" It is true, we are the world's number one milk producer. It is also true, we are the world's number one FAKE milk producer."
–  Maneka Gandhi
   

   आपण भारतीय! नेहेमीच आपण म्हणतो - सत्यम शिवम् सुंदरम् ..... सत्य हे फार सुंदर असतं ! खरं आहे, पण असत्य जेव्हा सत्याचा पोशाख घालून येतं तेव्हा ते पण सत्याइतकच सुंदर दिसतं; पण प्रत्यक्षात असतं एक हानीकारक आणि हादरवून टाकणारं वास्तव. आपण रोज जे दूध पितो त्याबाबत हे किती खरं आहे ते तुम्हाला खालील लेख वाचून कळेलच.

kanha yashoda milk

   "पुण्यात विकल्या जाणाऱ्या अनेक दुधाचे samples आम्ही आमच्या प्रयोगशाळेत तपासले," National Chemical Laboratory, Pune येथे अनेक वर्षांपासून Senior Scientist म्हणून काम करणारे डॉ. सैनी आम्हाला सांगत होते,"ह्या दुधांमध्ये काय काय भेसळ केलेली आहे हे बघून आमच्या अंगावर काटा आला आणि दूध पिण्याची इच्छाच गेली ....." (ते स्वतः रोज दिवसाकाठी १२ ते १५ कप चहा पितात!). हे झालं जिल्हा स्तरावरचं परीक्षण.

   राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी हे परीक्षण केले जाते. Food Safety and Standard Authority of India (FSSAI) ह्या संस्थेने संपूर्ण देशातून गोळा केलेल्या १७९१ नमुन्यांचे परीक्षण केले तेव्हा ६८.४% नमुने भेसळयुक्त असल्याचे सिद्ध झाले. बिहारमधील जवळजवळ सर्वच नमुने १००% भेसळयुक्त असल्याचे निष्पन्न झाले!

   आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्र फार वेगळे आहे. बहुतेक देश पर्यावरणाबाबत अत्यंत जागरूक आहेत आणि दुधासारख्या मूलभूत गोष्टींचा दर्जा उत्तम राहावा व त्यामुळे आरोग्याला कुठलाही धोका पोहोचू नये यासाठी त्या देशांमध्ये कडक कायदे आहेत.

   आपल्याकडे स्थिती फार वेगळी आहे. एकट्या दिल्लीसारख्या शहराचीच दुधाची रोजची गरज ७० लाख लिटर आहे. परदेशात दर १ ते ३ माणसांमागे एक गाय हे प्रमाण आहे,ते आपल्याकडे नाही आणि आहाराबद्दलची जागरूकता तर मुळीच नाही. दुखणे होऊ नये ह्यासाठी काळजी घेणाऱ्यांची संख्या आपल्याकडे खूप कमी आहे आणि ते असह्य झाल्यावर डॉक्टरांकडे धावणाऱ्यांची संख्या आपल्याकडे प्रचंड आहे. बाळापासून आजोबांपर्यंत सर्वांनाच दूध रोज लागते; त्यामुळे दुधाबाबत जागरूकता प्रत्येक कुटुंबात असलीच पाहिजे.

   पूर्वी गवळी दारोदारी जाऊन दूध टाकायचा. काही वर्षांनी त्या दुधाचे दोन प्रकार भाग झाले. पाणी न टाकलेले आणि थोडे स्वस्त - पाणी टाकलेले! इथपर्यंत ठीक होते. त्यानंतर दूध कंपन्या गवळ्यांकडून दूध विकत घेऊन, त्यातली मलई काढून, ते दूध बाटल्या-पिशव्यांमध्ये बंद करून आपल्याला विकू लागल्या. इथपर्यंतसुद्धा ठीक होतं. दुधाचा दर्जा थोडा खालावला असला तरी ते आरोग्याला हानिकारक मुळीच नव्हतं. कालांतराने दुधाची आणि दुग्धजन्य पदार्थांची (दही, लस्सी ,खवा, मिठाया, श्रीखंड, लोणी,चीज, पनीर, तूप, आईस्क्रिम इ.) मागणी दिवसेंदिवस वाढत गेली आणि 'दुधासारख्या' दिसणाऱ्या द्रव पदार्थांचा शोध सुरु झाला, कृत्रिम चवी, रंग आणि रसायने त्यात मिसळली गेली..... चीनसारख्या देशातून अतिशय स्वस्तात पांढऱ्या पावडरी आल्या.... परिणामी, दुधाचा दर्जा झपाट्याने खाली घसरला, पूर्वी अपवादाने आढळणाऱ्या काही आजारांचे प्रमाण प्रचंड वाढले. ह्याची हद्द तेव्हा झाली जेव्हा रेल्वेमधील काही चहावाल्यांनी शाम्पू, युरिया आणि पाणी वापरून (मूळ दुधाचा एकही थेंब न वापरता) 'दूध' व त्याचा चहा बनवून त्याचा video what's app वर टाकून खळबळ उडवून दिली आणि हे नवीन 'तंत्रज्ञान' सर्व दूध उत्पादकांसाठी खुले करून टाकले!

