एक असं चरित्र जे कितीही वेळा ऐकलं, वाचलं वा सांगितलं तरी मन भरत नाही, त्याचं नाव 'शिवचरित्र' अर्थात् छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र. कथा, चित्रपट, पोवाडे, कीर्तन... अनेक रूपांत हे अखंड प्रेरणादायी चरित्र जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलंय. प्रस्तुत आहे शिवरायांचं - चित्रमय चरित्र !
Click to play.
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हें तूतें वंदना
करि अंतःकरण तुज अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे भंगले
जाहलीं राजधान्यांचीं जंगलें
परदास्य-पराभवि सारीं मंगलें
या जगतिं जगूं ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा !
• रचना : स्वातंत्र्यवीर सावरकर
• सौजन्य: बालभारती, पुणे,
राजा शिवछत्रपती, पुरंदरे प्रकाशन, पुणे

























0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