Reading between the lines करण्याअगोदर reading in the lines करता यायला हवे आणि त्यासाठी शब्द माहिती हवेत. केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 9.

Words from Marathi to English


▪ मोठी गुहा = cavern
The caverns under Padmanabhaswamy temple are full of staggering piles of jewellery. पद्मनाभस्वामी मंदिराच्या खालील गुहा मौल्यवान दागिन्यांच्या प्रचंड राशींनी भरलेल्या आहेत.

 ▪ संकटाचे संकेत देणे = to spell doom
Big jaws of the crocodile spell doom for antelopes crossing the river. मगरीचे मोठमोठे जबडे म्हणजे नदी पार करणाऱ्या काळवीटांसाठी धोक्याची सूचनाच. 

 ▪ च्या हाती सोपवणे = to concede to
The king conceded the kingdom to the prince and he headed for the forest. राजाने राज्य राजपुत्राकडे सोपवले आणि तो जंगलाकडे चालता झाला.
- Syn: to hand over 

 ▪ पराभव मान्य करणे = to concede
Yudhishthir didn't concede even when he had lost his kingdom to Duryodhan in the game of dice. दुर्योधनाशी पाशक्रीडेमध्ये राज्य गमावल्यानंतरही युधिष्ठिराने पराभव स्वीकारला नाही. 

 ▪ कल्पनेपलीकडील मोठे = stupendous
Acquiring a PhD at the age of 18 is a stupendous achievement. वयाच्या १८व्या वर्षी पी.एच.डी. मिळवणे ही एक अपार मोठी उपलब्धी आहे.
- Syn: colossal, prodigious 

" Read books as one would breathe air, to fill up and live. "
- Annie Dillard

 ▪ बद्कन् खाली बसणे = to flop
Tired and exhausted, he flopped into the chair. थकून भागून शिणलेला तो, बद्कन् खुर्चीमध्ये बसला. 

 ▪ स्वप्नराज्यात रममाण होणे = to moon about
Ever since I was a child, I moon about swimming with dolphins in the sea. अगदी लहान असल्यापासून डॉल्फीन्सबरोबर समुद्रात पोहण्याची कल्पना मी करत आलेलो आहे.
- Syn: to daydream 

 ▪ अगदी मोजक्याच जणांना ठाऊक असलेले = esoteric
This esoteric bird language can be discerned by just a few mountain dwellers. ही विरळी पक्ष्यांची भाषा डोंगरात राहणाऱ्या अगदी मोजक्याच लोकांना समजते. 

 ▪ स्त्रीचे पूर्वाश्रमीचे नाव = nee
Bhagini Nivedita, nee Margaret Elizabeth Noble, was an Irish teacher. भगिनी निवेदिता, पूर्वाश्रमीची मार्गारेट एलिझाबेथ नोबेल, ही एक आयरिश शिक्षिका होती. 

 ▪ घोळका करणे = to huddle around
The deer huddled around me when I brought the stack of grass in my jeep. मी जीपमधून गवताची पेंढी आणताच हरणांनी माझ्याभोवती एकाच घोळका केला.

<<< मागील भागपुढील भाग >>>