शब्दांशी एकदा का मैत्री झाली की ते आयुष्यभर साथ देतात! केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 5.
Marathi words meaning into English
▪ स्वतःला सावरणे = to pick oneself up
Lord Rama couldn't pick himself up after hearing the news of Dashratha's death. दशरथाच्या मृत्यूची बातमी ऐकून प्रभू रामचंद्र स्वतःला सावरू शकले नाहीत.
▪ गाढवाचे ओरडणे = hee-haw
The jacks are bellowing hee-haw, hee-haw. Are they laughing or crying? ती गाढवं ही-हॉ, ही-हॉ करून आक्रोश करीत आहेत. हसत आहेत की रडत आहेत ती?

▪ स्वमतांध, दुराग्रही = dogmatic
We Indians are religious but not dogmatic. आम्ही भारतीय धार्मिक आहोत पण स्वमतांध नाहीत.

▪ त्याच त्या विषयाबद्दल बोलत राहणे = to harp on
Our teacher keeps harping on about his childhood, leaving the teaching aside. आमचे शिक्षक शिकवण्याचे सोडून स्वतःच्या बालपणाबद्दलच बोलत बसतात.

▪ कसलीच शक्यता नाही अशी स्थिती = no earthly chance
There seems no earthy chance of rescuing the deer trapped in the mesh of vines. वेलींच्या जाळ्यात फसलेल्या हरणाची सुटायची सुतराम शक्यता नाही.

" Happiness is when what you think, what you say, and what you do are in harmony."

– Mahatma Gandhi

▪ मजाच मजा नुसती = beer and skittles
All children think that life will be beer and skittles once they grow up. सर्व लहान मुलांना असे वाटत असते की एकदाचे आपण मोठे झालो म्हणजे जीवनात नुसती मजाच मजा.

▪ हायसे वाटणे = to ease up
Fans started and all the passengers eased up. पंखे सुरु झाले आणि सर्व प्रवाशांना एकदाचे हायसे वाटले.

▪ अडचण दूर होणे = to ease off
The villagers eased up once the floods eased off. पूर ओसरला आणि खेडुतांनी सुटकेचा श्वास घेतला.

▪ जोर लावून ढकलणे = to shove
Gardner was shoved to the ground by two people before firing two shots. दोन इसमांनी बंदुकीतून दोन गोळ्या झाडण्यापूर्वी माळ्याला जमिनीवर ढकलून दिले.

▪ एखाद्याला सारखे चिडवणे = to pick on someone
Everyone was picking on the monkey who was silently sitting in the corner of his cage in the zoo. प्राणिसंग्रहालयातील आपल्या पिंजऱ्यात शांतपणे बसलेल्या माकडाला प्रत्यकजण चिडवीत होता.

<<< मागील भागपुढील भाग >>>