Powered by Blogger.
Have a great day!
Visit again!

सोने-चांदी घेताय? तर मग हे नक्की वाचा !

    दुधापासून ते औषधांपर्यंत सगळीकडे भेसळीचं साम्राज्य असताना सोन्याच्या शुद्धतेची तरी काही गॅरंटी आहे का ? हो नक्कीच आहे, डोळे उघडे ठेऊन गेलात तर, नाहीतर.... आहेच ताप, संताप आणि पश्चात्ताप ठरलेला. सोने (चांदीपण) रोज स्वतःचेच विक्रम मोडत चाललेले असताना ते दिवसागणिक अधिकाधिक मौल्यवान आणि दुर्मिळ होत जाणार यात शंका नाही. तर हे असे सोने-चांदी म्हणजे भविष्यातली एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ह्या दृष्टीने बरेच लोक ते विकत घेऊन ठेवत आहेत. सोनं विकत घेणं खूप सोपं आहे आणि ते घेताना फसवलं जाणं पण! पण दोन-चार महत्वाचे मुद्दे जर आपण लक्षात ठेवले तर २४ कॅरेटचं बावन्नकशी सोनं तुमच्या ओंजळीत सहज येऊ शकतं.

    येथे चर्चा आपण सोन्याची करूया, पण शुद्धतेचे जे निकष सोन्याला लागू आहेत, तेच चांदीलापण.

    आता गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं तर साहजिकच अशा स्वरूपात घ्यायचं की ज्यावर घडणावळ (making charges) कमीत कमी पडेल. हे दोन प्रकारात घेता येतं - एक तर सोन्याची चिप (बिस्कीट किंवा नाणं या स्वरूपात) आणि दुसरं, वेढणी किंवा वळं ह्या स्वरूपात. आता ह्यावर घडणावळ किती पडते ? तर हा एक खूप मोठा संशोधनाचा विषय होऊन बसतो कारण प्रत्येक सराफानुसार हा दर वेगवेगळा असल्याचे तुम्हाला दिसेल. ३% GST मात्र सगळीकडे लागू आहे. पुण्यात लक्ष्मी रोडवर अनेक वर्षांपासून विविधरंगी वस्त्रं आणि दागिन्यांच्या छोट्या-मोठ्या दालनांची एक पंगतच बसली आहे! इथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून चोखंदळ लोक (तुमच्यासारखे!) येतात आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या आशीर्वादासोबत एखादा ड्रेस किंवा दागिना खरेदी करून दिमाखात मिरवत आपल्या गावी परत जातात. पेट्रोलचा दर हा प्रत्येक पेट्रोल पंपावर सारखाच असतो, तसा सोन्याचा दरसुद्धा सर्व सराफांकडे एकच असेल अशी तुमची समजूत असेल तर ती आधी दूर करा! तो कमी-जास्त असू शकतो, शहराप्रमाणेपण बदलतो आणि दिवसातून २-३ वेळा update होऊ शकतो.

    आता पहिला महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही घेत असलेलं २४ कॅरेटचं सोनं (बिस्कीट, नाणं वा वेढणी) हे दोन प्रकारात येतं - ९९.९% शुद्धता आणि ९९.५% शुद्धता. दुकानातील कामगारांच्या बोलीभाषेत सांगायचं तर - ट्रिपल नाईन आणि नाईन-नाईन-फाईव्ह. ९९९ किंवा ९९५. ह्या दोन्हींच्या दरात एक लाखामागे साधारण ४०० ते ६०० रु. चा फरक पडतो हे लक्षात असू द्यावे. दुकानांमध्ये हे दोन्ही दर एका पाटीवर लिहिलेले असतात, ते नीट बघून घ्यावे. बऱ्याचदा, सोन्याच्या झळालीला, चांदीच्या चकाकीला आणि सोनाराच्या गोड शब्दांतील स्वागताला भुललेला ग्राहक ९९९ चा दर देऊन ९९५ ची वस्तू घेऊन येतो. आपला गणित विषय कितीही नावडीचा असला तरी हा मुद्दा मात्र विसरू नये, कारण सोन्याचांदीचे भाव जसेजसे वाढत जातील तसतसा हा फरकपण वाढतच जाईल हे ओघाने आलेच. समजा, आज सोन्याचा भाव १ लाख रुपये तोळा आहे आणि तुम्ही ५०० रु. जास्त देऊन ९९५ शुद्धतेचे सोने घेऊन आलात. उद्या हा भाव २ लाखांवर पोचला तर तुम्ही १००० रु. जास्त देऊन याल.

