uc
"कर्करोग, कितीका विकोपाला गेलेला असेना, बरा होऊ शकतो . शस्त्रक्रियेला सोडून कर्करोगासाठी अनेक प्रभावी उपचारपद्धती अस्तित्वात आहेत ."
- सर आल्फ्रेड गॉल्ड

   कोणत्याही आजाराचे रिपोर्ट्स तुमच्या समोर असतील तर मग शंकेला काही जागा उरत नाही . तुम्ही डॉक्टरशी वाद घालू शकता, संशोधनाद्वारे मांडलेल्या सिद्धांतांना आवाहन देऊ शकता, उपचारपद्धतीबद्दल शंका उपस्थित करू शकता, पण रिपोर्टबद्दल नाही . कॅन्सरला चारी मुंड्या चीत केलेल्या लोकांच्या ह्या अद्भुत गोष्टी वाचा . उपचार चालू असताना काहींच्या हृदयातील आशा पल्लवित होत्या तर काहींना निराशेने ग्रासले होते . पण सरतेशेवटी कॅन्सरच्या काळोखाने झाकोळलेल्या त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा सूर्योदय झाला, आणि एक सामायिक बाब जगासमोर आली - वरकरणी सामान्य दिसणाऱ्या पदार्थांमध्ये रोग नष्ट करण्याचे असामान्य गुणधर्म दडलेले असतात . 

कर्करोगावर किमो- रेडिएशन पेक्षा प्रभावी पर्याय

    ◾ स्टेज-४ पर्यंतचे कर्करोग सहज बरे करणारी ज्यूस थेरपी

   जमिनीखाली वाढणाऱ्या पदार्थांमध्ये (जसे: गाजर, बीट, आलं, लसूण, रताळी) कर्करोगनाशक गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात हे नेहेमी ध्यानात ठेवावे .

   अ‍ॅन कॅमेरॉनच्या आतड्याचा कॅन्सरग्रस्त भाग डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला आणि तिला हायसं वाटलं . स्टेज -३ चा तो धोकादायक कॅन्सर होता . तिची प्रकृती उत्तरोत्तर सुधारत गेली . सहा महिन्यांनंतर फॉलो-अप सी. टी स्कॅन काढला तेव्हा तिच्या फुप्फुसांमध्ये मूळ धरू घातलेल्या दोन नव्या गाठी डॉक्टरांच्या नजरेस पडल्या . ह्या गाठी पूर्णपणे नव्या होत्या किंवा पूर्वी आतड्यात झालेल्या कॅन्सरची हि पुनरुत्पत्ती होती, हे सांगणं कठीण होतं . PET स्कॅनद्वारे ह्या गाठी कॅन्सरच्याच होत्या हे पक्के झाले . आरोग्यशास्त्राप्रमाणे तिचे आयुष्य आता जास्तीत जास्त दोन वर्षे उरले होते . प्रचलित क्लेशदायक किमोथेरपीला एक शेवटचा पर्याय म्हणून हाताशी ठेऊन अ‍ॅनने गाजररसाचा उपचार सुरु केला . आपल्या आहार-विहारात इतर कोणताही बदल न करता अडीच किलो गाजराचा रस तिने सकाळ-दुपार-संध्याकाळ असा आठ महिने घेतला . ही उपचारपद्धती सुरु केल्यानंतर दोन महिन्यांनी सी. टी स्कॅन केला असता त्यात गाठींच्या वाढीला आळा बसल्याचे लक्षात आले . चार महिन्यांनी केलेल्या सी.टी स्कॅनमध्ये गाठी कमी कमी होत असल्याचे तसेच लिम्फ नोड्स सामान्य आकाराचे झाल्याचे आढळले . आठ महिन्यांनी केलेल्या स्कॅनमध्ये कॅन्सरचा लवलेशही नव्हता . अ‍ॅन कॅमेरॉनने एक महत्वाची गोष्ट नमूद केली आहे - प्रार्थना, कृतज्ञता, समर्पण याद्वारे तिने दृष्टिआड असलेल्या ईश्वरी शक्तीची आराधनापण केली, ज्याद्वारे तिच्या रोगाचे मनातील मूळ नष्ट होण्यास नक्कीच मदत झाली . कालांतराने, तिने आपला यशस्वी कॅन्सर लढा Curing Cancer with Carrots ह्या पुस्तकात शब्दबद्ध केला .

   ख्रिस वार्कची सुप्रसिद्ध केस: ख्रिस वार्कने त्याच्या पसरलेल्या आतड्याच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रियेनंतर किमो किंवा रेडिएशन घेण्यास नकार दिला . त्याचे कारण, तो म्हणतो: शस्त्रक्रियेनंतर ४ वर्षांमध्ये आतड्याचा कर्करोग होण्याचे प्रमाण १००% आहे आणि किमो-रेडिएशनने फक्त ४-६% लोकांचेच आयुष्य वाढते, ते पण फक्त ३ वर्षे . व्हेगान डाएटचे अनुसरण करून त्याने आपल्या कॅन्सरला कायमचे पळवून लावले . गाजर-सेलेरी-बीट-आल्याचा रस त्याच्या आहाराचा एक महत्त्वाचा घटक होता . तो म्हणतो - George Malkmus च्या God's Way to Ultimate Health ह्या पुस्तकापासून मला फार प्रेरणा मिळाली .

