हरवलेली वस्तू सापडणं आणि हवा असलेला शब्द सुचणं, ह्याचा आनंद सारखाच. केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द
ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 4 .
words from marathi to English

▪ गंडवणे = to bamboozle
He took away my bangles under the pretext of gold plating and bamboozled me. सोन्याचा मुलामा देण्याचा बहाणा करून त्याने माझ्या बांगड्या पळवल्या आणि मला गंडवलं. 


▪ अभिशाप = bane
Uncertainty is the bane of human existence. अनिश्चितता हा मानवी आयुष्याला लाभलेला अभिशाप होय.

▪ आवाजाशी संबंधित = sonic
Asus uses sonicmaster technology in their audio equipment. Asus कंपनी त्यांच्या श्राव्य उपकरणांमध्ये sonicmaster हे तंत्रज्ञान वापरतात.

▪ टाळणे, दूर राहणे = to ezchew
According to a recent study, diabetics need not eschew mangoes. एका नवीन पाहणीनुसार, मधुमेही रुग्णांनी आंबे वर्ज्य करायची गरज नाही.

▪ कच खाणे = to flinch
Don't flinch in the face of criticism. टीका होत असता कच खाऊ नकोस.

▪ न खचणारा, निग्रही = unflinching
The history of India has been embellished by the unflinching courageous acts of freedom fighters and blemished by the dishonest acts of traitors, both. भारताचा इतिहास हा शूर स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या दुर्दम्य शौर्यकथांनी अलंकृत झालेला आहे आणि देशद्रोह्यांच्या दगाबाज कृतींनी कलंकितपण.

" Someone I loved once gave me a box full of darkness. It took me years to understand that this too, was a gift."
- Mary Oliver

▪ पुरुषांचे आधिपत्य असलेला = patriarchal
Patriarchal society dominates in Muslim countries. मुस्लिम देशांमध्ये पुरुषप्रधान समाजाचे वर्चस्व आहे.

▪ कठडा = banister
Sumit reclined on the banister as he started feeling dizzy. भोवळ येऊ लागल्याने सुमित कठड्याला रेलून उभा राहिला.

▪ खराब छाप पडणे = to cut a poor figure
Preeti couldn't answer a single question and she cut a poor figure at the interview. प्रीतीला एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही आणि त्यामुळे तिची मुलाखतीच्या वेळी खूपच खराब छाप पडली.

▪ कायदेपंडित = jurist
A generation gap is the cause of conflict between these two jurists. दोन पिढ्यांमधील दरी हे ह्या दोन कायदेपंडितांमधील मतभेदाचे कारण होय.


<<< मागील भागपुढील भाग >>>