दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर असणे आवश्यक आहे तसे दोन शब्दांमध्ये सुद्धा! केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 24.
▪ गरज भासल्यास कामाला येणे = to fall back on
We can fall back on our savings in case business fails. धंदा बसल्यास बचतीचा पैसे आपल्याला कामाला येईल.
▪ अयशस्वी होणे, बंद पडणे = to break down
A robot was sent into space to repair broken down spaceship. बिघडलेले अंतराळयान दुरुस्त करण्यासाठी एक यंत्रमानव अंतराळात पाठवण्यात आला.
- Syn: to crumble, to pack up, kick the bucket, to fail
▪ अफवा पसरवणारे = rumor mongers
Two rumor mongers were arrested for spreading rumors on Facebook regarding University results. विद्यापीठ निकालांबाबत फेसबुकवर अफवा पसरवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली.
▪ खलबते करणे = to connive
The spies are conniving over a scheme to enter into the fort. किल्ल्यात प्रवेश मिळवण्याची योजना आखण्यासाठी गुप्तहेरांमध्ये खलबते चालू आहेत.
▪ छोटी कादंबरी = novelette
The film is based on a novelette - The Secret of the Bots. 'The Secret of the Bots' ह्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.
▪ चुरगाळलेला = crumpled
The torn and crumpled old photograph was attempted to be restored. एका फाटलेल्या आणि चुरगळलेल्या फोटोचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला गेला.
▪ तुकडे तुकडे होऊन नष्ट होणे = to crumble
The govt must pay attention to old sculptures before they crumble. सरकारने जुन्या शिल्पाकृतींकडे नष्ट होण्याअगोदरच लक्ष दिले पाहिजे.
- Syn: to disintegrate
▪ निरुपयोगी झाल्याने दुर्लक्षित झालेला = derelict
The scuba drivers found the remnants of a derelict sunken ship at sea-bottom. पाणबुड्यांना समुद्राच्या तळाशी बुडालेल्या दुर्लक्षित जहाजाचे अवशेष सापडले.
- Syn: delinquent,
▪ गावातील चर्चित व्यक्ती = toast of the town
A pot full of gold coins was found in Gopinath's field. He is the toast of the town. गोपीनाथच्या शेतात सोन्याच्या नाण्यांनी भरलेला घडा सापडला. तो सध्या गावात चर्चेचा विषय आहे.
▪ जिंकायचे विषय (ठिकाण, संपत्ती, व्यक्ती इ.) = conquest
The conquest of space is a near impossible task for human being. अवकाशावर विजय मिळवणे ही मानवाच्या दृष्टीने अशक्य कोटीतील गोष्ट आहे.
0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