Boriska, the indigo star kid

   प्रतिभेचं देणं घेऊन जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये star-seed नावाची एक श्रेणी असते. त्यांच्या गतजन्मांमधल्या स्मृतीदेखील विद्यमान असतात. आता आपण उदाहरणादाखल १९९६ मध्ये सोविएत रशियात जन्मलेल्या आणि जगभरातील शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय झालेल्या, star-seed व indigo ह्यांचे मिश्रण असलेल्या, बोरिस्का ह्या रशियन मुलाची गोष्ट बघूया. स्वभावाने लाजाळू, भिडस्त आपल्याच विश्वात रमणारा बोरिस्का वयाच्या सातव्या महिन्यापासून वाक्ये बोलायला लागला, वयाच्या दोन वर्षांपासून न शिकलेल्या विषयांबद्दल मती गुंग करणारी विधाने करू लागला, चित्रे रंगवू लागला. त्याच्या आवडीचे विषय होते - ग्रह, तारे, आकाशगंगा, अंतरिक्षयान इ. शाळेत तो शिक्षकांच्या सारख्या चुका काढू लागला तेव्हा त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले! पण, मॉस्कोमधील प्रतिभाशाली मुलांच्या शाळेमध्ये त्याला प्रवेश देण्यात आला.

   पुस्तकातले एखादे चित्र किंवा टीव्हीवरचे एखादे दृश्य बघून त्याच्या गतजन्मांमधल्या स्मृती अचानक जागृत होऊ लागल्या आणि त्याने स्वतः अनुभवलेलं विश्व बारीकसारीक वर्णनासह तो अशा रीतीने सांगू लागला की अगदी काल-परवाच तो हे सगळं बघून आलेला आहे. आपल्यासाठी हे सगळं जेवढं अशक्य कोटीतलं आहे, त्याच्यासाठी ते तेवढंच सहज आणि स्वाभाविक आहे. (तरुणपणात तो फार अंतर्मुख झालाय आणि हल्ली तो सर्वांसमोर ह्या विषयाबद्दल बोलायचे टाळतो.) ऐकणारे श्वास रोखून हे सगळं ऐकत राहतात आणि हे अजब रसायन का, कसे, कुठून, कशासाठी इथे आलंय ह्या प्रश्नांचा गुंता सोडवता सोडवता अधिकच चक्रावून जातात!

  अनेक मानसशास्त्रज्ञांनी त्याच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. बऱ्याचदा तो स्वतःहूनही बोललेला आहे. त्याचे काही videos Youtube वर उपलब्ध आहेत, उदा https://www.youtube.com/watch?v=y7Xcn436tyI . 

  त्याने केलेल्या विधानांमधील काही अजब आणि अतर्क्य विधाने अशी:
⮞ 'स्टार वॉर्स' सारखे सिनिमे म्हणजे सगळा पोरखेळ आणि वेडेपणा आहे! आम्ही ज्या लढाया प्रत्यक्ष बघितल्या व अंतरिक्ष प्रवास केले, ते फार वेगळ्या पातळीवरचे आहेत....

⮞ मंगळावरील लोक शांतताप्रेमी पण युद्धात फार निपुण आहेत. तिथे लोक म्हातारे होत नाहीत कारण त्यांचे वय ३०-३५ नंतर वाढतच नाही. माझ्यासारखी मंगळावरून आलेली किमान वीस मुले तरी सध्या मॉस्कोमध्ये आहेत.....!

⮞ लक्षावधी वर्षांपूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावरील वातावरण जीवसृष्टीसाठी अनुकूल होते तेव्हा आम्ही मंगळाच्या पृष्ठभागावर राहत असू. मंगळावर जी भयानक आण्विक युद्धे झालीत तेव्हापासून तेथील वातावरण प्रतिकूल झाले आणि लोकांना जमिनीखाली शहरे वसवून राहणे भाग पडले...
⮞ मंगळावर जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होई तेव्हा पृथ्वीवरून आम्ही पाणी घेऊन जात असू.... 