    वर्तमानपत्रात / वेबसाईटवर दिसणारा दर हा ९९.९% शुद्धतेचा असतो . सोन्याचे जेव्हा दागिने बनतात तेव्हा त्यात इतर धातू मिसळले जातात व त्याच्या शुद्धतेची टक्केवारी कमी कमी होत जाते, जसे : २२ कॅरेट = ९१.६%, १८ कॅरेट = ७५%, १४ कॅरेट = ५८.३% आणि अर्थात, दरसुद्धा. ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणाऱ्या सुवर्णपदकामधे तर १% पेक्षा कमी सोनं असतं. गरीब बिचारे! आपण इथे फक्त २४ कॅरेट शुद्ध सोन्याचाच विचार करणार आहोत, दागिन्यांचा नाही.

    आता एक गम्मत म्हणून काही दुकानांमध्ये फेरफटका मारूया .

    तनिष्क ज्वेलर्स, मलबार गोल्ड, सेनको गोल्ड हे दागिन्यांतील मोठे ब्रँड. भारतात अनेक शहरांमध्ये त्यांच्या शोरूम्स आहेत व त्यांचे दरदेखील स्थानिक सराफांच्या दरापेक्षा १० ग्रॅमला १००० ते १२०० रु. जास्त आहेत. तनिष्क ज्वेलर्स हे नाणे व वेढणी ह्या दोन्हींवर ५% घडणावळ आकारतात व परत करायचे झाल्यास चालू दराच्या ३% शुल्क कमी करून तुमची रक्कम परत देतात. सेनको गोल्डवाले नाण्यावर 6% घडणावळ घेतात, वेढणीवर कुठलेही घडणावळ शुल्क नाही आणि परत विकत घेताना ३% शुल्क वजा करून तुमचे पैसे परत करतात. मलबार गोल्ड सोन्याच्या नाण्यावर ४% तर वेढणीवर १.५% शुल्क घेतात आणि परत घेताना वर्तमान किमतीच्या २% शुल्क लावून रक्कम परत देतात. पु. ना. गाडगीळ आणि रांका ज्वेलर्स हे पुण्यातील गेल्या १०० वर्षांहूनही जुने दागिन्यांचे व्यावसायिक. पी. एन. जी. ज्वेलर्स हे नाण्यावर २% घडणावळ घेतात, वेढणीवर घेत नाहीत आणि सोने परत घेतेवेळी चालू किमतीच्या ३% मूल्य वजा करून घेतात. पी. एन. जी. ब्रदर्स यांचे पुण्यातील सर्वात जुने दुकान असावे, कारण त्यांनी आपल्या दुकानाच्या नावाखाली मोठ्या अभिमानाने १८३२ असे लिहिले आहे! ते नाणे, बार वा वेढणी काहिही घेतले तरी त्यांची घडणावळ शून्य आहे पण परत घेतेवेळी ते ४% शुल्क आकारतात. पी. एन. जी. अँड सन्स ह्यांचे भाव किफायतशीर वाटले पण ९९५ शुद्धतेच्या १० ग्रॅम नाण्याचा दर हा वेढणीच्या दरापेक्षा १८०० रु. जास्त आहे (म्हणजे साधारण १.३५% जास्त). ह्यांचा कपात दर ४% आहे. रांका ज्वेलर्स वेढणीला कोणतेही घडण शुल्क आकारत नाहीत आणि नाण्यासाठी प्रति ग्रॅम १०० रु. शुल्क आकारतात आणि परत करताना प्रति ग्रॅम २०० रु. वजा करून घेतात. अष्टेकर ब्रदर्स हे नाण्यामागे ६५० रु. आणि वेढणीमागे ५० रु. आकारतात आणि ज्या दराने ते सोने परत घेतात तो दर चालू दराच्या साधारण ४% कमी असा येतो. कृष्णा राजाराम अष्टेकर (KRA) ज्वेलर्स हे एका नाण्यासाठी २०० रु. एवढी घडणावळ घेतात, वेढणीसाठी नाही. घोडके सराफ नाण्यामागे ३५० रु. व एका वेढणीला १५० रु. घडणावळ आकारतात आणि साधारण २.५% शुल्क आकारून तुमचे सोने परत घेतात. नगरकर ज्वेलर्स एका नाण्याला ८०० रु. घडणावळ घेतात, वेढणीसाठी नाही आणि ४% वजा करून तुमचे सोने परत घेतात. पिंपळगावकर ज्वेलर्स ह्यांचे जडणघडण शुल्क नाण्यासाठी रु. ३५० आणि वेढणीसाठी प्रति ग्रॅम १०० रु. असे आहे. परत घेताना ३% ने कमी करून घेतात. कल्याण ज्वेलर्स आणि वामन हरी पेठे हे मूळ मुंबईचे दागिन्यांचे व्यापारी. कल्याण ज्वेलर्स ह्यांचा ९९९ चा दर जरा इतरांपेक्षा १००० -१२०० रु. जास्तच वाटला. ह्यांचे घडणावळ शुल्क नाण्यासाठी ३% आणि वेढणीसाठी १ % आहे. परत घेतेवेळचा दर मात्र चालू भावाच्या २% कमी, हा किफायतशीर वाटला. वामन हरी पेठे हे प्रति नाण्याला ३५० रु. आणि वेढणीला २.५% असे शुल्क आकारतात. परत घेताना ३% कापून रक्कम परत देतात. चंदूकाका सराफ ह्यांच्याकडे सांगण्यात आले की ९९.९% शुद्धतेचे सोने नसतेच मुळी, जे काही असते ते ९९.५% चेच असते. हे १० ग्रॅम नाण्यावर ६०० रु. आणि वेढणीवर ३५० रु. घडणावळ घेतात व परत घेतेवेळी २% शुल्क लावून उरलेली रक्कम परत करतात. पी. सी. चंद्रा ह्यांचे दर बघून जरा भीतीच वाटली. हे नाण्याला ४% आणि वेढणीला ६% घडणावळ घेतात. आणि परत घेताना चालू दराच्या ८% ने कापून घेतात म्हणे. म्हणजे एकदा आलेले गिऱ्हाईक पुन्हा इकडे परत फिरकूसुद्धा नये अशी तुमची इच्छा आहे का, असे ह्यांना जाऊन कोणीतरी विचारायला पाहिजे. *

