होता . शेवटपर्यंत त्याचे दात शाबूत होते, स्मरणशक्ती आणि विनोदबुद्धी जागृत होती, पूर्ण टक्कल पडले नव्हते आणि त्वचा साठीत असते तशी होती. दीर्घायुष्याचे वरदान लाभलेल्या कुटुंबात जन्मलेल्या बरनँडोचे दैनंदिन जीवन हा अमेरिकेत एका कुतुहलाचा विषय झाला होता आणि अनेक टीव्ही, मासिके, वर्तमानपत्रे वाले त्याची मुलाखत घेण्यासाठी येत किंवा विविध ठिकाणी व्याख्याने द्यायला त्याला बोलवित. National Geographic च्या एका अंकात त्याची अशीच एक प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली होती. व्याख्यान असो वा मुलाखत, त्याला एक प्रश्न नेहमी विचारला जायचा.... बरोबर, तुमच्याही मनात तो आहेच! तो म्हणजे - आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य काय? त्याच्याशी होणाऱ्या संभाषणात तो काही मुद्द्यांवर वारंवार भर देत असे. ते मुद्दे खालीलप्रमाणे -

  
   १. आपल्या दीर्घायुष्याचं श्रेय तो आपल्या वडिलांना देतो. त्यांच्या आयुष्याचं शतक केवळ एका वर्षाने हुकलं पण त्यांनी दिलेले निरोगी आयुष्याचे कानमंत्र बरनँडोने आयुष्यभर पाळले. त्याची आई १०५ वर्षाची होऊन स्वर्गवासी झाली व त्याची एक नात वयाची पन्नाशी ओलांडली तरी कशी तरुणच दिसते. फोटो बघा -

Bernando Lapello 114 years secret of long life

   २. आपल्या तरुणपणात एका पर्यटन करणाऱ्या जहाज कंपनीमध्ये एक cook म्हणून नोकरी केलेला बरनँडो शाकाहार करण्यावर अधिक भर देतो. कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्याने red meat तो विषाप्रमाणे दूर सारतो.

   ३. बरनँडो म्हणतो, ''मी कुठल्याही गोष्टीचा कधी अतिरेक केला नाही आणि तब्येतीची कुठल्याही गोष्टीशी तडजोड केली नाही. लावून घेतलेल्या निरोगी सवयी आजपर्यंत सोडल्या नाहीत.''

   ४. उभ्या आयुष्यात कधीही आजारी न पडलेला बरनँडो रोज सकाळी चार वाजता उठतो आणि दीड मैल फिरायला जातो.

   ५. आहारात फळे, पालेभाज्या मुबलक, पाणी पिण्याचे प्रमाण बऱ्यापैकी जास्त.

   ६. आपल्या त्वचेच्या निरोगी कांतीचे श्रेय बरनँडो ऑलिव ऑइलला देतो. आपल्या त्वचेला Olive oil ने मसाज करणे हा त्याचा नित्य परिपाठ आहे. Get Massage Olive oil   

   ७. खालील तीन चार पदार्थांचा बरनँडो आपल्या आहारात नियमित समावेश करतो. आपल्या चिरतरुण्याची काही रहस्ये खालील पदार्थांमध्ये दडलेली आहेत, असे त्याचे म्हणणे आहे.

   * लसूण : जगात जे काही superfoods आहेत त्यात लसणाचा हटकून समावेश होतो. लसूण रक्त शुद्ध करतो, बुद्धी वाढवतो,हृदय सशक्त करतो, अनेक तर्हेचे वातरोग नष्ट करतो. कच्च्या लसणाचे औषधी गुणधर्म फोडणीत करपून गेलेल्या लसणाच्या गुणधर्मांपेक्षा शंभर पट जास्त असतात. (माझ्या परिचयाचे एक स्वामीजी रोज सकाळी लसणाच्या दोन लहान पाकळ्या व मोड आलेले मूग वर्षानुवर्ष खात असत. ते ९४ वर्षे जगले!)
कच्चा लसूण खाल्ल्यानंतर मुखास येणारा तीव्र गंध हा नकोसा होत असेल त्यांनी लसणाच्या कॅप्सूल्स घ्याव्यात. Get Garlic Capsules

