"मधुमेहाला मी धन्यवाद देते . त्याच्या योगाने मला पोषक आहार व व्यायामाचे महत्त्व कळले, माझ्या राहणीमानात शिस्त आली आणि भविष्यात होऊ पाहणाऱ्या संभाव्य आजारांपासून मी सावध झाले."
 – सोनिया सोटोमियर


   ग्लूकोमीटर (Glucometer) म्हणजे घरच्या घरी रक्तातील साखर मोजण्याचे यंत्र . ग्लूकोमीटर हाताशी
असले म्हणजे वारंवार दवाखान्यात जाण्याचा खर्च आणि वेळ तर वाचतोच, शिवाय आर्थिक बचतही खूप होते . बरेच लोक ग्लूकोमीटर खरेदी करतात खरे, पण ते शास्त्रशुद्ध पद्धतीने वापरायचं कसं हे मात्र बऱ्याच जणांना माहित नसते . ते वापरायची पद्धत step-by-step खाली दिलेली आहे व शेवटी video पण दिलेला आहे .

   आजकाल बाजारात मिळणाऱ्या Glucometers चे वैशिष्ट्य हे की ह्यात code वगैरे adjust करत बसावा लागत नाही आणि हे यंत्र कमीत कमी रक्त वापरून अचूक reading दाखवतं; ह्याची आम्ही रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासून अनेकदा खात्री करून घेतली आहे. हे Glucometer आम्ही Amazon वरून विकत घेतलंय. तुम्हीदेखील ते online order करून थेट घरपोच मागवू शकता . ह्याच्या स्ट्रिप्स व सुया संपल्यावर त्या सुद्धा online मागवता येतात किंवा आपल्या जवळच्या मेडिकलमध्ये मिळतात. (खाली links दिल्या आहेत.)

    आजच्या घडीला online मिळणारे काही चांगले Glucometers :

   जरी हा लेख एक विशिष्ट Glucometer घेऊन लिहिलेला असला तरी सर्व Glucometers साठी sugar मोजायची पद्धत ही एकसारखीच असते .

   
ग्लूकोमीटरवर रक्तातील साखर कशी मोजावी ?
   A Step-by-Step Guide to Measure Your Blood Sugar on Glucometer


Step-1

   ग्लूकोमीटरमधे खालील चार गोष्टी तुम्हाला मिळतील –
१. ग्लूकोमीटर – ह्यात सेल असतो, तो वर्षभर सहज चालतो .
२. Lancet Holder ( ह्याला Pricker Pen असेही म्हणतात ) – ह्याच्यावर एक फिरणारा गोल knob असतो व एका बाजूला दाबण्याचे बटण असते .
३. Stripsची डब्बी
४. सुया किंवा Lancet needles.

How to use glucometer to measure blood sugar -1

    You will find following 4 items in your Glucometer-
1. The Glucometer which runs on a cell, it can easily last for a year or more.
2. Lancet Holder: Also called a Pricker Pen – It has a rotating knob on the top and a button on its side to be preesed.
3. A small box containing strips
4. Lancet needles

   Step-2

   हे बघा . ह्या Lancet Holder वर एक गोलाकार knob आहे . ह्याच्या बाजूला असणारे बटण दाबताच ह्या knob मधून सुईचे टोक spring action ने बाहेर येते व त्वचेमध्ये टोचून परत आत जाते . ह्या knobची उंची कमी-जास्त ठेवून सुईने त्वचेच्या किती आत जावे हे आपल्याला नियंत्रित करता येते . सर्वसाधारणपणे, ज्यांची त्वचा खूप पातळ व मऊ आहे त्यांनी हा knob थोडा वर ठेवावा, व ज्यांची त्वचा राठ, जाड आहे त्यांनी तो वर करून न ठेवता पूर्ण खालपर्यंत दाबूनच ठेवावा .

How to use glucometer to measure blood sugar -step 2

   The knob at the top of Lancet Holder determines how deep the needle should be allowed to enter your skin at the time of taking a prick. If you have got very tender skin, keep it on scale two or of you have got rough skin on your palm, keep it at zero position alone. This is commonly used position.

   Step-3

   Lancet Holder मध्ये Lancet (सुई) बसवण्याच्या आधी ही cap बाहेर काढावी लागते .
How to use glucometer to measure blood sugar -step 3

   This is how you need to remove the cap before inserting a lancet into the holder.

   Step-4

   आता एक Lancet (सुई) हातात घ्या आणि एखाद्या अग्निबाणाप्रमाणे त्या Holder च्या टोकावर जो खड्डा दिसतो त्यात खोचा . Lancet त्यात व्यवस्थित बसताच खट्ट असा आवाज येतो .
How to use glucometer to measure blood sugar -step 4

   Now pick up a lancet and press it into the holder like a rocket. The proper fitting of the lancet is indicated by a sound.