    आता राहिल्या दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी - वजन आणि शुद्धता. कालपर्यंत जे डिजिटल वजन काटे अस्तित्वात होते ते कमीत कमी ५ मिलिग्रॅम अर्थात् ०.००५ ग्रॅम पर्यंत वजन मोजू शकत होते, त्यापेक्षा कमी नाही. मात्र हल्ली जे नवीन वजनकाटे आलेले आहेत ते १ मिलिग्रॅम अर्थात् ०.००१ ग्रॅम इतक्या सूक्ष्मतेचे वजन अचूक मोजू शकतात. याचाच अर्थ असा की तुमच्या बिस्किटचे वजन ५.०१२ ग्रॅम असेल तर पूर्वीच्या काट्यावर ते ५.०१५ ग्रॅम इतके दिसत असे, याचाच अर्थ ०.००३ ग्रॅमचे पैसे तुम्ही विनाकारण जास्त देत होतात. हल्ली आलेल्या काट्यांमध्ये ही त्रुटी ०.००१ पर्यंत कमी केलेली असल्याने तुमच्या दागिन्याचे अचूक वजन तुम्हाला समजते. (आणि वजन मोजताना त्यावर एक माशी येऊन बसली तर झटकन १० मिलिग्रॅम वजन वाढेल तिकडेपण लक्ष असू द्या!) हल्लीच्या जवळजवळ सर्व नामांकित सराफांकडे हे वजन काटे उपलब्ध आहेत. ह्या काट्याला precision balance असे नाव आहे. कारण सोने-चांदी दिवसेंदिवस महाग होत चालल्याने असे काटे दुकानात ठेवावेत असा RBI चा आग्रह आहे.

    तुमच्या हातात आलेले सोने ९९९ शुद्धतेचेच आहे हे कशावरून? सोन्याचांदीची शुद्धता मोजण्यासाठी एक यंत्र येते त्याला कॅरेटमीटर असे म्हणतात. त्यात तुम्ही जो दागिना ठेवाल त्याची शुद्धता तुम्हाला computer screen वर दिसेल. तुम्ही ज्या दुकानातून सोने-चांदी विकत घेता तिथे हे मशीन आहे हे पण बघून घ्या. २२ कॅरेट व त्यापेक्षा कमी शुद्धतेचे जे दागिने येतात त्यावर एक सहा अंकी आकडा असतो, त्याला HUID नंबर असे म्हणतात. असे दागिने घेण्याचा प्रसंग आला (BIS) The Bureau of Indian Standards चे ॲप डाउनलोड करून घ्या व त्यात HUID नंबर टाका. तुम्ही घेतलेल्या दागिन्याच्या शुद्धतेची टक्केवारी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कळेल.

    अशा पद्धतीने तुम्ही घेत असलेल्या वस्तूच्या वजन आणि शुद्धतेची पडताळणी झाल्यानंतरच मग GST चे बिल फायनल करायला सांगा. आता तुमची खरेदी पूर्ण, नव्हे, परिपूर्ण झाली! काही प्रमुख सोनारांचे तुलनात्मक दर तुम्हाला ह्या तक्त्यावरून लक्षात येतील :

    आता भविष्यात जर तुम्हाला तातडीची पैशांची गरज पडली व सोने विकायची वेळ आली तर? तुम्ही ज्यांच्याकडून घेतले तो सोनार वर सांगितल्याप्रमाणे ते विकत घेतो, पण तुमच्या खात्यात ते पैसे यायला ३-४ दिवस लागू शकतात. पण तुम्ही जिथून सोने घेतले ते दुकानच जागेवर नसेल तर...? तुम्हाला पैशांची आजच गरज असेल तर.... ? तुम्ही बदली होऊन दुसऱ्या गावी गेला असला तर...? हल्ली तुम्हाला शहरात बऱ्याच ठिकाणी Sai Gold Precious Metal Pvt Ltd ह्या कंपनीचे outlets दिसतात. भविष्यात इतरही काही अजून कंपन्या येतील. ही कंपनी तुमच्याकडील दागिन्यांची शुद्धता मशीनमध्ये मोजून लगेच तुम्हाला योग्य मोबदला देतात.

   आता, दुकानातून घेतलेले सोने त्याच दिवशी जर तुम्ही विकले तर तुमचे किती नुकसान होते याचे एक गणित करून बघूया. समजा, तुम्ही १ लाखाचे सोने घेतले, घडणावळ दिली २००० रु. तर ३% GST बसून ती वस्तू तुम्हाला १०५०६० रु. इतक्याला पडेल. ती वस्तू तुम्ही त्याच दिवशी विक्रीस काढली, तर त्यातून घडणावळ व GST तर वजा होईलच शिवाय त्या त्या दुकानाच्या नियमाप्रमाणे २ ते ४% शुल्क पण लागेल. समजा ते शुल्क २% लागले तर तुम्हाला त्या वस्तूचा ९८००० रु. इतका मोबदला मिळेल. म्हणजेच १०५०६० रु. ला घेतलेल्या वस्तूचे तुम्हाला ९८००० रु. मिळतील म्हणजे जवळजवळ ६.७% तोटा. सोप्या शब्दांत सांगायचे तर, सोन्याच्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा हवा असेल तर, तुम्ही घेतलेल्या तारखेपासून जोपर्यंत ६-७% सोन्याच्या किमती वाढत नाहीत तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावीच लागेल. हा वाट पाहण्याचा कालावधी तुमच्या नशिबाप्रमाणे २ महिन्यांपासून ते २ वर्षे, कितीही असू शकतो.

    सण, सुगंध आणि स्वादिष्ट पक्वान्न यांच्या जोडीला सोनं असेल तर तो आनंद अनेक पटींनी वाढतो. असे असले तरी एक लाखाच्या सोन्याच्या बिस्किटापेक्षा एक पारले-जी चे बिस्कीट जास्त मौल्यवान वाटते!

    * हे सर्व दर २०२५ मधील आहेत.



 सत्यम्, शिवम्, सुंदरम् की मंगल परिभाषा युगों-युगों से जिसने दुनिया को सिखायी, क्या ऐसे सनातन धर्म के आप भी चहिते हैं? क्या हमारे देश की संस्कृति, परंपरा, सभ्यता और हमारी आधुनिक वैज्ञानिक उन्नति का आपको अभिमान है? तो जुड जाइए इस Telegram ग्रुप से जिसका नाम है - हम हिंदुस्तानी. CLICK TO JOIN


JaiShriram

0 comments:

Post a Comment

Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊

Popular Posts *click to read*

Touching Real Life Stories
successful weight losers
know your vitamin deficiency
what is spirituality
early evening raga based songs
depression
YOUNG AND HEALTHY health score
Uplift your mood audiovisual waves
Funny Google assistant
reincarnation of anne as borbro
alternative ways to heal cancer
Hi!  Search ANYTHING,
                      Buy ANYTHING! 
  
  Time for SHOPPING !
  Everything from A to Z 24x7


Subscribe by Email

(◔ᴗ◔) Note for Subscribers: Please make sure your activation link has not gone to the spam folder of your email.  

FEATURED

Touching Real Life Stories
successful weight losers
know your vitamin deficiency
what is spirituality
early evening raga based songs
depression
YOUNG AND HEALTHY health score
Uplift your mood audiovisual waves
Funny Google assistant
reincarnation of anne as borbro
alternative ways to heal cancer

Calculate Your BMI

Flag Widget

Online Dictionary

   Word Search
Dictionary, Encyclopedia & more
*
by:

Online Radio

Online Radio

• ONLINE RADIO ♪ ♬ 
VBS
RADIO  VIVIDH BHARTI
• Old Is Gold ♪ ♩

Your Planetary Make-up