एका माणसाची अनेक नवे असतात व एका नावाची अनेक माणसे असतात. शब्दांचेपण अगदी तसेच आहे! एका शब्दाचे अनेक अर्थ असतात आणि एका अर्थाचे अनेक शब्द असू शकतात. केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग -21 .
▪ दूषण देणे = to reproach
The patient's family reproached the doctor for not giving timely treatment. वेळेवर वैद्यकीय मदत न दिल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला दूषणे दिली.
▪ गोष्ट बारकाईने करणे = cross (one's) t's and dot (one's) i's
After solving the question paper, make sure once again that you have crossed your t's and dotted your i's. प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लिहिली आहे की ते नाही ते एकदा बारकाईने तपासून बघ.
- Syn: scout out the things
▪ सादरीकरण = exposition
Such a complicated topic but made easy with your lucid exposition. एवढा किचकट विषय पण तुझ्या ओघवत्या सादरीकरणाने खूपच सोपा करून टाकला.
- Syn: expounding
▪ संकरित = cross-breed
All the milk in the dairy comes from the cross-breed cows and buffaloes. डेअरीतील सर्व दूध हे संकरित गाई-म्हशींचे असते.
▪ खास, मुद्दाम = expressly
I have come expressly to congratulate you. मी खास तुझे अभिनंदन करण्याकरीता आलेलो आहे.
▪ अडकून पड्लेल्याची सुटका करणे = to extricate
Taylor family extricated the kangaroo who was entangled in the mesh. जाळ्यामध्ये अडकून पडलेल्या कांगारूंची टेलर कुटुंबाने सुटका केली.
- Syn: disentangle
▪ उपहासात्मक निंदा = derision
The CEO's decision to get everyone tested for HIV was met with derision. प्रत्येकाची HIV चाचणी करून घेण्याच्या CEOच्या निर्णयाची टर उडवण्यात अली.
- Syn: ridicule, jeer
▪ अलंकारिक सौंदर्य = lapidary
The lapidary splendor of Mugal-e-azam is best enjoyed on the big screen only. मुगल-ए-आझमच्या अलंकारिक सौंदर्याचे आस्वादन करावे तर ते मोठ्या पडद्यावरच.
▪ मंदबुद्धी = dullard
"Don't you know in which state Shrinagar is? You are even more dullard than Rahul Gandhi." श्रीनगर कुठल्या राज्यात आहे एवढंपण तुला माहित नाही? तू तर राहुल गांधींपेक्षाही जास्त मंदबुद्धी आहेस ."
- Syn: dunce
▪ काठावर, कडेकडेने = on the fringe
Squirrels are frisking on the fringes of the garden. खारी बागेच्या कडेकडेने खेळत आहेत.
0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