जगात ७००० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषेचा मूलभूत घटक म्हणजे शब्द. केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 17.
▪ खोटी ओळख दाखवणारा, तोतया = imposter
An imposter called up asking for my ATM card details. माझ्या ATM कार्डाचे तपशील विचारण्यासाठी एका तोतयाने फोन केला होता.
- Syn: shammer
`
▪ जबरदस्तीने दाबून धरलेले = stifled
Every Chinese citizen carries a stifled desire for freedom which is suppressed by the communist regime. प्रत्येक चिनी नागरिक मनात स्वातंत्र्याची एक सुप्त इच्छा बाळगून असतो जी की तेथील हुकूमशाही राजवटीने दडपून टाकलेली आहे.
▪ कुंकवाचा रंग = carmine
A bed of carmine Geranium flowers. जिरॅनियमच्या गडद लाल रंगाच्या फुलांचा ताटवा
▪ वैषयिक, शारीरिक = carnal
There is something more in the life than just satisfying the carnal pleasures. शारीरिक सुखांची पूर्तता कारण्यापलीकडेसुद्धा जीवनात बरेच काही असते.
▪ एखाद्याचे वाईट होवो म्हणून त्याला दिलेले शिव्याशाप = imprecation
Imprecations uttered by a hungry soul carry the worst out-turns. भुकेल्या जीवाने उच्चारलेले शाप सर्वात वाईट असतात.
- Syn: curse
▪ स्वैरवर्तनी, मनमानी = libertine
Your lifestyle tends to be more and more libertine as you get more and more money. अधिकाधिक पैसा हाती येतो तसतसे तुमचे वर्तन अधिकाधिक स्वैर होऊ लागते.
▪ अतिशय स्पष्ट = explicit
Explicit evidence is available to indicate that this is a suicide and not a murder. ही आत्महत्या आहे आणि हत्या नाही हे दर्शविण्यासाठी सुस्पष्ट पुरावा उपलब्ध आहे.
- Syn: overt, unambiguous
▪ नाच-गाणी-मद्याने रंगलेली पार्टी = carousal
`
We work five days a week, take rest on Sunday and spend Saturdays in carousals. आम्ही आठवड्याचे पाच दिवस काम करतो, रविवारी विश्रांती घेतो आणि शनिवार पार्ट्यांमध्ये घालवतो.
- Syn : revelry
▪ कपात करणे = to whittle down
Our aim is to whittle down the losses as much as possible. नुकसान कमीत कमी होऊ देणे हेच आमचे उद्देश्य आहे.
▪ अपारंपरिक, नाविन्यपूर्ण = outlandish
He came up with the outlandish idea of sterilizing dogs to control their increasing population. कुत्र्यांची वाढणारी संख्या रोखण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याची नावीन्यपूर्ण कल्पना तो घेऊन आला.
0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