आज दसरा आणि पेपरमध्ये जिकडेतिकडे सोन्याच्याच जाहिराती! पण ज्ञानाची किंमत ही सोन्याच्या किमतीपेक्षा कधीही जास्तच. केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द

ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 11 .
words from Marathi to English

▪ कुठलाही क्रम नसलेले = shuffled
You can use these number tags in sequential or shuffled order. हे क्रमांक तुही क्रमाने वापरू शकता वा एकत्रितपणे पण.
- Syn: random

▪ विचित्र, चमत्कारिक = quaint
It is a quaint tradition where the groom is not allowed to see the bride until the wedding has taken place. ही एक विचित्र प्रथा आहे ज्यामध्ये वाराला लग्न होईपर्यंत वधूला बघण्याची परवानगी नसते.

▪ पर्यंत पुढे ढकलणे = to hold over until
The elections are held over until November due to pandemic. आजाराच्या साथीमुळे निवडणुका नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलल्या.

▪ जड पावले टाकत चालणे = to plod
Injured and hungry, the soldiers plodded on while their horses followed them. जखमी आणि भुकेल्या अवस्थेत सैनिक पाय ओढत चालले होते आणि त्याचे घोडे त्यांच्या मागून चालत होते.

▪ पाऊस पडल्यानंतर येणारा मृदगंध = petrichor
No perfume can equate the ethereal petrichor that pervades after the first rain. पहिल्या पावसानंतर पसरणाऱ्या मृदगंधाची सर कुठल्याही अत्तराला येणार नाही.

" When performance overtakes ambition, we call it success and when ambition overtakes performance, we call it failure."

▪ नुकसानभरपाईच्या दाव्यापासून बचाव होण्यासाठी काढलेले प्रमाणपत्र = indemnity certificate
Indemnity certificate is a must in medical practice. वैद्यकीय व्यवसायात वीम्याचे प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे.

▪ अन्वयार्थ लावणे = to construe
Religious teachings are mostly wrongly construed all over the world. धार्मिक शिकवणुकींचे संपूर्ण जगात चुकीचेच अर्थ लावले जातात.
- Syn: to interprete, to deem

▪ छोटासा खड्डा = indentation
A bird dropped a mango from the tree which created an indentation on my car. एका पक्ष्याने झाडावरून एक आंबा टाकला ज्यामुळे माझ्या कारवर एक खड्डा पडला.

▪ अस्वस्थ करणे = to unnerve
The way this burglary took place, unnerved all the residents. ज्या पद्धतीने ही चोरी झाली ते बघून सर्व रहिवासी अस्वस्थ झाले.
- Syn: to enervate, to unsettle

▪ भीतीने मागे सरणे = quail
Seeing the unusual movement in the bush, she quailed. झुडुपामध्ये काहीतरी निराळीच हालचाल झालेली बघून ती भीतीने मागे सरली.

<<< मागील भागपुढील भाग >>>