   * दालचिनी : लसणाप्रमाणेच तीव्र वासाची दालचिनी आपल्या स्वयंपाक घरातील मसाल्यांचा एक अविभाज्य घटक आहे. दालचिनीचे बरेच गुणधर्म लसणासारखे आहेत. दालचिनी पावडर हिरड्यांना मजबुती प्रदान करते व स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे शैथिल्य दूर करते.

   * मध : मध म्हणजे पृथ्वीतलावरचे अमृत. हजारो फुलांतील मध गोळा करुन मधमाशा एका पोळ्यात त्याचा संचय करून ठेवतात त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या मधात हजारो फुलांचे औषधी गुणधर्म आयतेच एकत्र झालेले आपल्याला दिसतात. म्हणून मध हे जबरदस्त औषधी रसायन आहे. तो भेसळयुक्त असला तरी औषधीच असतो! सेंद्रिय मध हा सर्वोत्तम. मध हा लेखन आहे अर्थात् शरीरातले दोष खरवडून काढणारा आहे. तो योगवाही आहे अर्थात् ज्यात मिसळला जाईल त्याचे औषधी गुणधर्म वृद्धिंगत करेल. मध हे सर्वश्रेष्ठ अनुपान आहे. तो कांती उजळवणारा आहे, डोळ्यांना हितकर आहे. शरीरातील अंतर्गत जखमा मध भरून काढतो आणि हजारो वर्षे ठेवला तरी तो खराब होत नाही. चला आपण सगळेच आजपासून मत खायला सुरुवात करूया! Get Organic Honey
टीप: आयुर्वेदाने मध व तूप एकत्र खाऊ नये असे सांगितले आहे.

   * चॉकलेट : गेल्या काही वर्षांच्या संशोधनातून निर्विवादपणे समोर आलेली गोष्ट म्हणजे नियमित चॉकलेट खाणे हे हृदय, मेंदू व रक्ताभिसरण या तिन्हीसाठी वरदान आहे. चॉकलेट खाणे हे शरीराला हानीकारक आहे हेही खरं आणि हितकारक आहे हे पण त्यापेक्षा जास्त खरं. यातली एक मेख लक्षात असू द्यावी - चॉकलेटमधील cocoa चे प्रमाण जेवढे अधिक तेवढे ते जास्त चांगले आणि त्यातील साखर, कोलेस्टेरॉल, प्रिझर्वेटिव्ह आणि हेवी मेटल चे प्रमाण जेवढे जास्त तेवढे शरीरास जास्त हानीकारक. चॉकलेट हे चांगल्या कंपनीचे घ्यावे व त्यावरील लेबल चेक करून घ्यावे. चॉकलेट खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होतेच. तुम्ही प्रयोग करून बघू शकता. Get HEALTHY CHOCOLATEl

   बरनँडोबद्दल ही माहिती वाचून त्याला ऐकण्याची उत्सुकता जागृत झाली असल्यास -



   आपल्या आयुष्याच्या सर्व सुखदुःखाची आणि अनुभवांची गोळाबेरीज बरनँडो एका वाक्यात मांडतो - इतरांकडून तुम्हाला जशा वागणुकीची अपेक्षा असते तशी वागणूक तुम्ही इतरांना द्या.

   किती सखोल विचार आहे हा!
  अशा या बरनँडोला मरणदेखील किती सुखाचं यावं! वयाची ११४ वर्षे आणि १२२ दिवस पूर्ण केलेला बेर्नांडो एके रात्री झोपेत असतानाच चीरनिद्रेच्या यात्रेवर चालता झाला!

   
   वाचाBernando LaPello यांनी लिहिलेली पुस्तके -


















   
पुढील लेखात वाचा: विविध देशातील शतायुषी सांगताहेत आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य