   ◾ देशी गाय वि. जर्सी गाय 

   काही वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये मुलांमधील होणाऱ्या मधुमेहाचे प्रमाण अचानक वाढले. तेथील शास्त्रज्ञांनी ह्याचा कसून मागोवा घेतला तेव्हा त्यांना असे आढळले की जर्सी (संकरित) गायीच्या दुधात आढळणाऱ्या beta casein-A1 ह्या प्रोटीनचा हा सगळा खेळ आहे. ते दूध थांबवून त्यांनी मुलांना असंकरित गायीचे दूध चालू केले तेव्हा मधुमेही मुले काहीही औषध न घेता बरी झाली. हा video मध्यन्तरी what's app वर बराच फिरला होता.

   ब्राझीलच्या शास्त्रज्ञांना जेव्हा आढळले की भारतीय वंशाच्या देशी गायींमध्ये beta casein-A1 ह्या हानिकारक प्रोटीनऐवजी स्वास्थ्यवर्धक beta casein-A2 हे प्रोटीन असते तेव्हा त्यांनी काही भारतीय वंशाच्या गायी आयात केल्या आणि त्यांचे संवर्धन करून त्यांची संख्या वाढवायचा सपाटाच लावला! आज ब्राझिलकडे 65 लाख भारतीय देशी गायी आहेत. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडसारखे देश ब्राझिलकडून मोठ्या प्रमाणात ह्या देशी गायींच्या दुधाची पावडर आयात करतात आणि आपल्याला हेच देश जर्सी गायीच्या दुधाची पावडर विकतात आणि आपण ती 'परदेशी ब्रॅण्ड'ची पावडर म्हणून आनंदाने घेतोदेखील. किती मोठे अज्ञान आणि किती मोठा विरोधाभास हा!

   संकरित गायीला हॉर्मोन्स टोचून टोचून जे दूध बनवले गेले ते पिऊन आपणा मनुष्य प्राण्यांच्या शरीरातील हॉर्मोन्सचा समतोलसुद्धा पार बिघडून गेला आणि सुरु झाले मग आयुष्यभर या संपणारे आजार.... कॅल्शिअम व व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता, हाडांचा-दातांचा ठिसूळपणा, गुडघ्यांचा osteoarthritis, स्तनांच्या कर्करोगाचे वाढलेले प्रमाण, तरुणींमधील गर्भाशयाचे विकार, थायरॉईडचा बिघडलेला समतोल, वर उल्लेखल्याप्रमाणे लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये diabetesचे वाढते प्रमाण ..... ह् सर्व या गोष्टी पूर्वी फारच कमी होत्या.

   ◾ गोमातेची आजची स्थिती

   आपल्या देशात देशी गायींची संख्या फारच कमी आहे. दूध उत्पादकांकडे आहेत त्या मुख्यतः संकरित जर्सी गायी (त्यांच्या दृष्टीने दूध बनवणारी चालती-बोलती यंत्रे). त्या गायींची आजची स्थिती म्हणजे माणसाच्या लोभ, स्वार्थीपणा आणि अमानुषतेचे ज्वलंत उदाहरण आहे. सर्वप्रथम, गायीला कृत्रिम गर्भाधानाद्वारे दरवर्षी गर्भवती केले जाते. ह्या प्रकारामुळे गायीचे आयुष्य १० ते १२ वर्षे घटले आहे. गाय व्यायल्यानंतर जन्मलेले वासरू जर नर असेल तर त्याची रवानगी कातडे कमावणाऱ्या लोकांकडे होते. पुढे त्याचे काय हाल होतात ते इथे न लिहिलेच बरे.एकाच चवीचे अन्न गायीला रोज दिले जाते. गाय व्यायल्यानंतर जन्मलेले वासरू जर मादी असेल तर त्याला गायीजवळ अशा रीतीने ठेवण्यात येते की त्याने सारखे सारखे गायीजवळ जाऊन तिचे दूध पिऊ नये. त्याशिवाय दूध विक्रीसाठी कसे मिळणार? वासरू जवळ तर दिसते आहे पण पाजू शकत नाही, अशा तीव्र दुःखाच्या मनस्थितीत त्या गायीच्या दुधात कोणती स्पंदने उतरत असतील आणि ते दूध पिणाऱ्याच्या शरीरावर त्याचे काय परिणाम होत असतील? खरं म्हणजे, वासराने पोट भरून पिऊन झाल्यावरसुद्धा पुष्कळ दूध शिल्लक राहील अशी योजना निसर्गाने आधीच करून ठेवलेली असते. त्यानंतर, हॉर्मोन्सची इंजेक्शन्स टोचून त्या गायीच्या दुधाचे प्रमाण जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि अशा तऱ्हेने, सगळ्यांच्याच आयुष्याची वाट लावली जाते.

🟉दुधात भेसळ केले जाणारे पदार्थ


• युरिया : प्रोटीन व प्राणीजन्य चरबी एकजीव करण्यासाठी
• प्राणीजन्य, वनस्पतीजन्य चरबी : घट्टपणा आणण्यासाठी
• कॉस्टिक सोडा : दुधाचे खाली गेलेले pH वर आणण्यासाठी व त्याचे दही होऊ नये म्हणून
• रंग : शुभ्रपणा आणण्यास
• डिटर्जंट : फेसाळपणा आणण्यास
• पोटॅशिअम हायड्रॉक्साइड, कॅल्शिअम कार्बोनेट: क्षारांची

  कमतरता भरून काढण्यासाठी
• फॉरमॅलीन : दुधाचे आयुष्य वाढवण्यासाठी, preservative 

  म्हणून (हे प्रेतागरात वापरतात)
• हायड्रोजन पेरॉक्साइड : दुधातील जंतू मारून दुधाचे आयुष्य

  वाढवण्यासाठी
• स्टार्च व मिल्क पावडर




➤आपल्या देशात दुधाची गुणवत्ता कोणत्या राज्यात कशी आहे ते खालील नकाशावरून लक्षात येईल:

देशातील विविध राज्यांतील दुधाची गुणवत्ता

◾    'पाश्चरायझेशन'बद्दल थोडेसे

 

   डेअरीमधील दूध तीन प्रकारच्या प्रक्रियांमधून जाते: Standardization, Homogenization, Pasteurization. ह्यांपैकी, Standardization व Homogenization ह्या प्रक्रियांमुळे दुधातील विविध घटकांचे प्रमाण निश्चित होते व दुधाला एकसंधपणा येतो पण दुधाच्या गुणवत्तेला त्यामुळे काही हानी पोचत नाही. आता Pasteurizationचे पुन्हा तीन प्रकार आहेत : Low heat, medium heat व ultra heat. जसे जसे आपण Pasteurizationचे तापमान वाढवत नेऊ, तसे तसे दुधाचे आयुष्य (shelf life) वाढत जाते पण त्याची गुणवत्ता कमी कमी होत जाते. आजकाल ultra heat pasteurization केलेले दुधाचे टेट्रा पॅक बाजारात मिळतात, त्यातील दूध कित्येक आठवडे टिकते. पण हे टेट्रा पॅकचे दूध म्हणजे काही संशोधकांच्या मते म्हणजे केवळ पांढरे पाणी. त्याने शरीराला काही विशेष पोषक तत्त्वे तर मिळत नाहीत पण त्याने काही हानीपण होत नाही. कमीत कमीत उष्णता देऊन Pasteurization केलेले दूध हे सर्वोत्तम दूध होय, पण ते २४ तासांच्या आत संपवणे आवश्यक असते. (फ्रीझमधे ठेवले तर दोन दिवस).

   आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध हे प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक केले तर त्याची प्लास्टिकशी रासायनिक क्रिया होऊन आरोग्याला घातकअशी संयुगे त्यात तयार होतात. म्हणून दूध नेहेमी काचेच्या बाटलीत अथवा स्टीलच्या भांड्यातच ठेवावे.

   ◾ कोणत्या प्रकारचे दूध उत्कृष्ट मानावे?


