प्रथमतः नुसता आवाज, नंतर असंबद्ध बडबड, त्यानंतर बोबडे शब्द, आणि नंतर सुसंबद्ध शब्द, त्यानंतर वाक्यं, नंतर लिहिण्याचा सर्व, त्यानंतर परिचछेद, नंतर..... निबंध, पत्र,
वर्तमानपत्र, पुस्तक ... हा आहे आपल्या भाषेचा प्रदीर्घ प्रवास! शब्द हा कुठल्याही भाषेचा मूलभूत घटक. केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 7.
words from Marathi to English


▪ भडक, हीन अभिरुची दर्शवणारे = garish
Garish curtains are not suitable for the soft painted walls. सौम्य रंगाच्या भिंतींवर हे भडक पडदे शोभत नाहीत.
- Syn: gaudy

▪ अनेक माध्यमांद्वारे गोळा करणे = to garner
The CBI is garnering evidence in Sushant Singh Rajput's murder case. सुशांतसिंग राजपूतच्या हत्येसंदर्भात CBI पुरावे गोळा करीत आहे.

▪ कंड्या, गावगप्पा = humbug
I don't think UFO stories are just humbugs. मला नाही वाटत की उडत्या तबकड्यांच्या कथा म्हणजे केवळ बाता आहेत.
- Syn: gossip

▪ वैताग आणणारा = irksome
Watching the same advertisements over and over again is an irksome job. त्याच त्या जाहिराती पाहत बसायच्या म्हणजे एक कंटाळवाणा प्रकार आहे.
- Syn: tedious

▪ बळीचा बकरा = scapegoat
It was Kunal who gobbled up the honey and I became a scapegoat. मधाचा फडशा पडला, आणि बळीचा बकरा बनलो मी.

▪ पालथे पडून सरपटत चालणे = to grovel
The soldiers had to gravel two kilometers before they disappeared from the enemy's sight. दोन किलोमीटर सरपटत गेल्यानंतर सैनिक शत्रूच्या दृष्टिपथातून दूर गेले.

" Kids remember YOU more than what you teach."

– Jim Henson

▪ कलटी मारणे = to fink out
The boys finked out at the last moment when they learnt that samosas were finished. सामोसे संपलेत हे कळल्यावर मुलांनी शेवटच्या क्षणी कलटी मारली.

▪ उचकटून काढणे = to pry open
We had to pry open the fastened lid with a screwdriver. पक्के बसलेले झाकण आम्हाला स्क्रू-ड्रायव्हरने उचकटून काढावे लागले.

▪ दुसऱ्याबद्दल खोदून खोदून चौकशा करणे = to pry into
You have no business prying into my property. माझ्या मालमत्तेबाबत इतक्या सखोल चौकशा करायचं तुझं काम नाही.
- Syn: to poke nose into

▪ मंत्रमुग्ध करणे = to bewitch
What to say about us, even our TV was bewitched when Yuvrajsingh hit six sixers. आमचं सोडा, युवराजसिंगचे सहा षट्कार बघून आमचा TV पण मंत्रमुग्ध होऊन गेला.
- Syn: to beguile, to enchant

<<< मागील भागपुढील भाग >>>