⮞ पृथ्वीवरून मंगळाकडे येणारे उपग्रह व अंतरिक्षयान मंगळाजवळ येताच निकामी होतात कारण मंगळावरून सोडले जाणारे प्रखर किरण त्यांना निकामी करून टाकतात. उपग्रहाकडून निघणारी कंपने मंगळावरील वातावरण दूषित गढूळ टाकतात, त्यामुळे तसे करणे भाग पडते. (ह्या उपग्रहांना यशस्वीपणे मंगळावर उतरवायचे असेल तर त्यांत काय काय तांत्रिक बदल करणे आवश्यक आहेत हे देखील बोरिस्का सुचवतो.)

⮞ आमची अंतरिक्षयाने त्रिकोणी असून ती सूर्यमालेत सर्वत्र संचार करतात. अंतरिक्षयानाची रचना पुढीलप्रमाणे असते: १ ला थर ...., २ रा थर ...., ३ रा थर ...., ४ था....., ५ वा ......

⮞ अंतरिक्षातील अनेक संशोधन मोहिमांमध्ये मी भाग घेतलाय. मी अंतरिक्षयानाचा मुख्य पायलट होतो. शनीभोवती असणाऱ्या अशनींच्या वेढ्यातून जाणे हा मी माझ्या अंतरिक्ष प्रवासात अनुभवलेला सर्वात खडतर टप्पा असायचा.

⮞ लक्षावधी वर्षांपूर्वी पृथीवर लेमुरीअन संस्कृती नांदत होती. त्यावेळचे लोक ९ मीटर (की ९ फूट?) उंच होते. मी जेव्हा जेव्हा पृथीवर येई तेव्हा तेव्हा माझ्या लेमुरीअन मित्राला जरूर भेटत असे. काळाच्या ओघात, विनाशकारी नैसर्गिक उलथापालथी झाल्या. पर्वत दुभंगले, भूखंड पाण्याखाली गेले. माझ्या डोळ्यादेखत त्याचा मृत्यू झाला , मी त्याला वाचवू शकलो नाही.... (भावनाविवश होतो). पण, ह्या जन्मात आम्ही पुन्हा भेटणार आहोत....

⮞ ग्रे लोकांपासून सावध राहा. ज्या हेतूने ते पृथ्वीवर येतात ते हेतू अत्यंत वाईट आहेत....

⮞ 'प्राॅसरपाईन' या ग्रहाचा प्रलयंकारी अंत आम्ही मंगळावरून प्रत्यक्ष बघितला....

⮞ ही पृथ्वी म्हणजे केवळ एक निर्जीव ग्रह नसून ती सजीव आहे. आपल्याकडे आश्रयासाठी येणाऱ्या जीवाची पूर्ण काळजी घ्यायची तिची प्रवृत्ती आणि क्षमता आहे...

⮞ "तुझे व तुझ्यासारख्या बालकांचे पृथ्वीवर येण्याचे प्रयोजन काय?," ह्या प्रश्नदाखल तो उतरतो,"पृथ्वीवरील पापं आणि त्यामुळे होणाऱ्या आपत्त्या ह्यांचं प्रमाण झपाट्याने वाढतंय, त्यामुळे पृथ्वीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालाय. हे सगळं आम्हाला लोकांना जीवाचा आटापिटा करून समजावून सांगायचंय. पापकर्म करणारे आपल्या कर्मांनी काळाच्या ओघात इथून अलग केले जातील.... विश्वाचे हे संविधानच आहे आणि त्या दिशेने पृथ्वीची वाटचाल चालू झालेली आहे.... " आणि सरतेशेवटी तो म्हणतो,"Kellis !"
त्याच्या म्हणण्यानुसार मंगळावर 'goodbye' ला 'kellis' असे म्हणतात!

    ◾ Indigo मुलांचे संगोपन कसे करावे लागते?