   ह्याच पद्धतीने डॉ. डेल फिंग्टरी हिने स्वतःला झालेल्या नॉन-हॉजकिन्स लिंफोमा ह्या कर्करोगावर मात केली . हा लिंफोमा अशा टप्प्यावर होता की जिथे शस्त्रक्रिया तर सोडाच पण किमो-रेडिएशनही शक्य नव्हते . तिची Beyond Cancer Treatment आणि The Joy of Nutrition ही पुस्तके प्रसिद्ध आहेत . डॉ. डेल फिंग्टरी स्वतः एक आहारतज्ज्ञ आहे !



थोडक्यात ज्यूस थेरपी

ज्यूस थेरपीसाठी वेगवेगळी पुस्तके वाचण्याची गरज नाही . थोडक्यात एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या आवडीचे अनेक ज्यूस तुम्हीच तयार करू शकाल . एक फळ + एक पालेभाजी + कोणताही एक जमिनीखाली वाढणारा पदार्थ (वर दिल्याप्रमाणे) , ह्यांचा रस ग्लासभर करून हे मिश्रण दिवसातून २-३ वेळा घ्यावे . चवीसाठी त्यात लिंबू पिळायला हरकत नाही . शरीरातील बहुतेक कर्करोग हे मिश्रण घालवून टाकते .

    ◾संकरित दुग्धजन्य पदार्थ आणि स्तनांचा कर्करोग ह्यांचा थेट संबंध प्रयोगाने सिद्ध

   तर्कसंगत विचार केल्याने आपल्या आणि इतरांच्या जीवनात कशी क्रांती घडून येऊ शकते ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जेन प्लांट ह्या शास्त्रज्ञ स्त्रीची हि कथा. जेनच्या ह्या कथेला फेसबुकवर आतापर्यंत चौदा दशलक्षांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत ! जेन प्लांट हि आघाडीची ब्रिटिश भूगर्भशास्त्रज्ञ . १९८७ मध्ये वयाच्या ४२व्या वर्षी आपल्याला स्तनाचा कर्करोग झाला आहे ते तिच्या लक्षात आले . त्यानंतरच्या सहा वर्षांमध्ये ती ह्या सर्व क्लेशदायक अनुभवांतून गेली - ३५ किमोथेरपी, १२ रेडिएशन आणि नंतर शस्त्रक्रियेद्वारे एका स्तनाचे कायमचे उच्चाटन . हा कर्करोग आता मानेपर्यंत पोचला होता, त्याची गाठ दिवसेंदिवस वाढतच होती . शास्त्रज्ञांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आकडेवारी फार आवडते . ह्या आकडेवारीचे सखोल विश्लेषण करून ते एखाद्या गोष्टीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करतात . चायनीज स्त्रियांमधे स्तनांचा कर्करोग सर्वात कमी प्रमाणात आढळतो . त्यांच्या ह्या आकडेवारीचा आणि जीवनशैलीचा अभ्यास करताना जेनच्या डोक्यात विजेप्रमाणे एक विचार चमकून गेला . चायनीज स्त्रियांच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण फार कमी असते . कदाचित हे तर कारण नसेल ? तिने स्वत: हा प्रयोग करून बघण्याचा निर्णय घेतला . सहा सेकंदात घेतलेला हा निर्णय, पण त्याने जेनचा सहा वर्षांपासून शरीर पोखरत गेलेला हा कॅन्सर सहा आठवड्यात हळू हळू कमी कमी होत जाऊन अदृश्य झाला ! जेनने ह्या विषयावर आणखी सखोल संशोधन केले व शोधून काढले की संकरित गायींना दूध वाढवण्यासाठी कृत्रिम हार्मोन्सची जी इंजेक्शन्स देण्यात येतात त्यामुळे काही इस्ट्रोजनसदृश वृद्धिजन्य घटक दुधात येतात; त्यांच्या सेवनाने स्तन व प्रोस्टेटसारख्या ग्रंथींमध्ये कॅन्सरच्या पेशी गाठी निर्माण करतात . भूगर्भशास्त्रज्ञ जेनने मांडलेला हा विचार म्हणजे वैद्यकशास्त्राला दिलेले एक वरदान आहे ! तिने आपले सर्व विचार Your Life in Your Hands ह्या पुस्तकात मांडले आहेत ज्यात ती इतर निरोगी जीवनशैली पद्धतींबद्दल चर्चा करते, जसे की - ताजे सेंद्रीय अन्न खाणे, कृत्रिम रसायनमिश्रित अन्न कमी खाणे, निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाणे, इत्यादी. पुस्तकात जेन हा उल्लेख करायला विसरली की देशी गायींमधून मिळणाऱ्या दुधात हे कर्करोगजन्य हानिकारक घटक नसतात म्हणून .

