"काही काही शोध अचानक लागतात. जसं, एक दिवस अचानक मला समजलं की रीनने अंग आणि लाइफबॉयने कपडे खूप स्वच्छ निघतात म्हणून."
😌- :)
पु ल देशपांडे उवाच :
चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता ...
अवती भोवती पाहता पाहता हळूच चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते..
अरेच्या !
साखरच घालायला विसरलो कि काय....
पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती, कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर....
आयुष्य असच असतं...
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात,
त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे....
एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे....
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे....
मान-अपमान मैत्रीत काहीच नसतं....
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहीजे.
जगाच्या या रंगमंचावर असे वावरा, की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.
जगातील सर्वात महाग पाणी कोणते, तर अश्रू ... कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९ टक्के भावना असतात.
व. पु. काळे उवाच :
• प्रकाशाच्या स्फुल्लिंगाचा पहिला स्पर्श जेव्हा वातीला होतो तेव्हा ती वात दिवा म्हणून ओळखली जाते.
• वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कुणाशीतरी बोलतो तेव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन चालू होतं.
• आयुष्यातील काही दिवस अगदी स्वतःसाठीच जगावं.
• काही व्यक्तींचे आपल्या आयुष्यातील स्थान हारातील दोऱ्याप्रमाणे असते. दिसणे महत्त्वाचे नाही तर असणे महत्त्वाचे असते.
• स्वप्नातही जो जागा राहतो तो माणूस.
• एक क्षण भाळण्याचा, बाकी सारे सांभाळण्याचे.
• वाहतो तो झरा, थांबते ते डबकं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
• ज्याला वेडं होता येत नाही तो शहाणा माणूस नव्हेच!
• पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलूट करावी ती सुगंधाचीच.
• आई-वडिलांच्या सान्निध्यात वाढणारी मुलगी म्हणजे झाडावरचं फुल, खऱ्याखुऱ्या जीवनरसावर वाढणारी ती कळी. सासर फ्लॉवरपॉटसारखा असतो. तिथे मुलगी सजवली जाते, रुजवली जात नाही.
• कधी कोणाच्या वाईट काळावर हसण्याची हिम्मत करू नका. कारण हा काळ आहे, चेहरे बरोबर लक्षात ठेवतो.
• मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येतं, स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन.
• जीवन ही न मागता लाभलेली पर्वणी आहे. संसाराचा भर घ्यावा तो पालखीसारखा. पालखीमधल्या आराध्यदैवतांचं नाव असावं 'समर्पण'.
• सांत्वनासाठी आजवर जगात कुणालाही शब्द सापडले नसतील. सांत्वन म्हणजे दुःखाच मूल. मूल आईपेक्षा मोठं कसं होईल? मूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते. म्हणून, समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात.
• समुद्राचं खारं पाणी कितीही अफाट असलं, तरी डोळ्यातलं इवलंसं खारं पाणी त्याहून जास्त वाहून नेतं....आपल्यालाही आणि समोरच्यालाही....
• WHO IS WRONG ऐवजी WHAT IS WRONG ह्याचाच शोध घ्यायचा दोघांनी ठरवलं तर संसार बहरलाच पाहिजे.
• काही काही दुःख केवळ ज्याची त्यालाच निभावून न्यावी लागतात.
• माणूस हा तसा नेहेमी एकटाच असतो. त्याला म्हणून हवी असते एक सोबत, जिला मनातली सगळी स्पंदने समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्त्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते. आयुष्यातली ही मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं, पण नाही. एकमेकांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, हे आणखी कुणाला तरी समजावं असं त्याला वाटतं. असं का? ह्याला उत्तर नाही-
• बऱ्याचदा विसरायचं म्हटलं कि सगळं आठवतं.
• बायको म्हणजे मंगळ आणि साहेब म्हणजे शनी. ह्यांनी एकमेकांची तोंडं कधी पाहिलेली नसतात पण ह्यांची कायम युती असते.
• आयुष्य केवळ ज्योतीलाच असतं असं नाही. झंझावातालाही असतं.
• वासनेशिवाय प्रेम .... ह्याचा अनुभव प्रत्येक माणसाला उभ्या आयुष्यात एकदातरी यावाच. ती एक अमोघ शक्ती आहे...
• 'पाऊस' एकाच वेळी अनेक ठिकाणी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं.
• काही माणसांजवळ हळुवार जागी वार झाला तरी त्यावर हास्याचा बुरखा चढवण्याचं सामर्थ्य असतं. अशा माणसांच्या जखमा शेवटपर्यंत समजत नाहीत.
• जो गेल्यानंतरच कळतो त्याला 'तोल' म्हणतात!
• कस्तुरीमृगाला कस्तुरी सापडत नाही तर माणसाला शब्द.
• संपत आलेल्या दुःखाच्या जाणिवेवर दवा नाही. अशा वेळी प्रतीक्षा असते ती एखाद्या चांगल्या व्यक्तीची.
• दुःख आयुष्य संपवत नाही. आयुष्याला नवा अर्थ देतं.
• स्वतःचं घर स्वतःच सांभाळायचं हे मला गोगलगायीने शिकवलं!
• शिंपलीतला मोती शिंपले उघडली तरच दिसतो, तसंच सौंदर्यानं निराकाराच्या अवगुंठनातच नांदावं...
• माणसाला जिवाभावाची सखी एकाच- तिचं नाव वेदना. सुख, समाधान, आनंद हे सगळे 'बर्डस ऑफ पॅसेज'. वेदना मरेपर्यंत सोबत करते तरी आपण तिचाच राग करतो.
• आपल्या स्वतःलाच आपला परिचय झालेला नसतो. पण आपला सगळं अट्टाहास मात्र दुसऱ्याला समजून घेण्यासाठी चालतो.
• ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.
• आवडीची वस्तू मिळाली नाही तर मिळालेल्या वस्तूची आवड निर्माण झाली पाहिजे.
• जो जाणकार आहे त्यालाच 'परखड' आणि 'फटकळ' ह्यातला फरक समजतो.
• जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही, यावर माझा विश्वास नाही. आयुष्यभर ठसठसत असलेली पण सांगता न येणारी असंख्य दुःख तो आपल्याबरोबर नेतो.
• संसारात अहंकारामुळे पती-पत्नीनं एकमेकांशी बोलणं सोडलं असेल, तरीही मनातून दुसरी व्यक्ती संवादाचा प्रारंभ करील का, ह्याची दोघंही वाट पाहत असतात.
• सुरक्षेची जेवढी मागणी वाढवत न्याल तेवढं असुरक्षित वाटत राहतं. मुळातच आयुष्य असुरक्षित असतं हे मान्य करावं. रक्षण कुणापासून करणार? कोण करणार? रक्षक ठेऊन कुणाचे प्राण वाचले आहेत? म्हणूनच अस्तित्वाच्या हातात सगळं द्यायचं आणि मस्तीत जगायचं.
• प्रेम महापुरासारखं असतं . तिथे किनारे हरवतात.
• काहीकाहींना खुद्द स्वतःच्याच मनाची मागणी कळत नाही.
• प्रेम हे अशी चमत्कारिक चीज आहे की, फसलं की गुन्हा आणि साधलं की वैताग!
• पोटी असेल ते ओठी आणायला धाडस लागतं.
• संवेदनाक्षम मन लाभणं हा एक शापही आहे आणि वरदानही. पण एक आहे, हळवे मन लाभलेला माणूस, माणूस म्हणून जन्माला येतो आणि मरतोही माणूस म्हणूनच. मन नावाची वस्तू जिथं जन्माला येत नाही, ती सगळी माणसाच्या आकाराची जनावरच.
• काही काही वेळेला रडणाऱ्या माणसापेक्षा सांत्वन करणाऱ्या माणसावरच जास्त ताण पडतो. ज्योतीपेक्षा समईच जास्त तापत नाही का?
• नावात काय ठेवलंय असं म्हणणारा शेक्सपिअरसुद्धा त्या वाक्याखाली आपलं नाव टाकतो म्हणजेच नावाला काहीतरी महत्त्व आहेच.
• एका ओघळणाऱ्या थेंबामागे न गाळलेले हजारो अश्रू असतात.
• रातराणीपासून थेट झेंडूपर्यंत निसर्गाने फुलांचे ताटवे बहाल केले. जमीन एकच, मातीही तीच. पण तिची रूपं, रंग, आकार, गंध ... खरंच, मातीएवढं धनाढ्य कुणीही नाही.
• पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्यूला आमंत्रण दिलंय. जीवनाची हीच गंमत आहे. आपण प्रतिक्षणी मरतोय आणि म्हणतो, 'जगतोय'.
• आयुष्य कधी कधी असं वागतं की तेव्हा नसलेलं देतंय की असलेलं घेतंय तेच कळत नाही.
• आठवणी खरंच चांदण्यासारख्या असतात. कोणती कधी लुकलुकेल सांगता येणार नाही.
• सर्वात जवळच्या व्यक्तीला सांगता न येण्यासारखं प्रत्येकाच्या आयुष्यात थोडंफार घडतंच.
• सावली देऊ शकणाऱ्या वटवृक्षानं, विश्रांतीला आलेल्या पांथस्थाला, बाकीची झाडं सोडून तुला नेमका मीच सापडलो का, असं विचारायचं नसतं.
• रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृन्दावनातच राहते. तिच्या पुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.
• छत्तीस गुण जुळूनही संसारात छत्तीसचा आकडा का?
• आपले घरटे कोणत्या झाडावर आहे हे फक्त पक्षीच ओळखतात. माणसांना मात्र घराचं नाव, रस्त्याचं नाव, पोस्टाची हद्द हे सगळंच लागतं.
• उत्तराची मागची बाजू म्हणजे समस्या. आपण फक्त बघण्याची दिशा बदलायची.
• अश्रू कितीही खरं बोलत असले तरी ते भूतकाळ बदलू शकत नाहीत.
• आपले जुने फोटो म्हणजे भूल देऊन गेलेलं आपलं वय, जे की आपल्याला पुन्हा भेटू इच्छित असतं!
• संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!!
• खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!
• शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!
• बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण..!!
• कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
• पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.
• आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!
• मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!
• वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
• आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
• समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
• संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.
• कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!
• ‘अंत’ आणि ‘एकांत’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
• घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्याची ऐपत नेहमीच कमी असते..!!
• जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..!!
• प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्यंत असतात..! पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो.
• सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
• खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
• कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .
• चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस!
• माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!
• आयुष्याच पुस्तक वाचायला निराळच इंद्रिय लागतं.ह्या पुस्तकाची भाषा ही लिपी नसलेली भाषा आहे. म्हणूनच ह्या पुस्तकाच वाचन करणाऱ्या माणसाला डिग्री नाही. आयुष्याच पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा? कधी? तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा.
• तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
• औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
• गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.
• केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोहचण्याची वेळ येतेच.स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो की, 'अरे, अमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं!'
• कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..!!
"मंगेशकर घराणं हे मंगेशाचाच अवतार आहे. तरीही आशा भोसले हा चमत्कार आहे.
तिच्या आवाजात वीज आहे. ती कोसळते,
पण ज्या झाडावर पडते ते जळून जाण्याऐवजी उजळून जातं.
वादळ आहे पण काहीही उध्वस्त करीत नाही.
मादकता तर विलक्षण आहे पण कामुकता नाही.
ती गाताना गाण्याप्रमाणे अल्लड बालिका होऊ शकते, यौवनात प्रवेश करू शकते,
स्वत:च्या आयुष्याकडे तटस्थपणे बघणारी योगिनीही होते.
लताला सरस्वती माना खुशाल, आशा सरस्वतीच्या हातातली वीणा आहे.
वीणेच्या असंख्य तारांपैकी कोणती न कोणती तार प्रत्येकाला छेदून जाते.
सरस्वतीला आपण नमस्कार करतो. आदराने पण लांबून.
वीणा आपल्या हाताच्या अंतरावर आहेसं वाटतं.
लताचा सूर तुम्हांला अज्ञात प्रवासाला घेवून जातो.
आशा आपल्या घरी येवून गाते असं वाटतं. घरकुलाला ती ऊब देते."
तिच्या आवाजात वीज आहे. ती कोसळते,
पण ज्या झाडावर पडते ते जळून जाण्याऐवजी उजळून जातं.
वादळ आहे पण काहीही उध्वस्त करीत नाही.
मादकता तर विलक्षण आहे पण कामुकता नाही.
ती गाताना गाण्याप्रमाणे अल्लड बालिका होऊ शकते, यौवनात प्रवेश करू शकते,
स्वत:च्या आयुष्याकडे तटस्थपणे बघणारी योगिनीही होते.
लताला सरस्वती माना खुशाल, आशा सरस्वतीच्या हातातली वीणा आहे.
वीणेच्या असंख्य तारांपैकी कोणती न कोणती तार प्रत्येकाला छेदून जाते.
सरस्वतीला आपण नमस्कार करतो. आदराने पण लांबून.
वीणा आपल्या हाताच्या अंतरावर आहेसं वाटतं.
लताचा सूर तुम्हांला अज्ञात प्रवासाला घेवून जातो.
आशा आपल्या घरी येवून गाते असं वाटतं. घरकुलाला ती ऊब देते."
- व. पु. काळे
कुसुमाग्रज उवाच :
• पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही, रुपायाभोवती फिरते.
• आईबापांनी टाकलेल्या पोरांसाठी एक आश्रम काढला तसा पोरांनी टाकलेल्या आईबापांसाठी एक आश्रम काढा.
• तुमच्यासारखे नवरे म्हणजे बायांनी लव्हेंडर शिंपडून कमरेला बांधलेले हातरुमाल नुसते!
• आपली पोरं चांगली आहेत, आपलं म्हातारपण वाईट आहे.
• मागे जाऊन आपल्याला तरुण होता येत नाही आणि पुढे जाऊन मरता येत नाही.
• नटाचं डोकं एकावेळी रानडुकराप्रमाणे एकावेळी एकाच दिशेने जाऊ शकत.
• म्हातारपण हे दुसरं बालपण असतं; पण त्या बालपणाला आई कुठून आणायची?
• बाग कुणाचीही असली तरी फुलं देवाची असतात.
• कापडात शिरलेल्या कुसळासारखे झालो आहोत आपण. कुसळाचा काटा होण्याअगोदर आपणच स्वतः दूर व्हावं.
• प्रेम टिकायलासुद्धा माणसं जरा दूरच असावी लागतात.
• बायको म्हणजे नवरा नावाच्या गलबतासाठी एक बंदर असतं.
• विधात्या, इतका का तू कठोर झालास? एकीकडे ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तू आम्हाला विसरतोस.
• आभाळ पाठीवर घेणाऱ्या आठ हत्तींना विचारून पहा, ते सांगतील - कुणीही कुणाचं नसतं.
• सक्तीच्या शहाणपणापेक्षा भक्तीचा मूर्खपणा एखाद्यावेळी जास्त यशस्वी ठरतो.
0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