कोणतीही भाषा म्हणजे एक वाद्य असते आणि शब्द म्हणजे त्या वाद्याच्या तारा. त्या तारा व्यवस्थित लावल्या असतील तर ते वाद्य सुरात चालते , नाहीतर सगळेच बेसूर होऊन जाते. केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 26.
▪ कारणीभूत समजणे = to attribute
Ancient people attributed eclipses to the curse of Gods. पूर्वीचे लोक ग्रहणांसाठी देवांच्या शापांना कारण मानीत.
▪ पट्कन मैत्री जुळणे = to hit it off with
Our dog likes people so much that he hits it off with anybody right away. आमच्या कुत्र्याला माणसं इतके आवडतात की कुणाशीही त्याची पट्कन मैत्री जुळते.
▪ एखाद्यावर टीका करणे = to hit out at
Readers hit out at the TV journalist who supported Pakistan's stance on Kashmir. पाकिस्तानच्या काश्मीरबद्दलच्या भूमिकेशी सहमत असणाऱ्या टी.व्ही. पत्रकाराचा लोकांनी चांगला समाचार घेतला.
▪ सारखे नकारात्मक बोलणारा व टीका करणारा = censorious
Your bitter and censorious remarks have left the parents with no choice but to change the school. तुमच्या कडवट आणि टीकात्मक विधानांमुळे पालकांना शाळा बदलण्यावाचून दुसरा पर्यायच राहिला नाही.
▪ संबंध जुळणे, अडकणे = to hook into
During my vacation in childhood, I used to get hooked into Amar Chitra Katha comics. लहानपणी सुट्यांच्या काळात मी अमर चित्र कथांच्या कॉमिक्समध्ये गुंतून राहत असे.
- Syn: to hitch up
▪ साठा करणे = to hoard
Honey-bees hoard honey in the hive. मधमाश्या पोळ्यामध्ये मधाचा साठा करतात.
- Syn: to amass, to hive up
▪ नष्ट किंवा हानी होण्यापासून वाचवणे = to salvage
All the Gods requested Lord Vishnu to salvage the earth from the atrocity of demons. सर्व देवतांनी पृथ्वीला राक्षसांच्या अत्याचारापासून वाचवण्याची भगवान विष्णूला प्रार्थना केली.
- Syn: to retrieve, to reclaim, to rescue
▪ तीव्र आवड = penchant
Mr. Eisenberg has a penchant for colorful parrots from different countries. श्री. आयसेनबर्ग यांना विविध देशांतील रंगीबेरंगी पोपटांची आवड आहे.
- Syn: predilection
▪ पूर येणे, वर्षाव होणे = to inundate
The spammers inundated my inbox with spam emails. स्पॅमर्स लोकांनी माझा इनबॉक्स फसव्या इमेल्सनी भरून टाकला.
▪ हेलकावे खाणारे = pendulous
See those beautiful pendulous bird nests hanging form the branches. ती फांद्यांना लटकलेली हेलकावे खाणारी पक्षांची सुंदर घरटी पहा.
- Syn: dangling,
0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