    ◾ शरीरभर पसरलेला स्टेज-४ यकृताचा कर्करोग साल्व्ह व आहारात बदल करून बरा केला

   बिल टक्सकडे आधुनिक अमेरिकन जीवनशैलीची सर्व अपत्ये होती - जास्त वजन, उच्च रक्तदाब , उच्च साखर आणि उच्च कोलेस्टरॉल . त्याने रोज अती गोड पदार्थ , प्रक्रिया केलेले फास्ट फूड, जंक फूड आणि सुमारे १२ सोडा ह्या पदार्थांचे अनेक वर्षे यथेच्छ सेवन केले होते . कालांतराने त्याला यकृताच्या कर्करोगाचे निदान झाले ह्याचे कुणालाही आश्चर्य वाटले नाही . आधुनिक कॅन्सरच्या उपचारपद्धतीच्या दुष्परिणामांचा धसका घेऊन बिलने बारीक-सारीक दुय्यम दर्जाचे उपचार करण्यात जीवनातील बहुमोल १५ महिने अक्षरश: वाया घालवले . तो पिवळा पडू लागला आणि आपल्या प्राणशक्तीच्या सर्वात निम्न स्तरावर पोचला . आणखी एक सी.टी. स्कॅन केला तेव्हा कर्करोगाने आपला मोर्चा स्वादुपिंड आणि मूत्रपिंडापर्यंत नेल्याचे निष्पन्न झाले . मृत्यू दोन हातांवर उभा असताना काहीतरी तातडीचे उपाय हाती घेणे आता अत्यावश्यक होते . बिलने म्हटले आहे की त्याने व त्याच्या पत्नीने कर्करोगाच्या संदर्भात जी शेकडो पुस्तके चाळली त्यापैकी या दोन पुस्तकांनी त्याला विशेष प्रभावित केले - Ingrid Naiman चे Cancer Salves: A Botanical Approach to Treatment आणि Tanya Pierce चे Outsmart Your Cancer: Alternative Non-toxic Treatments.बिलचा कर्करोग एव्हाना त्याच्या पाठीच्या त्वचेपर्यंत येऊन पोचला होता . त्याने त्वचेवर साल्व्ह लावणे सुरु केले . (साल्व्ह हे मूळ अमेरिकन औषधी वनस्पतींच्या मिश्रणाचे एक मलम आहे जे त्वचेतील कॅन्सरग्रंथीमधून विष शोषून घेते व कॅन्सग्रस्त पेशी नष्ट करते.) हा उपचार मात्र अतिशय दाहक आणि क्लेशदायक होता . त्याचवेळी, बिलने साखरयुक्त पदार्थांचे सेवन अतिशय कमी करून टाकले आणि Tanya Pierce ने तिच्या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे निरोगी जीवनशैलीपूरक बदल अंगिकारले . हळूहळू, बिलची ताकद पूर्वपदावर आली आणि त्याला कधी नव्हे एवढे ताजेतवाने वाटू लागले . केवळ सहा महिन्यात आपल्या आयुष्यात झालेला हा चमत्कार बिलने (विल्यम त्याचे नाव) एका पुस्तकरूपाने जगासमोर आणला - Cured My Cancer: How I Cured My Stage-4 Multi-organ Cancer at Home.

    ◾ गेरसन अल्कलीयुक्त आहार पद्धतीने शरीरात पसरलेल्या कॅन्सरचे उच्चाटण

   "मिस्टर मॅग्लीऑनिको, नक्की तुम्हीच तो पेशंट आहेत ना ज्याच्या पाठीच्या मणक्यात सहा आठवड्यापूर्वी पसरलेल्या कर्करोगाचे निदान झाले होते ?", नॉर्मल स्कॅन बघून गोंधळून गेलेले ओंकॉलॉजिस्ट पुन्हा पुन्हा विचारात होते. त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता . कदाचित हा स्कॅन एखाद्या दुसऱ्याच निरोगी पेशंटचा असावा हि शंकादेखील त्यांच्या मनाला चाटून गेली . हा स्कॅन नॉर्मल आहे हे सही करून लिहून द्यायला त्यांनी दोन तास घेतले ! मिस्टर मॅग्लीऑनिको यांच्या कुटुंबात कॅन्सर हा पाचवीलाच पूजला होता असे म्हटले तरी चालले असते . शस्त्रक्रिया, किमो आणि रेडिएशन - सर्व करून झाले होते, पण व्यर्थ . शेवटी, डॉ. मॅक्स गेरसन ह्यांनी सुचवलेल्या अल्कलीयुक्त आहाराच्या प्रोटोकॉलचे मॅग्लीऑनिको यांनी काटेकोरपणे पालन केले आणि केवळ सहा आठवड्यात कर्करोगाला शरीरातून हद्दपार केले . ऐंशी वर्षांपूर्वी, डॉ. गेरसन ह्यांनी, ज्यांच्या ठायी वैज्ञानिक दृष्टी आणि प्रेषिताचे हृदयदेखील होते (ज्यांनी पैशांसाठी डॉक्टरी पेशा कधीही केला नाही) कर्करोगाच्या उत्पत्तीचे आपल्या ह्या पुस्तकात ५० कर्करोगमुक्त झालेल्या रुग्णांचा हवाला देऊन अचूक निदान केले होते - A Cancer Therapy: Results of Fifty Cases and the Cure of Advanced Cancer by Diet Therapy. त्या पन्नास रुग्णांपैकी प्रत्येकास समकालीन पारंगत डॉक्टरांनी आता मृत्यूची वाट पाहण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही असे सांगून घरी सोडले होते . एका अत्यंत साध्या आणि सोप्या सिद्धांतावर आधारित डॉ. गैरसन यांचे हे निकष आधुनिक कर्करोगतज्ज्ञांच्या आजही गळी उतरलेले नाहीत ! डॉ. जेर्सन म्हणतात की रक्ताचे pH जसे जसे खाली घसरते तसे तसे कर्करोगाच्या पेशी विकसित होण्यास सुरुवात होते . आम्लयुक्त आहार घेतल्याने हे pH खाली जाते तर अल्कलीयुक्त आहार घेतल्याने ते वाढते . थोडक्यात सांगायचे तर, अन्नावर आपण जेवढ्या जास्त प्रक्रिया करू तेवढे ते आम्लयुक्त होते आणि आपल्या नैसर्गिक स्वरूपात अन्न हे सर्वाधिक अल्कलीस्वरूपात असते . अल्कलीयुक्त पदार्थ कर्करोगाच्या पेशी मारतात . तुम्हीदेखील कर्करोगाशी झुंजत असाल पण डॉ. गैरसन यांनी मांडलेल्या आहारपद्धती काही आठवडे अनुसरण्याची तुमच्या मनाची तयारी असेल तर मॅग्लीऑनिको यांच्या बाबतीत झालेला चमत्कार तुमच्या शरीरातपण होईल हे निश्चित ! अल्कलीयुक्त आहाराबद्दलच्या अधिक वैज्ञानिक माहितीसाठी Shelly Young ने लिहिलेले The pH Miracle आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी करायची ह्याच्या माहितीसाठी Charlotte Gerson चे Healing the Gerson Way: Defeating Cancer and Other Chronic Diseases ही दोन पुस्तके अवश्य वाचा .

   *Epitheliod sarcoma हा किमो अथवा रेडिएशनला न जुमानणारा एक अत्यंत दुर्मिळ प्रकारचा कर्करोग आहे . गेरसन थेरपिद्वारे हा कर्करोगदेखील बरा झाल्याची नोंद आहे .


* पुरुषांमध्ये सर्वाधिक आढळणारे कर्करोग *

१.   फुप्पुस (Lungs )   १६.७ %
२.   प्रोस्टेट (Prostate)   १५ %
३.   मोठे आतडे (colon -rectum)   १० %
४.   जठर (Stomach)   ८.५ %
५.   यकृत (Liver)    ७.५ %
६.   मूत्राशय (Bladder)   ४.४ %
७.  अन्ननलिका (Oesophagus)   ४.३ %
८.  नॉन-हॉजकिन्स
          लिंफोमा    २.९ %
९.   मूत्रपिंड (Kidney)    २.९ %
१०.  ल्युकेमिया (Blood cancer)   २.७ %

पुरुषांमध्ये सर्वाधिक आढळणारे कर्करोग

    ◾ कॅनाबिस तेल - कर्करोग निवारणाचे लपविलेले गुपित

   २०१८ च्या मार्चमध्ये, आरोग्यवविषयक जवळजवळ सर्व प्रमुख वर्तमानपत्रे, नियतकालिके व वेबसाईट्सवर एक लक्षवेधी बातमी झळकली - एका महिलेने आपला विकोपाला गेलेला कर्करोग कॅनाबिस घेऊन बरा केला . काहींनी तिचे वर्णन ' चालते-बोलते आश्चर्य ' म्हणून केले तर काही डॉक्टरांनी तिला ' सर्वात भाग्यशाली रुग्ण ' म्हणून संबोधले . दोन वर्षांपूर्वी ५२ वर्षीय जॉय स्मिथचे स्त्री-अंडकोशाच्या कर्करोगाचे निदान केले गेले होते . किमोथेरपीमुळे तिची सर्व प्रतिकारशक्ती लयास गेली आणि तिच्या हातावर एक जखम झाली, ती बरी होईना, त्यामुळे किमोथेरपी थांबवणे भाग पडले . सी. टी. स्कॅन काढला तेव्हा लक्षात आले की कर्करोग आता आतड्यात पूर्ण पसरला आहे . डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे तिचे आयुष्य आता केवळ सहा आठवडे होते . कॅनाबिस तेलाने बऱ्या झालेल्या कर्करोग रुग्णांची इंटरनेटवर बरीच चर्चा चाललेली असते आणि आपणही जमल्यास हा उपाय करून पाहावा असे जॉयला वाटले . परंतु, नशील्या गुणधर्मामुळे कॅनाबिस मिळवणे बेकायदेशीर होते . तरीही, तिच्या मित्रांनी खटपट करून ते मिळवलेच . हा भांगेसदृश 'काळा डामरी पदार्थ ' आठवड्यातून ३ ते ४ वेळा घेणे तिने सुरु केले . तिला स्वतःला ह्याचा काहीच परिणाम जाणवेना पण तिच्या प्रत्येक सी. टी. स्कॅन मध्ये हा कर्करोग लोप पावत चालल्याचे दिसू लागले . आज जॉय स्मिथ पूर्वीसारखीच ठणठणीत आहे . कॅनाबिस तेलाने बरी झालेली तिची कदाचित् पहिलीच अधिकृत केस होती . कॅनाबिस तेलाला कर्करोगी रुग्णांसाठी कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून ती एक मोहीम राबवित आहे . पारंपरिक औषधांमध्ये एक बहुगुणी तेल म्हणून कॅनाबिस तेल पूर्वीपासून प्रसिद्ध आहे . हे तेल जर कायदेशीररित्या बाजारात सहज उपलब्ध झाले तर आपले अस्तित्वच धोक्यात येईल म्हणून आंतरराष्ट्रीय फार्मा कंपन्यांचा कॅनाबिसला प्रचंड विरोध आहे ह्याबाबत बराच आरडाओरडा इंटरनेटवर नेहेमी चालू असतो .

