सर्वात सोपी भाषा कोणती आणि सर्वात कठीण भाषा कोणती ह्याबाबत खूप चर्चा होतात. खरं म्हणजे, एखाद्याची मातृभाषा म्हणजे त्याच्यासाठी सर्वात सोपी भाषा. केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 22.

guzzling down the demure beauty of nature

▪ दुटप्पीपणा = duplicity
Hypocrisy, double standards, deceit and duplicity - everything became obvious when the party lost election. ढोंगीपणा, दुहेरी प्रामाण्य, फसवेगिरी आणि दुटप्पीपणा - निवडणूक हरताच राजकीय पक्षाच्या ह्या सर्व गोष्टी उघड झाल्या.

▪ पाऊस आणि बर्फ ह्यांचा वर्षाव = sleet
One can enjoy snow but not hail and sleet. तुम्ही भुरभुरणाऱ्या बर्फवर्षावाची मजा लुटू शकता, पण गारांची आणि बर्फमिश्रित पावसाची नाही.

▪ मनातल्या मनात हसणे = to laugh in one's sleeve
Everyone laughed in their sleeves when a rat jumped out of our lecturer's sack. शिक्षकांच्या पिशवीतून एक उंदीर उडी मारून पळाला हे बघून सगळेजण मनातल्या मनात हसले.

▪ घटाघटा पिणे = to guzzle down
To enjoy the French onion soup, take it sip by sip, don't just guzzle down. फ्रेंच ओनियन सूपची मजा लुटायची असेल तर घोट घोट घे, घटाघट पिऊ नकोस.

▪ अत्यंत स्फूर्तीने = with gusto
He took to the assignment with gusto, and made it a life mission. त्याने दिलेले काम अत्यंत उत्साहाने स्वीकारले आणि त्याला जीवनकार्य बनवून टाकले.
- Syn: zeal, fervour

" Each time the history repeats itself, the price goes up."
– Ronald Wright

▪ नापसंती = demur
You ought not express your demur while serving your old parents. आपल्या वृद्ध मात्यापित्यांची सेवा करताना नाक मुरडू नकोस.
- Syn: dissent, disinclination

▪ सभ्य आणि साधा = demure
Her demure appearance and sweet voice belie her intellectual prowess. तिचा साधा बहिरंग आणि गोड आवाज तिची बौद्धिक क्षमता दिसू देत नाहीत.

▪ लाजिरवाणा = ignominious
Aurangjeb's regime was marked by incidents of the most ignominious kind. औरंगजेबाची कारकीर्द अत्यंत लाजिरवाण्या घटनांनी अधोरेखित झाली होती.
- Syn: disgraceful

▪ वाया घालवणे = fritter away
You frittered away an opportunity to show your painting skill. आपल्या चित्रकलेचे कौशल्य दाखवण्याची एक चांगली संधी तू गमावलीस.

▪ पदाला, दर्जाला न शोभेल असा = derogatory
Spitting in open would be derogatory to your profession. खुल्यामध्ये थुंकणे हे तुझ्या पेशाला शोभून दिसणारे नाही.
- Syn: deprecatory, belittling

<<< मागील भागपुढील भाग >>>