काही दिवसांपूर्वी गावी गेलो होतो तेव्हा जुन्या कागदपत्रांचा ढिगारा उपसत असताना अचानक एक खजिना हाती लागल्याचा सुखद धक्का बसला! १९५०-६० च्या सुमारास कुण्या अज्ञात चित्रकारांनी पौराणिक कथानकांवर काढलेली काही अप्रतिम चित्रे हाती लागली. ह्या चित्रांचे कागद जरी जीर्ण-शीर्ण होण्याच्या मार्गावर
असले तरी ह्या चित्रांमधून व्यक्त झालेले निरागस भाव, सौंदर्य आणि त्यातील रंगसंगती गेल्या ६ दशकांचा काळ तसूभरही कमी करू शकलेला नाही. नेत्रांना खिळवून ठेवणारी आणि हृदयाला निखळ आनंदाने भरून टाकणारी ही चित्रे बघणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेतील हे निश्चित!
ही चित्रे मोठ्या screen वर अधिक सुंदर दिसतील. मोबाईलवर बघत असाल तर ज्या चित्रावर click कराल ते full screen दिसेल.
वाळवी लागण्याच्या आत जर लक्षात आलं असतं तर किती बरं झालं असतं ही रुखरुख आता कायमचीच लागून राहणार!
*येत आहे: चित्ररूप शाकुंतल
0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