   रशिया, इटली, झेक रिपब्लिक, मेक्सिको, नॉर्वे, स्वित्झर्लंड मिळून काही इतर १० देशांमध्ये आजच्या घडीस कॅनाबिस तेलास वैद्यकीय उपचारासाठी कायदेशीर मान्यता मिळालेली आहे . अधिक माहितीसाठी Clint Werner चे Marijuana Gateway to Health: How Cannabis Protects Us from Cancer and Alzheimer's Disease वाचा .

    ◾ एसिअ‍ॅक टी: कर्करोग नष्ट करण्याचे शक्तिशाली हर्बल मिश्रण

   मानवजातीच्या कल्याणासाठी जे प्रेषित इथे येतात त्यांना यशस्वी होण्यासाठी प्रचंड विरोधाचा सामना करावाच लागतो... ईश्वरी राज्यातला कदाचित हा एक नियमच असावा . रेनी कायसे ही अशीच एक प्रेषित जिने एसिअॅक टी ह्या हर्बल मिश्रणाचे अनेक कर्करोग्यांवर (प्रयोगशाळेतील उंदीर आणि स्वतःच्या आत्यावरदेखील!) यशस्वी प्रयोग करून त्यांना पूर्णपणे बरे केले . ही गोष्ट १९३० - ७० ह्या दरम्यानची . वैद्यकीय पेशात पुस्तकांपेक्षा पेशंट लोकांकडूनच जास्त शिकायला मिळतं ही वस्तुस्थिती आहे . रेनीलादेखील ह्या हर्बल मिश्रणाचे सूत्र स्तनांच्या कर्करोतून बऱ्या झालेल्या तिच्या अशाच एका रुग्णाकडून ज्ञात झाले होते . त्या रुग्ण महिलेला ही कृती मूळ अमेरिकन वंशाच्या ओजीबावे ह्या जमातीपासून पासून मिळाली होती . त्यावेळेस हे मिश्रण कर्करोग पिडीतांमध्ये प्रचंड लोकप्रिय होऊन गेले होते (आजदेखील एसिअ‍ॅक टीच्या फेसबुक पेजवर त्याने बऱ्या झालेल्या शेकडो लोकांचे अभिप्राय वाचायला मिळतील), परंतु, त्याकाळचे डॉक्टर्स आणि फार्मा कंपन्यांकडून तिला प्रचंड विरोध झाला . अधिकृत परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करते असा तिच्यावर आरोप ठेवण्यात आला . अटक करण्याच्या धमक्या तिला दिल्या गेल्या . निराशेच्या गर्तेत सापडून तिने आपले काम बंद करून टाकले . जॉन केनेडी यांच्या डॉक्टरने तिला प्रोत्साहन दिले आणि तिचे कार्य पुन्हा प्रकाशात आले . अनेक वैद्यकीय चाचण्यांनी हे सिद्ध केले आहे की एसिअ‍ॅक टीमुळे शरीरातील फ्री रॅडिकल्सचे प्रमाण ८४% नी कमी होते . त्याने शरीराची केवळ प्रतिकारक्षमताच वाढत नाही तर रक्तातील विषारी द्रव्यांचा निचरादेखील होतो . आज, एसिअ‍ॅक टी अनेक स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध आहे . FDA नी एसिअ‍ॅक टीला असुरक्षित औषधांच्या यादीत टाकलेले आहे (आणि किमोथेरपी मात्र सुरक्षित!), हे हास्यास्पद नाही का ? अधिक माहितीसाठी, रिचर्ड थॉमसचे The True Story of a Canadian Herbal Cancer Remedy and of the Thousands of Lives It Continues to Save हे पुस्तक जरूर वाचा .



DEALS OF THE DAY: AMAZON india


BEAUTY, WATCHES, JEWELLERY, CLOTHES,
ELECTRONICS, ORGANIC HEALTH PRODUCTS

    ◾ खाण्याचा सोडा - अनेक कर्करोगांसाठी सर्वात स्वस्त उपाय

   हे पूर्णपणे तर्कसुसंगत आहे - जिथे अत्याधिक साखर आहे तिथे आम्ल आहे आणि जिथे आम्लयुक्त द्रव्य आहे तिथे कर्करोगाच्या पेशी आणि बुरशी उदा. कॅण्डिडा यांचे अतित्व आहे . कर्करोगाच्या गाठीतील आतले pH आणि त्याच्या भोवतालच्या द्रवाचे pH हे दोन्ही आम्लयुक्त (७ पेक्षा कमी) असते, त्यातच त्याची वाढ होते . आपल्यापैकी प्रत्येकाच्याच शरीरात केव्हाना केव्हा कर्करोगाच्या पेशी निर्माण होत असतात पण जोपर्यंत आपले pH, आपली प्रतिकारशक्ती शाबूत आहे तोपर्यंत आपल्याला त्याची काळजी करायची गरज नसते . कर्करुगणांमध्ये आम्लयुक्त pH चे रूपांतर पुन्हा अल्कलीयुक्त pH मध्ये करण्यात खाण्याच्या सोड्याने (Baking soda) निःशंक आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे . जेवढ्या अधिक वेळ हे pH अल्कलीयुक्त राहील तेवढा वेळ ते कर्करोगाच्या पेशींना मारक ठरते . ऍरिझोना कॅन्सर सेंटर आणि ली-मॉफेट कॅन्सर सेंटर, फ्लोरिडा येथील वैज्ञानिकांनीदेखील शेकडो प्रयोग करून हे सिद्ध केले आहे . कॅन्डीडा बुरशी आणि कर्करोग ह्यांचे सह-अस्तित्व वैद्यकीय जगात तर वादातीत आहेच . नोबेल प्राईझ विजेते डॉ. जाहान्स फिबिगर व पेनिसिल्वेनिया येथील इन्स्टिटयूट फॉर कॅन्सर रिसर्च ह्यांनी जे जे कॅन्सरचे नमुने तपासले त्या सर्वांमध्ये त्यांना ह्या बुरशीचे अस्तित्व आढळले . परंतु ह्याचा असा अर्थ होत नाही की बुरशीमुळे कॅन्सर होतो ! इटलीतील एक ऑंकॉलॉजिस्ट डॉ. टुलिओ सिमोनसींनी यांनी असे विधान केले खरे पण त्यांनादेखील ९५% कॅन्सरच्या गाठींमध्ये कॅण्डिडाचे अस्तित्व आढळले . त्यांनी बेकिंग सोडा वापरून कॅन्सर ट्यूमरला नष्ट करण्याचे प्रयत्न केले आणि त्यात त्यांना प्रचंड यश मिळाले . आपल्या पुस्तकात Cancer is a Fungus: A Revolution in Tumor Therapy मध्ये त्यांनी विविध प्रकारच्या टोकाला पोहोचलेल्या व हे सर्वात स्वस्त औषध वापरून बऱ्या झालेल्या १८ विविध केसेसचे विवेचन केले आहे . अधिक माहितीसाठी जरूर वाचा - Mark Sircus लिखित Sodium Bicarbonate : Full Medical Review

    ◾ सी-वीड (समुद्र वनस्पती) - सर्वात सामर्थ्ययुक्त कर्करोग प्रतिबंधात्मक पदार्थ

   किमोथेरपीपेक्षाही अधिक गुणकारी क्षमता असलेली कुठली वनस्पती असेल तर ती सी-वीड (समुद्र वनस्पती) ही होय . सेंद्रीय आयोडीनयुक्त ह्या वनस्पती कर्करोग निवारक पदार्थांनी पुरेपूर असतात . जपानी लोक दररोज जवळजवळ ११ ग्राम सी-वीड खातात . आता अमेरिकन आणि जपानी लोकांमधील खालील कर्करोगांच्या दराची तुलनात्मक आकडेवारी बघा : प्रोस्टेट - ८३.८ % वि २२.७ %, फुप्पुसे - ४२.१ % वि २४.६ %, स्तनाचा कर्करोग ७६ % वि ४२.७ %, मेलेनोमा - १४.३ % वि ५.१ %, मूत्राशय- १२.७ % वि ४.८ %, किडनी- १२.७ % वि ४.९ %, ल्यूकेमीया- ९.९ % वि ४.३ %. फार लक्षवेधी फरक आहे हा ! जेव्हा हे जपानी लोक अमेरिकेत स्थलांतर करतात तेव्हा हे दर जवळजवळ समान होतात. (रेड मीटच्या अटी सेवनामुळे जपानी लोकांमध्ये पचनसंस्थेच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असते.) १९५१ मध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे एका महिलेचा मृत्यू झाला . तिच्या गर्भाशयातून काढलेल्या (हेला सेल-लाईन पेशी) कर्करोगाच्या पेशींना प्रयोगशाळेत एंजियोजेनेस नावाची प्रक्रिया करून जिवंत ठेवले होते . ब्राझीलमधील फेडरल युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांना असे आढळले की सी-वीडचा उपचार केल्यावर ही प्रक्रिया पूर्णपणे रोखता येऊ शकते . उंदरांवर प्रयोग केला असता मूत्रपिंड आणि यकृतावर कोणतेही विषारी परिणाम न दिसल्याने सी-वीड किमोथेरपीपेक्षाही अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले . सर्व पशु-पक्षांना कर्करोग होतो पण सर्व घातक रासायनिक टाकावू पदार्थ महासागरांमध्ये सोडण्यात येत असूनही माशांना मात्र कर्करोग कधीच होत नाही . तीन प्रकारचे सी-वीड आढळतात - निळे, हिरवे आणि तपकिरी- ह्यापैकी तपकिरी सी-वीडमध्ये सर्वाधिक आरोग्य गुणधर्म असल्याचे आढळले आहे . तपकिरी सी-वीडमध्ये आढळणारे फ्ल्युकोइडन कर्करोगाच्या पेशींच्या डीएनएमध्ये आत्म-विध्वंसक बदल करण्यास प्रवृत्त करते . त्याच्या शक्तिशाली उपचारात्मक गुणधर्मांचे वर्णन करताना 600 पेक्षाही जास्त गौरवपर वैज्ञानिक लेख प्रकाशित केले गेले आहेत. अधिक माहितीसाठी वाचा - Read Barton Seaver चे Superfood Seagreens: A Guide to Cooking with Power-packed Seaweed (Superfoods for Life) . तुमच्या घराण्यात जर कर्करोग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर सी-वीडला आपल्या आहाराचा नियमित घटक बनवा . अनेक प्रकारचे सी-वीड माफक दरात ऑनलाईन उपलब्ध आहेत .

Buy Sea-weed
* स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारे कर्करोग *

१.   स्तन (Breasts)   २५.२ %
२.   मोठे आतडे (colon -rectum)   ९.२ %
३.   फुप्पुस (Lungs )   ८.८ %
४.   गर्भाशयाचे तोंड (Cervix)   ७.९ %
५.   गर्भाशय (Endometrium )   ४.८ %
६.   जठर (Stomach)   ४.८ %
७.   स्त्री बीजांड (Ovary)   ३.६ %
८.   थायरॉईड (Thyroid)   ३.५ %
९.   यकृत (Liver )   ३.४ %
१०.  नॉन-हॉजकिन्स लिंफोमा   २.५ %

स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारे कर्करोग

    ◾ गो चिकित्सा पद्धतीने (Cow Therapy) कर्करोगावर प्रभावी उपचार

   ह्यात उल्लेखलेली गाय म्हणजे मूळ भारतीय वंशाची गाय, की फक्त जिच्याच दुधात बीटा केसिन ए-2 नावाचे प्रोटीन असते . पाश्चिमात्य गायींच्या (होलस्टाईन, जर्सी, एचएफ इत्यादि) दुधात प्रोटीन बीटा केसिन ए-1 असते, ज्यामुळे मधुमेह, आयएचडी, ऑटिझम, स्किझोफ्रेनिया आणि अगदी कर्करोग सुद्धा शरीरात बळावतात हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे .
न्यू यॉर्क मध्ये झगमगत्या अत्याधुनिक जीवनशैलीचा उपभोग घेणाऱ्या ३७ वर्षीय अमित शहाला आपल्या जीवनात चहूकडून काळोख दाटून आल्यासारखे वाटले . काही महिन्यांपूर्वीच मेंदूच्या कर्करोगामुळे त्याच्या आईचे निधन झाले होते आणि आता डॉक्टर त्याला सांगत होते - जठराचा कर्करोग शरीरात दूरपर्यंत पसरला आहे, तू आता केवळ सहा महिन्यांचा सोबती . आयुष्यातले अखेरचे दिवस आपले जवळचे मित्र व नातेवाइकांच्या सहवासात घालवावे म्हणून तो भारतात परतला . इथे पोहोचल्यावर बघतो तर काय, पत्रांमधून भरभरून प्रेमाची भाषा बोलणारे हे कुणीच आता त्याच्याबद्दल जिव्हाळा दाखवेनात ! अंतर्बाह्य विषाने भरून राहिलेल्या अमितच्या आयुष्यात नियतीने अमृताचा एक थेंब टाकायचे ठरवले होते ! कुणीतरी त्याला सुचवले की कर्करोगाच्या शेवटच्या स्थितीत गो चिकित्सा पद्धतीने बराच अराम मिळतो म्हणून आणि वलसाडच्या (गुजरात) एका निसर्गरम्य ग्रामीण भागात केवळ याच उद्देशाने एक रुग्णालय कार्यरत आहे . कर्करोगाच्या वेदना सुसह्य व्हाव्या केवळ ह्या उद्देशाने अमित वलसाडला जातो आणि मानवजातीला भरभरून देणाऱ्या निसर्ग आणि गायींच्या सहवासात एक शिस्तबद्ध जीवन जगण्यास सुरुवात करतो . रोजची ध्यानधारणा, गायीच्या दूध-दही-गोमूत्राचे प्राशन, त्यांना चारा खाऊ घालून त्यांच्या आशीर्वादाची याचना, शेणाचे लेप, वेळेवर साधा आणि सकस आहार .... ह्या दिनचर्येमुळे त्याच्या शरीर-मनात नवशक्तीचा संचार होतो . काही आठवडे जातात आणि एक नवा अमित जगासमोर येतो - शारीरिकरीत्या तंदुरुस्त, मनाने खंबीर अन् उत्साही, आध्यात्मिकतेकडे झुकलेला आणि वैद्यकीयदृष्ट्या कर्करोगमुक्त ! आपल्या आयुष्याची ही रोमांचक कहाणी त्याने Holi Cancer: How Cow Saved My Life ह्या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे . 

   गुजरातमधील वलसाड येथे आर.एम. धारीवाल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दररोज अत्यंत कमी खर्चात किमान 100 रुग्णांवर उपचार केले जातात . ह्या रुग्णालयातून बऱ्या झालेल्या कॅन्सरच्या अनेक केसेसपैकी अमित शहा हा एक ! 

    ◾ कर्करोगावर मात करणारी होमिओपॅथी

   होमिओपॅथी शास्त्रात कर्करोगापासून मुक्त झालेल्या शेकडो-हजारो रुग्णांचे अहवाल तुम्हाला बघायला मिळतील . हीच केवळ अशी 'पॅथी' असावी की जिने शेकडो प्रकारचे कर्करोग सर्व जगात बरे करून दाखवले आहेत . 

   ही केस होमिओपॅथीक वर्ल्ड ह्या नियतकालिकाच्या २५ व्या अंकात वाचायला मिळेल . एका सहा महिन्यांच्या बाळाचे पालक त्या बाळाला डॉ. थॉमस स्किनर यांच्याकडे अतिशय दुःखी आणि भयंकर स्थितीत घेऊन आले . त्याच्या आजाराने उग्र स्वरूप धारण केले होते - सर्व अंगभर उठलेले लालभडक पुरळ, हिरवे जुलाब, मान धरायची ताकद नाही आणि एवढे दुःख अपुरे होते म्हणून की काय पाठीवर एक हातभार आकाराची सुमारे अडीच इंच खोल अशी गाठ . हा सार्कोमा प्रकारचा भयानक कर्करोग होता आणि त्यांचे फॅमिली डॉक्टर, लस देणारे डॉक्टर, फिजिशिअन, सर्जन ह्या सर्वांचे एकच मत होते - ह्या चिमुकल्या जीवावर शस्त्रक्रिया करणं ही अशक्य बाब होती . अशावेळी जे नेहेमी होतं तेच झालं . नाईलाज म्हणून एक शेवटची 'पॅथी' करून पाहावी म्हणून ह्या तान्ह्या बाळाला त्याचे आई-वडील डॉ. स्किनर ह्यांच्याकडे घेऊन आले . होमिओपॅथीची औषधे 'करीन मुळापासून तर मुळीच नाही' ह्या तत्वावर काम करतात . जर औषध लागू पडलं तर एखाद्या जादूसारखं काम करेल नाहीतर काहीच करणार नाही . सुरवातीची औषधे - लायकोपॉडियम, ग्राफायटिस , मर्क्यूरीअस, नायट्रिक ऍसिड, सिलिशिया ... एका पाठोपाठ एक अयशस्वी ठरली . डॉ. स्किनर ह्यांनी पहिल्यापासून केस घेतली आणि ह्या बाळाचा सर्व त्रास लसी दिल्यानंतर वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले . त्यांनी थुजाचे २ डोस दिले . ह्या औषधाने मात्र त्या कर्करोग्याच्या गाठीचा अचूक वेध घेतला आणि वर्षभरातच ती गाठ इतिहासजमा झाली . होमिओपॅथीक चिकित्सेमध्ये कमीत कमी शंभर औषधे अशी आहेत की जी कर्करोगाचा यशस्वीपणे उपचार करण्यास वापरली जातात . आपल्यावर होणारे सर्व टीकाकारांचे वार पचवून होमिओपॅथी सर्व मानवजातीसहीत पशु-पक्ष्यांनादेखील सर्दी-खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत सर्व रोगांपासून मुक्त करण्यात कार्यरत आहे .

   ९९% लोकांच्या मनात घर करून बसलेली ठाम समजूत म्हणजे किमोथेरपी आणि रेडिएशनशिवाय कॅन्सर बराच होऊ शकत नाही . वरील उदाहरणे वाचलीत म्हणजे सत्य नेमके वेगळेच आहे ह्याची पुरेपूर कल्पना आपल्याला आल्याशिवाय राहात नाही . सर्दी-खोकल्यासारखा कॅन्सरपण बरा होतो, थोडा वेळ लागतो एवढंच !


uc
"सुखसोयींची रेलचेल असते तेव्हा आपण अंधपणे सुखांमागे धावत असतो आणि तब्येतीची हेळसांड करतो . आजारपण आपला कान धरून आपल्याला जागं करतं आणि शहाणपण शिकवतं . तेव्हा उथळ गोष्टी मागे पडतात, विचारात सखोलता येते आणि सारासारविचारबुद्धी जागृत होऊन काय घ्यावं आणि काय टाकावं हे कळू लागतं ."
-एक कर्करोगमुक्त रुग्ण