बागेमध्ये फुलांचे प्रकार, त्यांचे रंग जेवढे विविध तेवढी ती बाग अधिक आकर्षक दिसते. शब्द हे भाषारूपी उपवनातील फुलेच होत. केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 27.

Out and away, the most colorful bird walking along the lake

▪ (भावना अनावर झाल्याने) मधेच बोलणे = to interject
"My grandpa's spects is just like Gandhiji's", someone interjected in the class. "माझ्या आजोबांचा चष्मा गांधीजींच्यासारखाच आहे," कुणीतरी मधेच वर्गात ओरडला.

▪ खाली पडणे = to fall in
The ceiling fell in as the spectators crowded. प्रेक्षकांची संख्या वाढली तसे छत कोसळले.

▪ अयशस्वी होणे = to fall through
Our plans to snap two wickets in the first ten overs fell through. पहिल्या दहा षट्कात दोन विकेट्स पटापट घेण्याची आमची योजना बारगळली.

▪ वेगाने कमी होणे = to fall off
Attendance falls off on rainy days. पावसाळी दिवसांत उपस्थिती झपाट्याने कमी होते.

▪ उपहास करणे = to deride
Initially people derided us but later contributed to the noble project. अगोदर लोकांनी आमची थट्टा केली पण नंतर ह्या थोर उपक्रमाला त्यांनी मदत केली.
- Syn: to ridicule, to mock

" Sleep, riches and health, to be truly enjoyed, must be interrupted. "
– Johann Paul Friedrich Richter

▪ एखाद्या गोष्टीची सवय होऊन जाणे = to inure to
Residents of Kabul are inured to bomb explosions now. काबूलच्या रहिवाशांना आता बॉम्बस्फोटांची सवय झालेली आहे.

▪ फारच (उत्कृष्ट वा निकृष्ट) = out and away
Indonesian dancers are out and away the best performers in the competition. इंडोनेशियन नर्तक हे निःसंशय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सादरकर्ते आहेत.

▪ स्वामीत्व = lordship
This old house standing here is bereft of any lordship. हे जुनाट घर कोणाच्याही मालकीविना इथे उभे आहे.

▪ वाङ्मयनिर्मिती करणे = to indite
Sage Vyasa indited four vedas and eighteen puranas which also includes Mahabharat. महर्षी व्यासांनी चार वेद आणि अठरा पुराणांची रचना केली ज्यात महाभारताचाही समावेश होतो.

▪ ज्यात संशय घ्यायला जागा नाही असे = indubitable
As you sow, you reap. This is an indubitable law of the Universe. जसे कराल तसे भराल . हा विश्वाचा संशयातीत सिद्धांत आहे.

<<< मागील भागपुढील भाग >>>