शब्दांना कुणीतरी शस्त्र म्हटलंय. ते खरंच आहे, पण आपण शब्दांचा अभ्यास एक शास्त्र म्हणून करायचा.केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 16.

Marathi to English words

▪ मवाली, उनाड = hooligan
In every class there are one or two hooligans, right? प्रत्येक वर्गात एक-दोन तरी उनाड मुले असतातच, बरोबर?
- Syn: bully, ruffian

▪ हसू दाबून (हसणे) = to snicker
As the professor stumbled on the steps, the girls snickered. प्रोफेसर पायऱ्यांवर अडखळले आणि मुलींनी हसू दाबून धरले.

▪ खो खो हसणे = to guffaw
As the professor stumbled on the steps, the boys guffawed. प्रोफेसर पायऱ्यांवर अडखळले आणि मुले मोठ्याने हसली.
- Syn: split one's sides

▪ (विनोद झाल्याने) सहज हसणे = to giggle
I never get bored. Whats app keeps me giggling all day. मला कधीच बोअर होत नाही. Whats app मला दिवसभर हसवत ठेवते.

▪ (ओठ न उघडता) सौम्य आवाजात हसणे = to chuckle
She was chuckling all the while she was reading Pu.La's story. पु.लं. ची कथा वाचताना ती सतत हसत होती.

Failure is God's way of saying,"Excuse me, yuo're moving in the wrong direction."
– Oprah

▪ स्मितहास्य करणे = to smile
I cannot forget the smile on Lord Krishna's lotus face in Mahabharat serial. महाभारताच्या मालिकेतील श्रीकृष्णाच्या मुखकमलावरील स्मितहास्य मी कधी विसरू शकत नाही.
- Syn: to grin

▪ टर उडवणे, थट्टा करणे = to sneer
Rahul Gandhi sneers at Modi and the whole country sneers at Rahul Gandhi. राहुल गांधी मोदींची थट्टा करतो आणि संपूर्ण देश राहुल गांधींची.

▪ तोंड वाकडे करणे = to grimace
Humans can grimace to express their disapproval, animals or birds can't. तोंड वाकडं करून मनुष्यप्राणी नापसंती व्यक्त करू शकतो, पशुपक्षी नाही.

▪ सहिष्णुता, दुसऱ्यांचे दुःख बघून द्रवित होण्याची वृत्ती = empathy
There are very few doctors who have medical skill as well as empathy. ज्यांच्याजवळ वैद्यकीय कौशल्य आणि दयार्द्र मनदेखील आहे असे डॉक्टर्स फार कमी आहेत.

▪ मागे एकसारखा लकडा लावणारा = importunate
Beware of those importunate pandas at pilgrimage places who will annoy you for money. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पाठीमागे लागणाऱ्या पंड्यांपासून सावध राहा, पैशांसाठी ते तुम्हाला हैराण करून सोडतील.

<<< मागील भागपुढील भाग >>>