   Step-5

   हा फोटो पहा . Lancet वरची cap गोलगोल फिरवून काढून टाका म्हणजे सुईचे टोक दिसेल. आता मघाशी काढून ठेवलेली Lancet Holder ची cap परत लावून टाका .
How to use glucometer to measure blood sugar -step 5

   Remove the circular cap of the lancet to expose the needle. After that, replace the cap of the holder into its original position.

   Step-6

   डबीतून Glucometer ची स्ट्रीप बाहेर काढा व डबी लगेच बंद करा . आकृतीमध्ये हिरवा बाण दर्शवतोय ते स्ट्रीपचे तोंड Glucometer च्या खाचेमध्ये टाका .
How to use glucometer to measure blood sugar -step 6

   Take out a glucometer strip from the box and replace its lid immediately. Note the end of the strip the arrow is pointing to. This is to be inserted into the base of the glucometer.

Step-7

   Glucometer चालू होईल व screen वर एक थेंबाचे चिन्ह आलेले दिसेल . ह्याचा अर्थ Glucometer आता तुमच्या रक्ताच्या थेंबाची प्रतीक्षा करत आहे .
How to use glucometer to measure blood sugar -step 7

   As soon as you insert the strip, glucometer turns on and a drop icon flashes on the screen. Now, the glucometer is ready to accept your blood.

Step-8

   डाव्या हाताच्या ज्या बोटातून रक्त काढायचे आहे , त्या बोटाचे टोक कोरड्या कापसाने पुसा – स्पिरीटने किंव
डेटोलने नव्हे .
How to use glucometer to measure blood sugar -step 8

   Clean the tip of your finger with a dry cotton, do not use spirit or any other antiseptic. We do not want the blood to get diluted by any means.

   Step-9

   आता ही step फार महत्वाची आहे . ही चुकली तर Glucometer error दाखवेल अ सगळं तुम्हाला परत पहिल्यापासून करावा लागेल. आपल्याला तीन ठिकाणी दाब द्यायचा आहे . पहिल्यांदा, ज्या बोटातून रक्त काढायचे आहे, त्या बोटाच्या पेरावर अंगठ्याने दाब द्या म्हणजे त्या बोटाच्या टोकाशी रक्त जमा होईल, ती त्वचा थोडी लाल देखील होईल . आता, त्या बोटावर Lancet चा knob दुसऱ्या हाताने (उजव्याने) दाबून धरा, हा झाला दुसरा दाब . आता Lancet Holder च्या side ला असलेले निळे बटण अंगठ्याने दाबा . काय झाले? तुम्हाला किंचित सुई टोचली व रक्ताचा एक थेंब बाहेर आला .
How to use glucometer to measure blood sugar -step 9

   This is a critical step. If something goes wrong here, glucometer will give an error. Now you have to press at three spots sequentially. First, press with the thumb just below the tip of the finger you just cleaned with cotton, this helps the blood to accumulate at the tip. Now, press the knob of the lancet holder on the tip firmly with the other hand. With the same hand, press the blue button on the lancet holder to release the needle. You get a prick and a drop of blood pops out of your finger.

   Step-10

   Lancet खाली ठेवा व त्याच हाताने (उजव्या) तुमच्या रक्ताच्या थेंबाची प्रतीक्षा करीत असलेले Glucometer अशा पद्धतीने वर उचला की strip चे टोक रक्ताच्या थेंबाला स्पर्श करेल . स्पर्श करताच Strip चे हे टोक रक्त आत खेचून घेईल व बीप असा आवाज येईल . screen वर 8-7-6-5-4- असे countdown सुरु झालेले तुम्हाला दिसेल .
How to use glucometer to measure blood sugar -step 10

   Put the lancet holder down. Now lift the glucometer in such a way that the tip of the strip touches the drop of the blood. The blood is sucked into the strip and you hear a beep. The counting is started.

   Step-11

   तुमच्या रक्तातल्या साखरेचे reading screen वर आलेले तुम्हाला दिसेल . ते तुमच्या डायरीमध्ये तारीख लिहून नोंदवून ठेवा . Strip बाहेर काढताच Glucometer बंद होईल . दोन तासांनंतर तुम्हाला पुन्हा sugar मोजायची असेल तर नवीन strip घ्या .
How to use glucometer to measure blood sugar -step 11

   As soon as countdown is over (8 seconds), you see your blood sugar reading on the screen. Note it in your diary. Take a new strip for next reading.

   Normal Blood Sugar Readings:

    Fasting: 80 -120 mg/dL
    Two Hors after Food: 90 – 150 mg/dL

   Glucometer च्या lancets येथून मागवा (१०० लॅंसेट्स):
    ACCU-CHECK Instant Glucometer च्या strips येथून मागवा (५० स्ट्रिप्स):
Watch this Youtube Video:


विशेष धन्यवाद: डॉ. शिरीष लिमये

   90% मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखर जास्त असण्याचे प्रमुख कारण म्हणजे स्थूलता . अगदी 10% जरी वजन कमी केले तरी रक्तातील साखरेवर खूप चांगले नियंत्रण ठेवता येते . आपण वजन कमी करू ईच्छित असाल तर खालील दोन लेख अवश्य वाचा: