शब्दकोश म्हणजे शब्दांची विश्रांतीची जागा. शब्द जेव्हा शब्दकोशातून बाहेर पडतात तेव्हा ते जंगल हलवून सोडतात! केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 19.

a scramble to see clouds glowing with fiery colors of the sunset

▪ स्पष्ट करून सांगणे = to elucidate
Her speech elucidated how a soul is reborn after death. मृत्यूनंतर आत्म्याचा पुनर्जन्म कसा होतो हे तिने आपल्या व्याख्यानात स्पष्ट करून सांगितले.
- Syn: to explicate

▪ दाटीवाटी = scramble
There was a big scramble to get the autograph of Sachin. सचिनची स्वाक्षरी मिळवण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
- Syn: scuffle

▪ स्वतःला सवय करून घेणे = to resign oneself to
I have resigned myself to being lashed out to every small mistake. प्रत्येक लहानसहान चुकीसाठी खरडपट्टीला सामोरे जायची मी स्वतःला सवय करून घेतली आहे.

▪ एखादी गोष्ट शेवटी मान्य करणे = to relent
The chaukidar finally relented and allowed us to take two guavas from the garden. चौकीदार शेवटी नरमला आणि त्याने आम्हाला बागेतून दोन पेरू घेऊन जाण्यास परवानगी दिली.

▪ युद्ध संपवण्यासाठी केलेला करार = truce
Eventually a truce was reached on the condition to exchange prisoners. कैद्यांची अदलाबदल करून घेण्याच्या अटीवर शेवटी युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आला.

"If I have learned nothing else, it's that time and practice equal achievement. "
- Andre Agassi

▪ (गुलामगिरीतून) मुक्तता करणे = to emancipate
Black people emancipated from slavery settled in East Africa. गुलामगिरीतून मुक्त करण्यात आलेले काळे लोक पूर्व आफ्रिकेत स्थायिक झाले.
- Syn: to liberate

▪ अस्पष्ट, धूसर, अंधुक = nebulous
Few documents were found in the cellar of the fort with nebulous handwritings. किल्ल्याच्या तळघरात अस्पष्ट हस्तलिखितांचे काही कागद मिळाले.
- Syn: hazy, obscure, blurred

▪ ज्यातून करकर आवाज येतो असा = creaky
The door sounds creaky, it needs oiling. दार करकर आवाज करतंय, त्याला वंगणाची गरज आहे.

▪ किरकिरणारे मूल = cranky
The sermon was being interrupted by the cries of that cranky kid. प्रवचनामध्ये त्या किरकिरणाऱ्या मुलाच्या रडण्याने व्यत्यय येत होता.
- Syn: pettish, peevish, grumpy

▪ राग आणणे = to get on someone's nerves
Your habit of keeping the lights on during sleep gets on my nerves. झोपताना लाईट चालू ठेवण्याच्या तुझ्या सवयीमुळे मला फार राग येतो.
- Syn: to hack someone off, to irritate

<<< मागील भागपुढील भाग >>>