१. जे देशी गायींपासून मिळालेले आहे
२. ज्या गायी उन्हात मोकळ्या कुरणांवर चरतात
३. ज्यांची वासरे दूध पिऊन तृप्त झालेली आहेत
४. जे दूध प्लॅस्टिकच्या पिशवीत बंद केलेले नाही
५. जे कमीत कमीत उष्णता देऊन Pasteurize केलेले आहे
६. आणि अर्थातच, ज्यात कसलीही भेसळ केली गेलेली नाही 

    ◾ आशेचे किरण

   जयवंत पाटील हा तरुण पिढीतील युवक सेंद्रिय शेतीबरोबरच देशी गायीचं दूध देखील विकतो. त्याची कहाणी फार प्रेरणादायी आहे. २००६ साली तो एका नामांकित IT कंपनीत software engineer म्हणून रुजू झाला. परंतु, जीवनात जाणवणारा पोकळपणा आणि काहीतरी सकारात्मक करून बघण्याची उर्मी ह्या मनस्थितीत असताना तो डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग ह्यांच्या 'निर्माण' ह्या उपक्रमाच्या संपर्कात आला. दोन वर्षे तेथील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याला आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला. खेड-शिवापूर ह्या भागात त्याने व त्याच्या दोन मित्रांनी सेंद्रिय शेती करण्याचे ठरवले. थोडी जमीन विकत घेतली. लोकांनी व आसपासच्या शेतकऱ्यांनी वेड्यात काढले. कारण, अनेक वर्षे रासायनिक खाते वापरल्याने ती जमीन टणक होऊन गेली होती. सुरवातीची दोन वर्षे तर नुकसानच झाले. पण सेंद्रिय पद्धतीने मशागत करता करता जसा जसा जमिनीचा कास सुधारू लागला, तसं तसं सोन्याचं पीक येऊ लागलं आणि उत्तम बाजारभाव मिळू लागला. आता, पूर्वी ज्यांनी वेड्यात काढलं होतं ते येऊन उत्सुतेपायी चौकशी करू लागले. हळू हळू त्याचे लोण आसपासच्या शेतकऱ्यांमध्येपण पसरले. सोबतच, देशी गायींची पैदास व दुग्धव्यवसायपण सुरु झाला. शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली. Humpy A2 ह्या mobile app द्वारे लोकांना दुधाची मागणी मोबाईलवरच करता येऊ लागली, परिणामी उत्कृष्ट प्रतीचे बाटलीबंद दूध त्यांना घरपोच मिळू लागले! ह्यांचा दुग्ध व्यवसाय सध्या पुणे-मुंबईपुरताच चालू आहे पण श्री.जयवंत पाटील ह्यांचे असे म्हणणे आहे की अधिकाधिक युवकांनी ह्या व्यवसायात पडावे कारण सुरवातीला दोन वर्षे जरा मेहनत घ्यायची तयारी असेल तर ह्या व्यवसायात करिअर करण्यास खूपच वाव आहे कारण सेंद्रिय मालाला प्रचंड मागणी असून ह्या व्यवसायचा आलेख कायम चढताच राहील अशी स्थिती आहे.

   कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात काही mobile vans तयार केल्या आहेत ज्या तुमच्या घरापर्यंत येऊन दुधाचे परीक्षण मोफत करून देतात. महाराष्ट्र सरकारदेखील असा उपक्रम लवकरच हाती घेईल अशी आशा करू. तुम्ही पीत असलेल्या दुधात काय काय भेसळ आहे हे तुम्ही तुमच्या नगर/महानगरपालिकेशी संपर्क करून, ते सुचवतील तेथे तुम्ही घेत असलेल्या दुधाचा नमुना तपासून जाणून घेऊ शकता. येथे दिलेल्या टिप्स वापरून घरीदेखील बघू शकता.




  सत्यम्, शिवम् और सुंदरम् की परिभाषा युगों युगों से जिसने दुनिया को सिखायी, क्या ऐसे सनातन धर्म के आप भी चहिते हैं ? क्या हमारे देश की संस्कृति, परंपरा, सभ्यता एवं हमारी आधुनिक वैज्ञानिक उन्नति का आपको अभिमान है ? तो जुड जाए इस Telegram ग्रुप से जिसका नाम है - हम हिंदुस्तानी. CLICK TO JOIN


Snow

0 comments:

Post a Comment

Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