   Indigo मुलांच्या विकासासाठी अनुकूल व पोषक वातावरण उपलब्ध करून देणं, एवढंच पालकांचं मुख्य काम. त्यांच्या अंगी परिपक्वता आणि आवश्यक तो गुणांचा साठा अगदी उपजतच तयार आहे, त्याच्या विकासाला योग्य दिशा मिळाली म्हणजे ह्या बालऋषीचं अव्यक्त रूप कलेकलेनं समाजापुढे येऊ लागेल. धाक दाखवून, शिक्षा करून, आपल्या अपेक्षा त्याच्यावर लादून हे प्रकरण जागेवर येईल अशी अपेक्षा पालक-शिक्षकांनी Indigo मुलांच्या बाबतीत तरी करू नये.

  आणखी २-३ महत्त्वाच्या गोष्टी.

   जेव्हा जेव्हा ह्या मुलांना समुपदेशकांकडे किंवा मानसरोगतज्ज्ञांकडे नेण्यात येते, तेव्हा तेव्हा त्यांच्या 'आजारात निदान हे डॉक्टर्स ADH किंवा ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder - अतिचंचलता आणि एकाग्रतेचा अभाव) असं केलं जातं. एवढंच नाही, ह्या मुलांना Ritalin, Metadate, Prozac सारखी मानसिक रोगांची औषधे सर्रास चालू केली जातात. अर्थातच, या औषधांचा उपयोग तर काही होत नाहीच पण त्याचे side effects होतात, ते वेगळंच.

   ह्या मुलांच्या ग्रंथी व इंद्रिये अति-संवेदनशील असतात. तेव्हा या मुलांना GMO अन्न (Genetically Modified Food), processed अन्न, preservatives -chemical मिश्रित अन्न शक्यतो देऊ नये. त्यांना जास्तीत जास्त सेंद्रिय अन्न (Organic food) द्यावे. अर्थात्, प्रत्येकानीच ते खाणं खूप चांगलं.

   त्यांच्या प्रत्येक म्हणण्यात काहीतरी तत्त्वज्ञान दडलेले आहे, ही गाठ मनाशी असू द्यावी. त्यांचे बोलणे ऐकताना आपण रस दाखवावा आणि त्यांच्या आवडीच्या विषयाची पुस्तके त्यांना उपलब्ध करून द्यावीत.

   Indigo मुलांना उमलण्याची योग्य संधी दिली तर एक प्रतिभासंपन्न व्यक्ती बनून शेकडो दिशाहीनांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी एक देवदूत म्हणून ही मुले उभे राहतील, हे निःसंशय.

  काही दिवसांपूर्वी Whats app वर एक video आला होता. ही मुलगी कोण आहे ते माहित नाही पण तिचे एकंदरीत बोलणे, तिची आकलनक्षमता इ. गोष्टी बघता तिच्यात असामान्य अंगभूत गुण आहेत ह्याची जाणीव होते. तिला खूप व्यक्त व्हायचंय पण ती ते करू शकत नाहीये. रागावून, धाक दाखवून तिला चूप बसवणं हा झाला सामान्य उपाय. आणि तिच्या मानसिक प्रवाहाला योग्य दिशेनी वळवणं हा झाला योग्य उपाय. हा प्रवाह आपल्याला वळवायचा आहे, वाळवायचा नाही! कधी प्रोत्साहन देऊन, कधी बक्षिस देऊन, प्रसंगी प्रलोभन दाखवून, विविध पर्याय समोर ठेऊन, कधी समजावून, तर कधी दुसऱ्या व्यक्तीचे जिवंत उदाहरण दाखवून. ही मुलगी Indigo वर्गातलीच वाटते आहे. (IQ testing वा Kirlian photography नंतरच ते पक्कं समजेल)





  अग्निबाण योग्य दिशेनेच सोडावा लागतो, नाहीतर....! हा नियम सर्व Indigo ना लागू होतो.

   Indigo मुलांवरील अधिक माहितीसाठी पुस्तके (ही पुस्तके परदेशातून मागवावी लागतील):

- The Indigo Children: The New Kids Have Arrived by Lee Carroll

- The Children of Now by Blackburn Losey

- Enlightened Indigo Child: A Personal Guide to Flourishing with a Sixth Sense by

  Idelle Brand

- The Care and Feeding of Indigo Children by Doreen Virtue

- Beyond the Indigo Children: The New Children and the Coming of the Fifth World

  by P. M. H. Atwater