जे शब्दांवर प्रेम करतात ते तुम्ही-आम्ही वाङ्मयप्रेमी आणि ज्यांच्यावर शब्द प्रेम करतात ते साहित्यिक! केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द

ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 10.
Words from Marathi to English

▪ लयबद्ध, तालबद्ध, उंचसखल = undulating
The river banks are fringed with trees and undulating grass lands. नदीचे किनारे झाडे आणि उंचसखल हिरवळीच्या भूभागांनी सुशोभित झाले आहेत.
- Syn: wavy 

▪ लोकांसमोर आणणे, लागू करणे = to enact
Where enacted laws are not obeyed, they must be enforced. जेथे लागू केलेले नियम पाळले जात नाहीत, तेथे ते सक्तीने लागू केले जावेत.
- Syn: to ordain 

 ▪ फुगून बाहेर येणे = to billow
Whorls of smoke billowed out as the spaceship darted upwards. अंतराळयानाने उड्डाण केले तसे धुराचे लोट बाहेर पडले. 

 ▪ रागाने रुसून = in a huff
Pinki went inside in a huff as somebody wiped her rangoli out. रांगोळी पुसली म्हणून पिंकी रागाने रुसून आत जाऊन बसली.
- Syn: in miff, in vexation 

 ▪ उघड उघड अवज्ञा = defiance
Had you not been my son, I would not have tolerated this defiance. तू माझा पुत्र नसतास तर ही अवज्ञा मी सहन केली नसती. 
 

" Two days in life you can't work - yesterday and tomorrow. So work today! "

▪ अदलाबदली करणे = to swap
We had to swap convicted terrorists for aeroplane hostages. विमानातील दोषी अतिरेक्यांच्या बदल्यात ओलीसांची सुटका करण्यात आली. 

▪ exchange मधे = in swap
I bought this mobile in swap. हा मोबाईल मी exchange मध्ये घेतला.

▪ एक हलकी भर = a dash of
Add a dash of lemon juice to the top of hot pulav rice. गरम गरम पुलावावर हलकेच थोडासा लिंबाचा रस घाला. 

 ▪ पावित्र्य नष्ट करणे = to defile
Mahmud Ghaznavi defiled the temples by slaughtering cows in them. मोहम्मद गझनवीने मंदिरांमध्ये गायींची कत्तल करून मंदिरांचे पावित्र्य नष्ट केले.
- Syn: to maculate, to tarnish 

▪ ताब्यातील वस्तू, अधिकार इ.चा त्याग करणे = to relinquish
The poet relinquished his award to express protest against the government's decision of deforestation. सरकारच्या जंगलतोडीच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी त्या कवीने आपल्या पुरस्काराचा त्याग केला.
- Syn: to renounce 

<<< मागील भागपुढील भाग >>>